ग्रीष्म... ग्रीष्माची साक्ष देतो, हा सूर्य तप्त ह | मराठी कविता Video

"ग्रीष्म... ग्रीष्माची साक्ष देतो, हा सूर्य तप्त होऊनी वाराही तेव्हा रुसून बसतो, अज्ञात राहूनी.... किरणे प्रखरतात, धवल निळ्या नभातुनी आतपाच्या रेषा तेव्हा, झेपावतात धरेवरी.... साध्वी मही सदैव, सामावून घेते ज्वाळा वृक्षछायेत मिळतो, असीम शीत जिव्हाळा.... करपते काया, स्वेद बिंदू स्त्रवतात तृषार्त होता कंठ, ओंजळी पसरतात.... ग्रीष्म ऋतू हा असा, आगळा वेगळा चटके सोसल्यावर, मग येतो पावसाळा.... अमिता✍️ ©Amita "

ग्रीष्म... ग्रीष्माची साक्ष देतो, हा सूर्य तप्त होऊनी वाराही तेव्हा रुसून बसतो, अज्ञात राहूनी.... किरणे प्रखरतात, धवल निळ्या नभातुनी आतपाच्या रेषा तेव्हा, झेपावतात धरेवरी.... साध्वी मही सदैव, सामावून घेते ज्वाळा वृक्षछायेत मिळतो, असीम शीत जिव्हाळा.... करपते काया, स्वेद बिंदू स्त्रवतात तृषार्त होता कंठ, ओंजळी पसरतात.... ग्रीष्म ऋतू हा असा, आगळा वेगळा चटके सोसल्यावर, मग येतो पावसाळा.... अमिता✍️ ©Amita

#मराठीकविता
#उन्हाळा

People who shared love close

More like this

Trending Topic