शीर्षक : रंग माझा वेगळा रंगाची या उधळण करते  भा | मराठी कविता

"शीर्षक : रंग माझा वेगळा रंगाची या उधळण करते  भाव मनाचा या आगळा  सर्वांमध्ये मिसळून जाई  असा रंग माझा वेगळा    क्षणांत होती डोळे ओले  कधी उमलतो रंग हसरा सर्वांमध्ये होऊनी दंग  हासत - खेळत दुःख विसरा रागाचा ही रंग दिसतो  झटकन तो ही शांत होतो  मग मनाच्याच या अंतरंगाचा  चेहऱ्यावरही ठसा उमटतो   कधी प्रेमाच्या रंगाने  मन क्षणातच मोहरते  खुलते कळी या ओठांवरची  अंग - अंग हे शहारते  इंद्रधनूच्या या सप्तरंगापरी  जीवनात या रंग असे  मना मनातील सुप्त भावनांची  उधळण विविधरूपी रंगातून दिसे ज्योती किरतकुडवे (साबळे)  दिवा - ठाणे ©Jk"

 शीर्षक : रंग माझा वेगळा


रंगाची या उधळण करते 

भाव मनाचा या आगळा 

सर्वांमध्ये मिसळून जाई 

असा रंग माझा वेगळा 

 

क्षणांत होती डोळे ओले 

कधी उमलतो रंग हसरा

सर्वांमध्ये होऊनी दंग 

हासत - खेळत दुःख विसरा


रागाचा ही रंग दिसतो 

झटकन तो ही शांत होतो 

मग मनाच्याच या अंतरंगाचा 

चेहऱ्यावरही ठसा उमटतो  


कधी प्रेमाच्या रंगाने 

मन क्षणातच मोहरते 

खुलते कळी या ओठांवरची 

अंग - अंग हे शहारते 


इंद्रधनूच्या या सप्तरंगापरी 

जीवनात या रंग असे 

मना मनातील सुप्त भावनांची 

उधळण विविधरूपी रंगातून दिसे


ज्योती किरतकुडवे (साबळे) 

दिवा - ठाणे

©Jk

शीर्षक : रंग माझा वेगळा रंगाची या उधळण करते  भाव मनाचा या आगळा  सर्वांमध्ये मिसळून जाई  असा रंग माझा वेगळा    क्षणांत होती डोळे ओले  कधी उमलतो रंग हसरा सर्वांमध्ये होऊनी दंग  हासत - खेळत दुःख विसरा रागाचा ही रंग दिसतो  झटकन तो ही शांत होतो  मग मनाच्याच या अंतरंगाचा  चेहऱ्यावरही ठसा उमटतो   कधी प्रेमाच्या रंगाने  मन क्षणातच मोहरते  खुलते कळी या ओठांवरची  अंग - अंग हे शहारते  इंद्रधनूच्या या सप्तरंगापरी  जीवनात या रंग असे  मना मनातील सुप्त भावनांची  उधळण विविधरूपी रंगातून दिसे ज्योती किरतकुडवे (साबळे)  दिवा - ठाणे ©Jk

#Rang

People who shared love close

More like this

Trending Topic