तो राबराबतो शेतामध्ये फार अन पर्जन्याचा त्याच्याव | मराठी Poetry

"तो राबराबतो शेतामध्ये फार अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार बीज पेरलेले वाया जाते सारे पण गडी कधीही मानत नाही हार थांबून राहणे माहित नाही त्याला अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला रोवून घट्ट तो पाय उभा मातीत कामास सज्ज जोडून बैलजोडीला  राबतात त्याच्या कुटुंबातले सारे झेलतात सगळे अंगावरती वारे  थकतो जीव तरी थांबत नाही कोणी डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे भाव मिळत नाही इतके करून त्याला तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या   कष्टाने तो सावरतो आवेगाला सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना? एवढा करा की विचार जाता जाता --- ३१/०७/२०२३ ©उमा जोशी"

 तो राबराबतो शेतामध्ये फार

अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार

बीज पेरलेले वाया जाते सारे

पण गडी कधीही मानत नाही हार


थांबून राहणे माहित नाही त्याला

अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला

रोवून घट्ट तो पाय उभा मातीत

कामास सज्ज जोडून बैलजोडीला 


राबतात त्याच्या कुटुंबातले सारे

झेलतात सगळे अंगावरती वारे 

थकतो जीव तरी थांबत नाही कोणी

डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे


भाव मिळत नाही इतके करून त्याला

तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला

धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या  

कष्टाने तो सावरतो आवेगाला


सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता

पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता

हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना?

एवढा करा की विचार जाता जाता

--- ३१/०७/२०२३

©उमा जोशी

तो राबराबतो शेतामध्ये फार अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार बीज पेरलेले वाया जाते सारे पण गडी कधीही मानत नाही हार थांबून राहणे माहित नाही त्याला अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला रोवून घट्ट तो पाय उभा मातीत कामास सज्ज जोडून बैलजोडीला  राबतात त्याच्या कुटुंबातले सारे झेलतात सगळे अंगावरती वारे  थकतो जीव तरी थांबत नाही कोणी डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे भाव मिळत नाही इतके करून त्याला तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या   कष्टाने तो सावरतो आवेगाला सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना? एवढा करा की विचार जाता जाता --- ३१/०७/२०२३ ©उमा जोशी

#शेतकरी

People who shared love close

More like this

Trending Topic