वाद-संवाद जिथे पेटतो वाद, तिथे संपतो संवाद शब्दा | मराठी Video

"वाद-संवाद जिथे पेटतो वाद, तिथे संपतो संवाद शब्दांची होते झुंज, टोकाचा होतो नाद.... अपेक्षांचा सलतो भार , आक्षेपांना येते उधाण शब्दांनीच होतो वार, हरवतात मान- सन्मान.... अनावर अश्रूंचे निर्झर , स्त्रवतात पुन्हा झरझर विरून जाता तो अंगार, मनावर फुंकर अलवार.... आयुष्याच्या सांजवेळी, गिळून टाक मीपण मनात उरलेला संदेह , सोडवू प्रेमाने आपण.... अमिता✍️ ©Amita "

वाद-संवाद जिथे पेटतो वाद, तिथे संपतो संवाद शब्दांची होते झुंज, टोकाचा होतो नाद.... अपेक्षांचा सलतो भार , आक्षेपांना येते उधाण शब्दांनीच होतो वार, हरवतात मान- सन्मान.... अनावर अश्रूंचे निर्झर , स्त्रवतात पुन्हा झरझर विरून जाता तो अंगार, मनावर फुंकर अलवार.... आयुष्याच्या सांजवेळी, गिळून टाक मीपण मनात उरलेला संदेह , सोडवू प्रेमाने आपण.... अमिता✍️ ©Amita

#StandProud
#मराठीकविता

People who shared love close

More like this

Trending Topic