अवकाळी अवकाळी तो बरसून गेला पडझड करून गेला घराच | मराठी Poetry Video

" अवकाळी अवकाळी तो बरसून गेला पडझड करून गेला घराची आणि मनाचीही... आला आणि मागे खुणा सोडून गेला त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही .... कोणी म्हणे निसर्ग कोपला, कोणी म्हणे माणूस चुकला, अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही... अवकाळीच खोपटात पाणी शिरले अन् डोळ्यांतून वाहू लागले, अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही , पिके नासली आणि माणुसकीही .... घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक तग धरेल काय...? म्हणून येताना काळ वेळ बघून ये , अवकाळी बरसू नको... काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती... प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना, सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना.... # Pournima Mohol 16-05-2024 7:00a.m. Copyrites reserved ©Pournima Mohol "

अवकाळी अवकाळी तो बरसून गेला पडझड करून गेला घराची आणि मनाचीही... आला आणि मागे खुणा सोडून गेला त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही .... कोणी म्हणे निसर्ग कोपला, कोणी म्हणे माणूस चुकला, अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही... अवकाळीच खोपटात पाणी शिरले अन् डोळ्यांतून वाहू लागले, अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही , पिके नासली आणि माणुसकीही .... घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक तग धरेल काय...? म्हणून येताना काळ वेळ बघून ये , अवकाळी बरसू नको... काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती... प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना, सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना.... # Pournima Mohol 16-05-2024 7:00a.m. Copyrites reserved ©Pournima Mohol

#Barsaat

People who shared love close

More like this

Trending Topic