आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं धडावेगळं केलं ©राजक | मराठी भय कथा

"आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं धडावेगळं केलं ©राजकारण "

आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं धडावेगळं केलं ©राजकारण

सोलापूर/कुईवाडी : घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केले.. आजी-आजोबा एका नातेवाइकांच्या लग्नाला गेले.. सहा वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित्त बाहेर पडले.. मग, मुलगा अन् आईने जवळच बाळाच्या चुलत आजोबांकडे जाऊन चहा- बिस्कीटदेखील घेतले अन् घरी परतले. साडेनऊ ते सव्वाबाराच्या दरम्यान त्या मातेने आजी-आजोबांच्या लाडक्या नातवाचे शीर कुन्हाडीने छाटून धडावेगळे केल्याची क्रूर घटना माढा तालुक्यात कव्हे येथे घडली. त्यानंतर मुलाची हत्या करून सासऱ्याला फोन करून सांगितले.

हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने जिल्ह्याला हादरवून टाकले. या घटनेनंतर चिमुरड्याच्या आईनेही तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, तिच्यावर कुर्डूवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मुलाच्या हत्येमागील कारणाचा उलगडा पोलिसांकडून झालेला नाही.

People who shared love close

More like this

Trending Topic