प्रितफुल (प्रित)

प्रितफुल (प्रित)

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीशायरी  मंदाकिनी....

सुटले ग्रहण हटला तिमिर आता तरी दिसशील ना 
माझी तुझी एकच तृषा मग परतुनी येशील ना 

गर्दीत जखमांच्या जुन्या अव्यक्त नाते हरवले
समरूप करुनी लाटेस या हे सागरा घेशील ना 

हे मान्य की धुडकावले सारे सुगंधी सोहळे
उबदार जाणीवांतला ऋतु साजिरा देशील ना 

अस्तित्व वावरते तुझे श्र्वासांत अन् भासांतही 
हृदयातला लामणदिवा होऊनिया जळशील ना 

स्वप्नील डोळ्यांचा तुझ्या वेडावतो मज कैफ रे
माझ्याच प्रीतीची नशा आजन्म बघ करशील ना 

अक्षम्य केला मी गुन्हा पण भोगली का तू सजा
बेडीत लग्नाच्या परी मज बांधुनी नेशील ना 

तू आस अन् विश्वास मी जन्मांतरीचे बंध हे
मंदाकिनी मी तळपती अवकाश तू होशील ना

©प्रितफुल (प्रित)

मंदाकिनी.... सुटले ग्रहण हटला तिमिर आता तरी दिसशील ना माझी तुझी एकच तृषा मग परतुनी येशील ना गर्दीत जखमांच्या जुन्या अव्यक्त नाते हरवले समरूप करुनी लाटेस या हे सागरा घेशील ना हे मान्य की धुडकावले सारे सुगंधी सोहळे उबदार जाणीवांतला ऋतु साजिरा देशील ना अस्तित्व वावरते तुझे श्र्वासांत अन् भासांतही हृदयातला लामणदिवा होऊनिया जळशील ना स्वप्नील डोळ्यांचा तुझ्या वेडावतो मज कैफ रे माझ्याच प्रीतीची नशा आजन्म बघ करशील ना अक्षम्य केला मी गुन्हा पण भोगली का तू सजा बेडीत लग्नाच्या परी मज बांधुनी नेशील ना तू आस अन् विश्वास मी जन्मांतरीचे बंध हे मंदाकिनी मी तळपती अवकाश तू होशील ना ©प्रितफुल (प्रित)

72 View

#मराठीशायरी #मनासारखे  मनासारखे.....

मनासारखे तू अता वाग थोडे
नको घाबरू तू पुन्हा माग थोडे

धुळीला मिळाले सुखांचे मनोरे
नशीबात आले पुन्हा डाग थोडे

मनाला कुणाचा मिळेना सहारा
वसंती फुलावे इथे बाग थोडे

तिला भेटलेला खरा यार होता
किती संधिसाधू महाभाग थोडे

तुझ्या आठवांनी मला वेड लागे
सुचावे तुलाही विरहराग थोडे

अजूनी उभी आस लावून प्रीती  
दिली तूच वचने, सख्या जाग थोडे

दिली आहुती आज माझीच मी रे
करावेस तू ही कधी त्याग थोडे

प्रितफुल (प्रित)

©प्रितफुल (प्रित)

#मनासारखे अत्रंगी रे...!!! @Kavita Pudale

63 View

#मराठीशायरी #तृषा  
तृषा...‌

फिरुनी इथे पाऊल का माझे थबकते आजही
डोळ्यांत भेटीची कशी आशा चमकते आजही

नजरानजर झाली अशी धुंदावला बघ जीव हा
फुलपाखरू स्वच्छंद ते स्वप्नी विहरते आजही

ती भेटता होई दिवस अन् सांज हो जाताच ती
कवटाळुनी एकांत ही रात्र तळमळते आजही

हसणे तिचे दिसणे तिचे मधुमास होता बहरला
गंध उडला रंग नुरला का फुल उमलते आजही

गझलेमध्ये कवितेमध्ये गुंफीत गेलो मी तिला
निवृत्त केली लेखणी का काव्य स्फुरते आजही

अव्यक्त माझी प्रीत का हृदयामध्येच गुदमरली
कळली तिलाही ना कधी मज बोच सलते आजही

ना शोक विरहाचा तिच्या ना बोल नशिबा लावतो
पण ओढ त्या नात्यातली व्याकूळ करते आजही

©प्रितफुल (प्रित)

#तृषा अत्रंगी रे...!!!

72 View

#मराठीकविता  प्रितकाव्य (एकादशाक्षरी)....

सुख...

लागत नाही सागराचा थांग  
लाख खटाटोप करते लाट 
गवसत नाही सुखाचा माग
खडतर ही जीवनाची वाट 

सुख असते एक मृगजळ
जसे पानांवरले दवमोती 
धरू जाता फसगत अटळ
क्षणांत सुखे मातीमय होती

चुकूनही वाच्यता नका करू 
सुख जपावे मनाच्या गर्भात
बुडूनिया जाते सुखाचे तारू
मांडिता सोहळे चारचौघांत

मोहफुलासम सुखाचा गंध 
वेडावतो तमाम जगताला
कणभर सुखात होती धुंद
कवळूनी मणभर दुःखाला

नियतिकडेच असती फासे
खेळवी अविरत हवे तसे
 दैवाचा न्याय वेगळाच असे
मग कुणी रडे वा कुणी हसे

जुगार भावनांचा चाले असा
तन, मन, धन पणा लागती 
दुःख म्हणजे निःपक्ष आरसा
उमगती त्यातून खरी नाती

समाधानात जो सुख मानतो
ज्याला मिळे तो धनी आनंदाचा
परिस टाकून काच वेचतो 
तो कर्मदरिद्री शतजन्माचा

©प्रितफुल (प्रित)

सुख

126 View

#मराठीप्रेम  जमले मला कधी ना तालांसुरांत गाणे 
झंकारल्या मनाच्या तारा तुला पहाता

 प्रितफुल (प्रित)

©प्रितफुल

अत्रंगी रे...!!!

126 View

प्रितकाव्य (एकादशाक्षरी) मोरया नमनाचा "नैवेद्य" गणेशास "भाव-भक्तीच्याच" दुर्वा वाहूया "काव्यपुष्पांची" करूनी आरास गजरात "मोरयाच्या" न्हाऊया प्रितफुल (प्रित)©️®️

#ganesha #poem  प्रितकाव्य (एकादशाक्षरी)

मोरया

नमनाचा "नैवेद्य" गणेशास
"भाव-भक्तीच्याच" दुर्वा वाहूया
 "काव्यपुष्पांची" करूनी आरास 
 गजरात "मोरयाच्या" न्हाऊया

प्रितफुल (प्रित)©️®️

प्रितकाव्य (एकादशाक्षरी) मोरया नमनाचा "नैवेद्य" गणेशास "भाव-भक्तीच्याच" दुर्वा वाहूया "काव्यपुष्पांची" करूनी आरास गजरात "मोरयाच्या" न्हाऊया

4 Love

Trending Topic