तृषा...‌ फिरुनी इथे पाऊल का माझे थबकते आजही डोळ् | मराठी शायरी आ

" तृषा...‌ फिरुनी इथे पाऊल का माझे थबकते आजही डोळ्यांत भेटीची कशी आशा चमकते आजही नजरानजर झाली अशी धुंदावला बघ जीव हा फुलपाखरू स्वच्छंद ते स्वप्नी विहरते आजही ती भेटता होई दिवस अन् सांज हो जाताच ती कवटाळुनी एकांत ही रात्र तळमळते आजही हसणे तिचे दिसणे तिचे मधुमास होता बहरला गंध उडला रंग नुरला का फुल उमलते आजही गझलेमध्ये कवितेमध्ये गुंफीत गेलो मी तिला निवृत्त केली लेखणी का काव्य स्फुरते आजही अव्यक्त माझी प्रीत का हृदयामध्येच गुदमरली कळली तिलाही ना कधी मज बोच सलते आजही ना शोक विरहाचा तिच्या ना बोल नशिबा लावतो पण ओढ त्या नात्यातली व्याकूळ करते आजही ©प्रितफुल (प्रित) "

तृषा...‌ फिरुनी इथे पाऊल का माझे थबकते आजही डोळ्यांत भेटीची कशी आशा चमकते आजही नजरानजर झाली अशी धुंदावला बघ जीव हा फुलपाखरू स्वच्छंद ते स्वप्नी विहरते आजही ती भेटता होई दिवस अन् सांज हो जाताच ती कवटाळुनी एकांत ही रात्र तळमळते आजही हसणे तिचे दिसणे तिचे मधुमास होता बहरला गंध उडला रंग नुरला का फुल उमलते आजही गझलेमध्ये कवितेमध्ये गुंफीत गेलो मी तिला निवृत्त केली लेखणी का काव्य स्फुरते आजही अव्यक्त माझी प्रीत का हृदयामध्येच गुदमरली कळली तिलाही ना कधी मज बोच सलते आजही ना शोक विरहाचा तिच्या ना बोल नशिबा लावतो पण ओढ त्या नात्यातली व्याकूळ करते आजही ©प्रितफुल (प्रित)

#तृषा अत्रंगी रे...!!!

People who shared love close

More like this

Trending Topic