आई,नकोय ग मला हे सगळं फक्त तूझ्या कुशीत रहायचय खो

"आई,नकोय ग मला हे सगळं फक्त तूझ्या कुशीत रहायचय खोटे हेवेदावे नकोच मजला फक्त तूझी छकुली बनून जगायचंय ती ओढाताण मज वेड लावतसे स्तुतींच्या त्या चार गोष्टींनी मज दृष्ट लागतसे चार दिसांचे नाते सर्वांचे कधी दर्दी कधी हमदर्दी नकोत इमले नकोच पैसा मला प्यारी झोपडीच सादी आई मीही गर्दीत हरवून जातेय माझ्यातल्या तूझी छबी मात्र जपून ठेवतेय मजला नेहमीच तू तुझ्या जवळच ठेवत जा एकटं वाटत असताना चार शब्द माझ्या उरी साठवत जा पूनम श. दे कुलकर्णी"

 आई,नकोय ग मला हे सगळं 
फक्त तूझ्या कुशीत रहायचय
खोटे हेवेदावे नकोच मजला
फक्त तूझी छकुली बनून जगायचंय

ती ओढाताण मज 
वेड लावतसे
स्तुतींच्या त्या चार गोष्टींनी
मज दृष्ट लागतसे

चार दिसांचे नाते सर्वांचे
कधी दर्दी कधी हमदर्दी
नकोत इमले नकोच पैसा
मला प्यारी झोपडीच सादी

आई मीही गर्दीत 
हरवून जातेय
माझ्यातल्या तूझी छबी
मात्र जपून ठेवतेय

मजला नेहमीच तू 
तुझ्या जवळच ठेवत जा
एकटं वाटत असताना
चार शब्द माझ्या उरी साठवत जा
पूनम श. दे कुलकर्णी

आई,नकोय ग मला हे सगळं फक्त तूझ्या कुशीत रहायचय खोटे हेवेदावे नकोच मजला फक्त तूझी छकुली बनून जगायचंय ती ओढाताण मज वेड लावतसे स्तुतींच्या त्या चार गोष्टींनी मज दृष्ट लागतसे चार दिसांचे नाते सर्वांचे कधी दर्दी कधी हमदर्दी नकोत इमले नकोच पैसा मला प्यारी झोपडीच सादी आई मीही गर्दीत हरवून जातेय माझ्यातल्या तूझी छबी मात्र जपून ठेवतेय मजला नेहमीच तू तुझ्या जवळच ठेवत जा एकटं वाटत असताना चार शब्द माझ्या उरी साठवत जा पूनम श. दे कुलकर्णी

#आई

People who shared love close

More like this

Trending Topic