White ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावल | मराठी कविता

"White ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते भावाच्या सुखाने सुखावते तर दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते संकटकाळी भावाची बहिणीच नाही तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते लेखनः-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले"

 White ती बहीण असते
 रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते

मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते
भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, 
फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते

एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते 
भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते

भावाच्या सुखाने सुखावते तर 
दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते 
संकटकाळी भावाची बहिणीच नाही 
तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते
शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते

तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे 
तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा 
तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो
ती बहीण असते
रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते

लेखनः-आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले

White ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते भावाच्या सुखाने सुखावते तर दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते संकटकाळी भावाची बहिणीच नाही तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते लेखनः-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले

#raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता

People who shared love close

More like this

Trending Topic