उमा जोशी

उमा जोशी

  • Latest
  • Popular
  • Video

writing quotes in hindi तीर त्याच्या काळजाच्या पार झाला अन् पुन्हा तो बाळ श्रावण ठार झाला वाहण्याला त्यास ओझे साथ केली त्याचयोगे आज श्रमसंस्कार झाला वाजले पायातले पैंजण तिच्या अन् काळजामध्ये कसा झंकार झाला प्रेम त्याचे तर दिखाव्याचेच होते गवगवा त्याचा इथे पण फार झाला ठेवला विश्वास होता मी तुझ्यावर का तुझ्या हातून मोठा वार झाला तो असा सोडून गेल्यावर तिचा का त्या क्षणाला पोरका संसार झाला झेलले आयुष्यभर मी दुःख सारे आज खांद्यांना सुखाचा भार झाला --- ०४/०६/२०२४ ©उमा जोशी

#gazal  writing quotes in hindi तीर त्याच्या काळजाच्या पार झाला
अन् पुन्हा तो बाळ श्रावण ठार झाला

वाहण्याला त्यास ओझे साथ केली
त्याचयोगे आज श्रमसंस्कार झाला

वाजले पायातले पैंजण तिच्या अन्
काळजामध्ये कसा झंकार झाला

प्रेम त्याचे तर दिखाव्याचेच होते
गवगवा त्याचा इथे पण फार झाला

ठेवला विश्वास होता मी तुझ्यावर
का तुझ्या हातून मोठा वार झाला

तो असा सोडून गेल्यावर तिचा का
त्या क्षणाला पोरका संसार झाला

झेलले आयुष्यभर मी दुःख सारे
आज खांद्यांना सुखाचा भार झाला
--- ०४/०६/२०२४

©उमा जोशी

#gazal

9 Love

त्या पाहुन बेड्या हातामधल्या आई का कोणाचेही अंतर द्रवले नाही तुज सोडविण्याचा विडा उचलला आहे  हा तुझ्याचसाठी यज्ञ मांडला आहे...१ घेतली शपथ मी मुक्त तुला करण्याची अन दिली आहुती साऱ्या आयुष्याची  मज विरह तुझा बघ मानवला गे नाही आणण्या परत विनविले सागरा आई...२ धाडली पिस्तुले करुन तस्करी येथे भय बाळगले ना गोऱ्यांचे मी तेथे जमवली फौज मग नवतरुणांची मोठी जे सज्ज प्राण देण्याला आईसाठी...३ अपशकुनी सन अठराशे सत्तावन्न ती स्वप्ने झाली स्वातंत्र्याची भग्न बंड ठरवुनी मग बासनात ते गेले स्वातंत्र्य समर मी पुन्हा पुढे आणियले...४ मज आस नसे बघ कुठल्याही मानाची आजन्म करावी सेवा तव चरणांची तुज स्वतंत्र करण्या झिजली काया जेव्हा मी पुत्र तुझा गे सुपुत्र ठरलो तेव्हा...५ भोगली सजा मी काळ्या पाण्याचीही ना पर्वा केली कधीच जगण्याचीही  तुज मुक्त पाहुनी झालो आनंदित मी ना फिकीर केली भारतरत्नाची मी...६ ©उमा जोशी

#सावरकर #Motivational  त्या पाहुन बेड्या हातामधल्या आई
का कोणाचेही अंतर द्रवले नाही
तुज सोडविण्याचा विडा उचलला आहे 
हा तुझ्याचसाठी यज्ञ मांडला आहे...१

घेतली शपथ मी मुक्त तुला करण्याची
अन दिली आहुती साऱ्या आयुष्याची 
मज विरह तुझा बघ मानवला गे नाही
आणण्या परत विनविले सागरा आई...२

धाडली पिस्तुले करुन तस्करी येथे
भय बाळगले ना गोऱ्यांचे मी तेथे
जमवली फौज मग नवतरुणांची मोठी
जे सज्ज प्राण देण्याला आईसाठी...३

अपशकुनी सन अठराशे सत्तावन्न
ती स्वप्ने झाली स्वातंत्र्याची भग्न
बंड ठरवुनी मग बासनात ते गेले
स्वातंत्र्य समर मी पुन्हा पुढे आणियले...४

मज आस नसे बघ कुठल्याही मानाची
आजन्म करावी सेवा तव चरणांची
तुज स्वतंत्र करण्या झिजली काया जेव्हा
मी पुत्र तुझा गे सुपुत्र ठरलो तेव्हा...५

