खुपच सहज सोप्प असतं हसणं अगदी बेभान वेडं होऊन हसाव | मराठी Quotes

"खुपच सहज सोप्प असतं हसणं अगदी बेभान वेडं होऊन हसावं हसून दुनियेलाही वेडं बनवावं आयुष्याची परवड लपवण्याचं खूप सोपं साधन असतं हसणं... एवढं हसावं की डोळा पाणी यावं कारण मात्र कोणा न उमगावं जगालाही हास्याचा हेवा वाटावा इतकं सहज नाट्य वटवण्याचं खूप सोपं साधन असतं हसणं... लोकांनी मुर्खात गणना केली तरीही हसरा मुखवटा पांघरून मनातील वेदना लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असतं हसणं खूप सोपं साधन असतं हसणं... खोटं हसता हसता हसणंही आपलं गुलाम होऊन जातं या हास्यामागे थोडं तरी दुःख मात्र नक्कीच विरून जातं खरंच खूप सोपं असतं हसणं... हास्य क्षणभराचा का होईना पण आनंद नक्कीच देऊन जातं शेवटी हसणं हे हसणंच असतं जगण्याचं गमक शिकवून जातं खरंच खूप सोपं असतं हसणं... विनया कविटकर🌹 ©Vinaya"

 खुपच सहज सोप्प असतं हसणं
अगदी बेभान वेडं होऊन हसावं
हसून दुनियेलाही वेडं बनवावं
आयुष्याची परवड लपवण्याचं 
खूप सोपं साधन असतं हसणं...


एवढं हसावं की डोळा पाणी यावं
कारण मात्र कोणा न उमगावं
जगालाही हास्याचा हेवा वाटावा 
इतकं सहज नाट्य वटवण्याचं
खूप सोपं साधन असतं हसणं...


लोकांनी मुर्खात गणना केली
तरीही हसरा मुखवटा पांघरून
मनातील वेदना लपवण्याचा 
केविलवाणा प्रयत्न असतं हसणं
खूप सोपं साधन असतं हसणं...

                 



                                                               खोटं हसता हसता हसणंही 
                                                               आपलं गुलाम होऊन जातं
                                                               या हास्यामागे थोडं तरी दुःख
                                                               मात्र नक्कीच विरून जातं 
                                                               खरंच खूप सोपं असतं हसणं...


                                                                हास्य क्षणभराचा का होईना  
                                                                पण आनंद नक्कीच देऊन जातं
                                                                शेवटी हसणं हे हसणंच असतं
                                                                जगण्याचं गमक शिकवून जातं
                                                                खरंच खूप सोपं असतं हसणं...

                                                                 विनया कविटकर🌹

©Vinaya

खुपच सहज सोप्प असतं हसणं अगदी बेभान वेडं होऊन हसावं हसून दुनियेलाही वेडं बनवावं आयुष्याची परवड लपवण्याचं खूप सोपं साधन असतं हसणं... एवढं हसावं की डोळा पाणी यावं कारण मात्र कोणा न उमगावं जगालाही हास्याचा हेवा वाटावा इतकं सहज नाट्य वटवण्याचं खूप सोपं साधन असतं हसणं... लोकांनी मुर्खात गणना केली तरीही हसरा मुखवटा पांघरून मनातील वेदना लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असतं हसणं खूप सोपं साधन असतं हसणं... खोटं हसता हसता हसणंही आपलं गुलाम होऊन जातं या हास्यामागे थोडं तरी दुःख मात्र नक्कीच विरून जातं खरंच खूप सोपं असतं हसणं... हास्य क्षणभराचा का होईना पण आनंद नक्कीच देऊन जातं शेवटी हसणं हे हसणंच असतं जगण्याचं गमक शिकवून जातं खरंच खूप सोपं असतं हसणं... विनया कविटकर🌹 ©Vinaya

People who shared love close

More like this

Trending Topic