व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !! माय हारणी मया बापाची | मराठी कविता

"व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !! माय हारणी मया बापाची ही काळी धरती माय वावराला काटे कुपाटे लावून राबे रात्रं-दिन संपत्ती काय तर म्हणे मई बैलाची जोडी लय हाय बैल गाडी हाकतो राजाच्या छाताडावणी कुणात हिम्मत नाय बाप्पा मया शेतकरी बापवणी ऊना तानात राबून नांदे झोपडीत महलावानी शेतकरी करे कष्टाने घामाचं सोन कधी उनाने बेजार कधी पुराने बेहाल उभा संसार सारं निसर्गाचं हाती किती कष्ट करे.. याच अंदाज नाय !! जगले कित्येक मया बापाच्या भरोशी व्यापारी तर त्यांनीच पोसले खरे तरी आता हतबल झाला कसा शेतकरी म्हणे पेरणी ला घेतलेली कर्ज कस फेडू ? निराधार कसा झाला हा उभ्या जगाचं पोशिंदा म्हणे महागाई फार, नाय भाव मालाला या व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !! ©Jaymala Bharkade"

 व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !!

माय हारणी मया बापाची
ही काळी धरती माय 
वावराला काटे कुपाटे लावून
राबे रात्रं-दिन

संपत्ती काय तर म्हणे
मई बैलाची जोडी लय हाय
बैल गाडी हाकतो
राजाच्या छाताडावणी

कुणात हिम्मत नाय बाप्पा 
मया शेतकरी बापवणी 
ऊना तानात राबून
नांदे झोपडीत महलावानी

शेतकरी करे कष्टाने घामाचं सोन
कधी उनाने बेजार कधी पुराने बेहाल
उभा संसार सारं निसर्गाचं हाती
किती कष्ट करे.. याच अंदाज नाय !!

जगले कित्येक मया बापाच्या भरोशी
व्यापारी तर त्यांनीच पोसले खरे
तरी आता हतबल झाला कसा शेतकरी
म्हणे पेरणी ला घेतलेली कर्ज कस फेडू ?

निराधार कसा झाला हा 
उभ्या जगाचं पोशिंदा
म्हणे महागाई फार, नाय भाव मालाला   
या व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !!

©Jaymala Bharkade

व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !! माय हारणी मया बापाची ही काळी धरती माय वावराला काटे कुपाटे लावून राबे रात्रं-दिन संपत्ती काय तर म्हणे मई बैलाची जोडी लय हाय बैल गाडी हाकतो राजाच्या छाताडावणी कुणात हिम्मत नाय बाप्पा मया शेतकरी बापवणी ऊना तानात राबून नांदे झोपडीत महलावानी शेतकरी करे कष्टाने घामाचं सोन कधी उनाने बेजार कधी पुराने बेहाल उभा संसार सारं निसर्गाचं हाती किती कष्ट करे.. याच अंदाज नाय !! जगले कित्येक मया बापाच्या भरोशी व्यापारी तर त्यांनीच पोसले खरे तरी आता हतबल झाला कसा शेतकरी म्हणे पेरणी ला घेतलेली कर्ज कस फेडू ? निराधार कसा झाला हा उभ्या जगाचं पोशिंदा म्हणे महागाई फार, नाय भाव मालाला या व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !! ©Jaymala Bharkade

Farmer..life 💔 & The entire system..which make him depressed 🥲 #व्यवस्थेला कधी पाझर फुटेल

People who shared love close

More like this

Trending Topic