हे हुंदके ही आता रुसूनी अबोल झाले डोळे भरून येताच | मराठी Poetry

"हे हुंदके ही आता रुसूनी अबोल झाले डोळे भरून येताच अश्रूंचे शब्द झाले आसवे जरी माझ्या डोळ्यांतुनी निघाली होती तुझीच सारी लपवून ठेवलेली मी बघण्या तुलाच आलो जेव्हा तुझ्याच दारी कळलेच नाही केव्हा सोडून गाव आलो मग एकटेपणाची सोबत कमाल झाली मी एकट्यात रमलो माझाच मित्र झालो तरीही नाव ओठी आले तुझेच जेव्हा मी त्यास तुळस समजून अखेरचा निघालो स्वप्नील शांताराम जाधव २६-०७-२०२३ ©Swapnil Shantaram Jadhav"

 हे हुंदके ही आता रुसूनी अबोल झाले
डोळे भरून येताच अश्रूंचे शब्द झाले

आसवे जरी माझ्या डोळ्यांतुनी निघाली
होती तुझीच सारी लपवून ठेवलेली

मी बघण्या तुलाच आलो जेव्हा तुझ्याच दारी
कळलेच नाही केव्हा सोडून गाव आलो

मग एकटेपणाची सोबत कमाल झाली
मी एकट्यात रमलो माझाच मित्र झालो

तरीही नाव ओठी आले तुझेच जेव्हा
मी त्यास तुळस समजून अखेरचा निघालो

स्वप्नील शांताराम जाधव
२६-०७-२०२३

©Swapnil Shantaram Jadhav

हे हुंदके ही आता रुसूनी अबोल झाले डोळे भरून येताच अश्रूंचे शब्द झाले आसवे जरी माझ्या डोळ्यांतुनी निघाली होती तुझीच सारी लपवून ठेवलेली मी बघण्या तुलाच आलो जेव्हा तुझ्याच दारी कळलेच नाही केव्हा सोडून गाव आलो मग एकटेपणाची सोबत कमाल झाली मी एकट्यात रमलो माझाच मित्र झालो तरीही नाव ओठी आले तुझेच जेव्हा मी त्यास तुळस समजून अखेरचा निघालो स्वप्नील शांताराम जाधव २६-०७-२०२३ ©Swapnil Shantaram Jadhav

#Swapys_Diaries
#Pennings
#eternal_love
#feels_lonely

People who shared love close

More like this

Trending Topic