"अश्रू नव्हे, शरनीरा तें, मन भावविभोर तुम्हां कारणें..!
धन्य जन्म जाहला, श्रीराम चरण लाभले तुम्हां कारणें..!
तुमचे वचन सम आम्हां रामपाठ,
शरयू चे नीर भरीला शरनीरा काठ,
रामधुली ची देवनाथी भेटगाठ,
अंजनीग्रामी जन्म फळासीं आला..
भाग्य थोर आम्हां लाभले तुम्हां कारणें...!
अश्रू नव्हे, शरनीरा तें, मन भावविभोर तुम्हां कारणें..!
धन्य जन्म जाहला, श्रीराम चरण लाभले तुम्हां कारणें..!"
-धिरज र. भागवतकर. अंजनीग्राम.
©FalgunWords