भोगली सजा मी काळ्या पाण्याचीही
ना पर्वा केली कधीच जगण्याचीही 
तुज मुक्त पाहुनी झालो आनंदित मी
ना फिकीर केली भारतरत्नाची मी...६

©उमा जोशी

काळ झाला खूप त्याला खूप वर्षेही उलटली भूतकाळातील त्या मग ही पिढी घटना विसरली शोध घेताना कळाले राहिले मागेच काही ना कुणीही शोधले ते त्यात माझा दोष नाही घात झाला रेष जेव्हा पार केली जानकीने सत्त्व रक्षण खुद्द केले घेत काडी मैथिलीने रावणाचा वध करूनी राम झाला विश्वविजयी त्यागिले सीतेस हा पण काय त्याचा दोष नाही? हारला भावांस साऱ्या डाव लावी धर्मराजा द्रौपदीही हारला दुर्योधनाला माज आला याज्ञसेनी बोल लावी पांडवांची हार झाली चूक दाखविली तिने तर त्यात काही दोष नाही! पाहिले ना दैन्य कोठे राजवाडा हीच व्याप्ती भोगले ना दुःख काही रोगराई दूर होती एक दिवशी सामना पण दुःखदैन्याचाच झाला मुक्त होण्या बुद्ध झाला तो तयाचा दोष नाही! --- २९/०३/२०२४ ©उमा जोशी

#दोष #Hope  काळ झाला खूप त्याला खूप वर्षेही उलटली 
भूतकाळातील त्या मग ही पिढी घटना विसरली
शोध घेताना कळाले राहिले मागेच काही
ना कुणीही शोधले ते त्यात माझा दोष नाही

घात झाला रेष जेव्हा पार केली जानकीने 
सत्त्व रक्षण खुद्द केले घेत काडी मैथिलीने
रावणाचा वध करूनी राम झाला विश्वविजयी
त्यागिले सीतेस हा पण काय त्याचा दोष नाही?

हारला भावांस साऱ्या डाव लावी धर्मराजा
द्रौपदीही हारला दुर्योधनाला माज आला
याज्ञसेनी बोल लावी पांडवांची हार झाली
चूक दाखविली तिने तर त्यात काही दोष नाही! 

पाहिले ना दैन्य कोठे राजवाडा हीच व्याप्ती
भोगले ना दुःख काही रोगराई दूर होती 
एक दिवशी सामना पण दुःखदैन्याचाच झाला
मुक्त होण्या बुद्ध झाला तो तयाचा दोष नाही!
--- २९/०३/२०२४

©उमा जोशी

#Hope #दोष

13 Love

तो राबराबतो शेतामध्ये फार अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार बीज पेरलेले वाया जाते सारे पण गडी कधीही मानत नाही हार थांबून राहणे माहित नाही त्याला अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला रोवून घट्ट तो पाय उभा मातीत कामास सज्ज जोडून बैलजोडीला  राबतात त्याच्या कुटुंबातले सारे झेलतात सगळे अंगावरती वारे  थकतो जीव तरी थांबत नाही कोणी डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे भाव मिळत नाही इतके करून त्याला तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या   कष्टाने तो सावरतो आवेगाला सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना? एवढा करा की विचार जाता जाता --- ३१/०७/२०२३ ©उमा जोशी

#शेतकरी  तो राबराबतो शेतामध्ये फार

अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार

बीज पेरलेले वाया जाते सारे

पण गडी कधीही मानत नाही हार


थांबून राहणे माहित नाही त्याला

अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला

रोवून घट्ट तो पाय उभा मातीत

कामास सज्ज जोडून बैलजोडीला 


राबतात त्याच्या कुटुंबातले सारे

झेलतात सगळे अंगावरती वारे 

थकतो जीव तरी थांबत नाही कोणी

डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे


भाव मिळत नाही इतके करून त्याला

तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला

धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या  

कष्टाने तो सावरतो आवेगाला


सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता

पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता

हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना?

