Swapnil Shantaram Jadhav

Swapnil Shantaram Jadhav Lives in Mumbai, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video

White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी उगाच राग येतो, अश्रू उगाच येती एक आई द्या मला हो मला ओळखणारी ©Swapnil Shantaram Jadhav

#Swapys_Diaries #Pennings #Random  White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला
एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी

अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे
एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी

स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे 
एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी 

रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा
शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी

उगाच राग येतो, अश्रू उगाच येती
एक आई द्या मला हो मला ओळखणारी

©Swapnil Shantaram Jadhav
#Swapys_Diaries #Its_about_ #Pennings  White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला
एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी

अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे
एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी

स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे 
एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी 

रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा
शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी

उगाच राग येतो, अश्रू उगाच येती
एक आई द्या मला हो मला ओळखणारी

©Swapnil Shantaram Jadhav

किनाऱ्यावरच्या वाळू अन् लाटांचे जन्मांतराचे वैर आहे तरीही ह्या वादात वाऱ्याचे बोलणे गैर आहे... ©Swapnil Shantaram Jadhav

#Swapys_Diaries #OceanBeach #Pennings  किनाऱ्यावरच्या वाळू अन् लाटांचे 
जन्मांतराचे वैर आहे
तरीही ह्या वादात 
वाऱ्याचे बोलणे गैर आहे...

©Swapnil Shantaram Jadhav

हे हुंदके ही आता रुसूनी अबोल झाले डोळे भरून येताच अश्रूंचे शब्द झाले आसवे जरी माझ्या डोळ्यांतुनी निघाली होती तुझीच सारी लपवून ठेवलेली मी बघण्या तुलाच आलो जेव्हा तुझ्याच दारी कळलेच नाही केव्हा सोडून गाव आलो मग एकटेपणाची सोबत कमाल झाली मी एकट्यात रमलो माझाच मित्र झालो तरीही नाव ओठी आले तुझेच जेव्हा मी त्यास तुळस समजून अखेरचा निघालो स्वप्नील शांताराम जाधव २६-०७-२०२३ ©Swapnil Shantaram Jadhav

#Swapys_Diaries #eternal_love #feels_lonely #Pennings  हे हुंदके ही आता रुसूनी अबोल झाले
डोळे भरून येताच अश्रूंचे शब्द झाले

आसवे जरी माझ्या डोळ्यांतुनी निघाली
होती तुझीच सारी लपवून ठेवलेली

मी बघण्या तुलाच आलो जेव्हा तुझ्याच दारी
कळलेच नाही केव्हा सोडून गाव आलो

मग एकटेपणाची सोबत कमाल झाली
मी एकट्यात रमलो माझाच मित्र झालो

तरीही नाव ओठी आले तुझेच जेव्हा
मी त्यास तुळस समजून अखेरचा निघालो

स्वप्नील शांताराम जाधव
२६-०७-२०२३

©Swapnil Shantaram Jadhav

तू, मी, तुझे,माझे तुझ्या,माझ्या आपले वगैरे.... हे इतकेच तर जग असते दोघांचे बाकी सारे व्यर्थ वगैरे वगैरे.... ©Swapnil Shantaram Jadhav

#Swapys_Diaries #eternal_bond  तू, मी, तुझे,माझे
तुझ्या,माझ्या आपले वगैरे....
हे इतकेच तर जग असते दोघांचे
बाकी सारे व्यर्थ वगैरे वगैरे....

©Swapnil Shantaram Jadhav

तुझ्या माझ्या मनातला मनातल्या गाण्यातला तुझ्या माझ्या बोलण्यातला रुसलेल्या अबोल्यातला तुझ्या माझ्या भेटण्यातला नकळत झालेल्या स्पर्शातला तुझ्या माझ्या श्वासातला तुझ्या माझ्या सहवासातला तुझ्या माझ्या प्रणयातला तुझ्या माझ्या हास्यातला विरहातल्या वेदनेतला अश्रुंच्या थेंबातला तुझ्या माझ्या बालिशपणातला तुझ्या माझ्या शहाणपणातला तुझ्या माझ्या पावसाळ्यातला छत्री असुनही भिजण्यातला तुझ्या माझ्या कवितेतला तुझा माझ्यातला........माझा तुझ्यातला अगं सुर तोच आहे.... बघ ना.... काय म्हणत्येस... आठवत नाहीए.... बरं हरकत नाही सगळ्याचा पुन्हा रियाझ कर रियाझ.... चला "साऽऽऽऽ" ©Swapnil Shantaram Jadhav

 तुझ्या माझ्या मनातला
मनातल्या गाण्यातला
तुझ्या माझ्या बोलण्यातला 
रुसलेल्या अबोल्यातला
तुझ्या माझ्या भेटण्यातला
नकळत झालेल्या स्पर्शातला
तुझ्या माझ्या श्वासातला
तुझ्या माझ्या सहवासातला
तुझ्या माझ्या प्रणयातला 
तुझ्या माझ्या हास्यातला
विरहातल्या वेदनेतला अश्रुंच्या थेंबातला
तुझ्या माझ्या बालिशपणातला
तुझ्या माझ्या शहाणपणातला
तुझ्या माझ्या पावसाळ्यातला
छत्री असुनही भिजण्यातला
तुझ्या माझ्या कवितेतला 
तुझा माझ्यातला........माझा तुझ्यातला 
अगं सुर तोच आहे.... बघ ना.... 
काय म्हणत्येस...
आठवत नाहीए.... 
बरं हरकत नाही
सगळ्याचा पुन्हा रियाझ कर रियाझ....
चला "साऽऽऽऽ"

©Swapnil Shantaram Jadhav

तुझ्या माझ्या मनातला मनातल्या गाण्यातला तुझ्या माझ्या बोलण्यातला रुसलेल्या अबोल्यातला तुझ्या माझ्या भेटण्यातला नकळत झालेल्या स्पर्शातला तुझ्या माझ्या श्वासातला तुझ्या माझ्या सहवासातला तुझ्या माझ्या प्रणयातला तुझ्या माझ्या हास्यातला विरहातल्या वेदनेतला अश्रुंच्या थेंबातला तुझ्या माझ्या बालिशपणातला तुझ्या माझ्या शहाणपणातला तुझ्या माझ्या पावसाळ्यातला छत्री असुनही भिजण्यातला तुझ्या माझ्या कवितेतला तुझा माझ्यातला........माझा तुझ्यातला अगं सुर तोच आहे.... बघ ना.... काय म्हणत्येस... आठवत नाहीए.... बरं हरकत नाही सगळ्याचा पुन्हा रियाझ कर रियाझ.... चला "साऽऽऽऽ" ©Swapnil Shantaram Jadhav

8 Love

Trending Topic