मंदाकिनी.... सुटले ग्रहण हटला तिमिर आता तरी दिसशी | मराठी शायरी आणि गझ

"मंदाकिनी.... सुटले ग्रहण हटला तिमिर आता तरी दिसशील ना माझी तुझी एकच तृषा मग परतुनी येशील ना गर्दीत जखमांच्या जुन्या अव्यक्त नाते हरवले समरूप करुनी लाटेस या हे सागरा घेशील ना हे मान्य की धुडकावले सारे सुगंधी सोहळे उबदार जाणीवांतला ऋतु साजिरा देशील ना अस्तित्व वावरते तुझे श्र्वासांत अन् भासांतही हृदयातला लामणदिवा होऊनिया जळशील ना स्वप्नील डोळ्यांचा तुझ्या वेडावतो मज कैफ रे माझ्याच प्रीतीची नशा आजन्म बघ करशील ना अक्षम्य केला मी गुन्हा पण भोगली का तू सजा बेडीत लग्नाच्या परी मज बांधुनी नेशील ना तू आस अन् विश्वास मी जन्मांतरीचे बंध हे मंदाकिनी मी तळपती अवकाश तू होशील ना ©प्रितफुल (प्रित) "

मंदाकिनी.... सुटले ग्रहण हटला तिमिर आता तरी दिसशील ना माझी तुझी एकच तृषा मग परतुनी येशील ना गर्दीत जखमांच्या जुन्या अव्यक्त नाते हरवले समरूप करुनी लाटेस या हे सागरा घेशील ना हे मान्य की धुडकावले सारे सुगंधी सोहळे उबदार जाणीवांतला ऋतु साजिरा देशील ना अस्तित्व वावरते तुझे श्र्वासांत अन् भासांतही हृदयातला लामणदिवा होऊनिया जळशील ना स्वप्नील डोळ्यांचा तुझ्या वेडावतो मज कैफ रे माझ्याच प्रीतीची नशा आजन्म बघ करशील ना अक्षम्य केला मी गुन्हा पण भोगली का तू सजा बेडीत लग्नाच्या परी मज बांधुनी नेशील ना तू आस अन् विश्वास मी जन्मांतरीचे बंध हे मंदाकिनी मी तळपती अवकाश तू होशील ना ©प्रितफुल (प्रित)

People who shared love close

More like this

Trending Topic