एवढा करा की विचार जाता जाता

--- ३१/०७/२०२३

©उमा जोशी

सरस्वती तू भगवति अंबे दुर्गा भवानि आई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।धृ।। नटून थटून नेसून साड्या देवळात त्या जाती गं कुंकू वेणी गुलाब अत्तर पूजेसाठी घेती गं खण अन नारळ घेउन ओटी भरते हरेक बाई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।१।। नवरात्रीला भजन आरत्या नऊ दिवस अन राती गं भोंडल्या सवे गरबा रंगे तुझिया सेवेसाठी गं तुझ्या दर्शने सगळा थकवा पळून माझा जाई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।२।। कलियुगामध्ये ठायी ठायी असूर दानव दिसती गं प्रत्येकीला करण्या रक्षण सत्वाचे दे शक्ती गं तुझ्या कृपेने अवघे संकट रसातळाला जाई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।३।। अखंड महिमा मुखी जगाच्या अंबे गाजत राही गं त्रिदेवसुद्धा तुझी जगाला सांगत असती महती गं कृपाप्रसादे सर्व जगाला सुखी ठेव तू बाई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।४।। ---१८/१०/२०२३ @१२:१५ ©उमा जोशी

#हरिभगिनी #धावा #navratri  सरस्वती तू भगवति अंबे दुर्गा भवानि आई गं 
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।धृ।।

नटून थटून नेसून साड्या देवळात त्या जाती गं
कुंकू वेणी गुलाब अत्तर पूजेसाठी घेती गं 
खण अन नारळ घेउन ओटी भरते हरेक बाई गं 
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।१।।

नवरात्रीला भजन आरत्या नऊ दिवस अन राती गं
भोंडल्या सवे गरबा रंगे तुझिया सेवेसाठी गं
तुझ्या दर्शने सगळा थकवा पळून माझा जाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।२।।

कलियुगामध्ये ठायी ठायी असूर दानव दिसती गं
प्रत्येकीला करण्या रक्षण सत्वाचे दे शक्ती गं
तुझ्या कृपेने अवघे संकट रसातळाला जाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।३।।

अखंड महिमा मुखी जगाच्या अंबे गाजत राही गं
त्रिदेवसुद्धा तुझी जगाला सांगत असती महती गं
कृपाप्रसादे सर्व जगाला सुखी ठेव तू बाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।४।।
---१८/१०/२०२३ @१२:१५

©उमा जोशी

रोज सकाळी तुझी आठवण येते आई निघून जाण्याची अंमळ तू केली घाई सहवास तुझा अजून वाटे हवाहवासा तुझ्या विना गे एकाकी मी पडले बाई सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी तुला सांगणे निरागस जणू होते माझे असे वागणे मला आवडे ऐकण्यातली एकतानता आणि तल्लीन सांगण्यातले माझे होणे उत्तर नव्हते तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांचे तरी कधी ना टाळलेस तू ऐकायाचे सांगून तुला सारे काही मी निश्चीन्त हलके हलके संवादातुन वाटायाचे आज पुन्हा उद्विग्न असे मन पण तू नाही मी एकाकी सोबत माझ्या कोणी नाही सांगशील तू काय? आठवत बसले आहे अनेक मिळती पर्याय मला पण सुचे न काही किती सावरू तरी नावरे मनातले कढ ठरे भावना इथे बये बुद्धीच्या वरचढ क्षणाक्षणाला प्रसंग मोठे उभे ठाकती तुला स्मरूनी चालत आहे वाटा अवघड ©उमा जोशी

#अनलज्वाला #navratri #आई  रोज सकाळी तुझी आठवण येते आई

निघून जाण्याची अंमळ तू केली घाई

सहवास तुझा अजून वाटे हवाहवासा

तुझ्या विना गे एकाकी मी पडले बाई


सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी तुला सांगणे

निरागस जणू होते माझे असे वागणे

मला आवडे ऐकण्यातली एकतानता

आणि तल्लीन सांगण्यातले माझे होणे


उत्तर नव्हते तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांचे

तरी कधी ना टाळलेस तू ऐकायाचे

सांगून तुला सारे काही मी निश्चीन्त

हलके हलके संवादातुन वाटायाचे


आज पुन्हा उद्विग्न असे मन पण तू नाही

मी एकाकी सोबत माझ्या कोणी नाही

सांगशील तू काय? आठवत बसले आहे

अनेक मिळती पर्याय मला पण सुचे न काही


किती सावरू तरी नावरे मनातले कढ

ठरे भावना इथे बये बुद्धीच्या वरचढ

क्षणाक्षणाला प्रसंग मोठे उभे ठाकती

तुला स्मरूनी चालत आहे वाटा अवघड

©उमा जोशी
Trending Topic