या चिंब बरसणाऱ्या पावसात, मी भान हरपून फिरत राहते. | मराठी Poetry

"या चिंब बरसणाऱ्या पावसात, मी भान हरपून फिरत राहते... फिरत राहते तोवर, जोवर तो पाऊस मला आपलंसं करत नाही, फिरत राहते तोवर, जोवर तो मला हवा तसा बरसत नाही, त्याला कळतं कुठेतरी, की मला तो हवाय, इतका की माझ्या भेगाळ अस्तित्वाला एक बहर येईल, इतका की माझ्या मनाला पालवीचा मोहोर येईल, बस, पावसाने असंच बेभान होत जावं, अन् मी पावसात नादान होत जावं, इतकंच काय ते आम्ही दोघं एकमेकांकडे मागतो, पाऊस काहीसा माझ्यासारखाच तर वागतो... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 या चिंब बरसणाऱ्या पावसात,
मी भान हरपून फिरत राहते...
फिरत राहते तोवर,
जोवर तो पाऊस मला आपलंसं करत नाही,
फिरत राहते तोवर,
जोवर तो मला हवा तसा बरसत नाही,
त्याला कळतं कुठेतरी, की मला तो हवाय,
इतका की माझ्या भेगाळ अस्तित्वाला एक बहर येईल,
इतका की माझ्या मनाला पालवीचा मोहोर येईल,
बस, पावसाने असंच बेभान होत जावं,
अन् मी पावसात नादान होत जावं,
इतकंच काय ते आम्ही दोघं एकमेकांकडे मागतो,
पाऊस काहीसा माझ्यासारखाच तर वागतो...

स्वप्नील हुद्दार




.

©Swapnil Huddar

या चिंब बरसणाऱ्या पावसात, मी भान हरपून फिरत राहते... फिरत राहते तोवर, जोवर तो पाऊस मला आपलंसं करत नाही, फिरत राहते तोवर, जोवर तो मला हवा तसा बरसत नाही, त्याला कळतं कुठेतरी, की मला तो हवाय, इतका की माझ्या भेगाळ अस्तित्वाला एक बहर येईल, इतका की माझ्या मनाला पालवीचा मोहोर येईल, बस, पावसाने असंच बेभान होत जावं, अन् मी पावसात नादान होत जावं, इतकंच काय ते आम्ही दोघं एकमेकांकडे मागतो, पाऊस काहीसा माझ्यासारखाच तर वागतो... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#rain

People who shared love close

More like this

Trending Topic