White पावसाचं झालेलं वातावरण
अन् सुटलेला गार वारा..
पडलेला काळा अंधार
अन् बर्फाच्या त्या गारा...
रात्रीच्या भर पावसाने
तुटलेल्या विजेच्या तारा..
पाऊस पडून गेल्यावर
वाढलेला उष्णतेचा पारा..
चिखल तुडवत तुडवत
गुरांसाठीचा तो चारा..
शेतकऱ्याच्या माथ्यावरचा
बांधलेला गवताचा भारा..
स्वच्छ आकाश झाल्यावर
चमचमणारा तारा..
पावसाच्या बेधुंद सरीने
आनंदला गाव सारा..
आनंदला गाव सारा..
©गोरक्ष अशोक उंबरकर
rain