पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी Lives in Ausa, Maharashtra, India

#poetry,

  • Latest
  • Popular
  • Video

तूला घडवताना मी 'माती 'जाहले, बहुअंगी तूझ्या रुपाची मी 'आवृत्ती 'जाहले... तूझ्या प्रत्येक यशाची एक अनोखी 'स्मृती 'जाहले, तूझ्या अपयशाच्या सुरात नवीन एक' कृती' जाहले... उमेदीच्या काळात तुझी 'शक्ती' बनून राहले, कंटाळवाण्या तूझ्या तालाना 'सक्ती 'बनून राहले... पोरक्या तूझ्या काही क्षणात निराळी 'नाती'बनून पाहले, रिकाम्या तूझ्या खिशाची कधी' खाती' बनून पाहले.. तूझ्या आयुष्याच्या किनाऱ्याची 'रेती'बनून राहले, अन प्रकाशणाऱ्या तूझ्या मनाची 'ज्योती' बनून पाहले... खरंच गरज होती का विशेष 'व्यक्ती'बनण्याची? क्षण सारे निसटून गेले 'रीती'पोकळी बनून राहले.. ©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#MarathiKavita #stairs  तूला  घडवताना
मी 'माती 'जाहले,
बहुअंगी तूझ्या रुपाची
मी 'आवृत्ती 'जाहले...
तूझ्या प्रत्येक यशाची
एक अनोखी 'स्मृती 'जाहले,
तूझ्या अपयशाच्या सुरात
नवीन एक' कृती' जाहले...
उमेदीच्या काळात तुझी
'शक्ती' बनून राहले,
कंटाळवाण्या तूझ्या तालाना
'सक्ती 'बनून राहले...
पोरक्या तूझ्या काही क्षणात
निराळी 'नाती'बनून पाहले,
रिकाम्या तूझ्या खिशाची
कधी' खाती' बनून पाहले..
तूझ्या आयुष्याच्या किनाऱ्याची 
'रेती'बनून राहले,
अन प्रकाशणाऱ्या तूझ्या मनाची
'ज्योती' बनून पाहले...
खरंच गरज होती का
विशेष 'व्यक्ती'बनण्याची?
क्षण सारे निसटून गेले
'रीती'पोकळी बनून राहले..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

का कुणास ठाऊक मन नाही मानत, पश्चिमेची सांगता होतेय, पूर्वेची नको वाटतेय सोबत... अस वाटत एक पर्व संपत आहे, मोठी शिकार करणारा जंगलाचा राजा का थकत आहे😢? ✍️पूनम दे.कुलकर्णी

 का कुणास ठाऊक 
मन नाही मानत,
पश्चिमेची सांगता होतेय,
पूर्वेची नको वाटतेय सोबत...

अस वाटत एक पर्व संपत आहे,
मोठी शिकार करणारा जंगलाचा राजा का थकत आहे😢?
✍️पूनम दे.कुलकर्णी

का कुणास ठाऊक मन नाही मानत, पश्चिमेची सांगता होतेय, पूर्वेची नको वाटतेय सोबत... अस वाटत एक पर्व संपत आहे, मोठी शिकार करणारा जंगलाचा राजा का थकत आहे😢? ✍️पूनम दे.कुलकर्णी

13 Love

#मराठी #MarathiKavita #लेखक #marathi #writer #lekhak

तू ऊर्जा तू शक्ती , तू दुर्गा तू भवानी.. घे शपथ आता, तूच दृष्ट संहारींनी... येईल कोणी पशु, लचके तूझे तोडण्या.. दूर झाल्यात कितीतरी , मानेवरील ओढण्या.. त्याच ओढणीचा करशील फास, नराधमाशी लढण्याचा घे तू ध्यास, बंदिस्त करतील बाहू रोखतील किती श्वास रणरागिणी तू लढ ,खूप झाले आता बास....... ✍️पूनम श.दे. कुलकर्णी

#Stoprape  तू ऊर्जा तू शक्ती ,
तू दुर्गा तू भवानी..
घे शपथ आता,
तूच दृष्ट संहारींनी...

येईल कोणी पशु,
लचके तूझे तोडण्या..
दूर झाल्यात कितीतरी ,
मानेवरील ओढण्या..

त्याच ओढणीचा करशील फास,
नराधमाशी लढण्याचा घे तू ध्यास,
बंदिस्त करतील बाहू रोखतील किती श्वास
रणरागिणी तू लढ ,खूप झाले आता बास.......
✍️पूनम श.दे. कुलकर्णी

#Stoprape

14 Love

आई,नकोय ग मला हे सगळं फक्त तूझ्या कुशीत रहायचय खोटे हेवेदावे नकोच मजला फक्त तूझी छकुली बनून जगायचंय ती ओढाताण मज वेड लावतसे स्तुतींच्या त्या चार गोष्टींनी मज दृष्ट लागतसे चार दिसांचे नाते सर्वांचे कधी दर्दी कधी हमदर्दी नकोत इमले नकोच पैसा मला प्यारी झोपडीच सादी आई मीही गर्दीत हरवून जातेय माझ्यातल्या तूझी छबी मात्र जपून ठेवतेय मजला नेहमीच तू तुझ्या जवळच ठेवत जा एकटं वाटत असताना चार शब्द माझ्या उरी साठवत जा पूनम श. दे कुलकर्णी

#आई  आई,नकोय ग मला हे सगळं 
फक्त तूझ्या कुशीत रहायचय
खोटे हेवेदावे नकोच मजला
फक्त तूझी छकुली बनून जगायचंय

ती ओढाताण मज 
वेड लावतसे
स्तुतींच्या त्या चार गोष्टींनी
मज दृष्ट लागतसे

चार दिसांचे नाते सर्वांचे
कधी दर्दी कधी हमदर्दी
नकोत इमले नकोच पैसा
मला प्यारी झोपडीच सादी

आई मीही गर्दीत 
हरवून जातेय
माझ्यातल्या तूझी छबी
मात्र जपून ठेवतेय

मजला नेहमीच तू 
तुझ्या जवळच ठेवत जा
एकटं वाटत असताना
चार शब्द माझ्या उरी साठवत जा
पूनम श. दे कुलकर्णी

#आई

12 Love

आली गौराई अंगणी भादव्याची जेव्हा सप्तमी यायची , घरी जाण्याची लगबग सुरू व्हायची. मज ओढ माझ्या गौराईची, तिज ओढ माझ्या पावलांची. तिची सेवा करताना रात्र आमची जागायची, घरच्यासोबत गौरीही मजला थोडी मदत करायची. दारी आमच्या कुंकवाची पाऊले उमटतात , सडा रांगोळीने मग दाही दिशा सजतात. बाप्पा माझा दोन गौरीमध्ये शोभतो , पिलवंडाच्या ऐटीने मखर मंदिरावांनी भासतो. दुसऱ्या दिवशी पक्वान्नाची पंगत भारी असते, केळीच्या पानावर पदार्थांची मांडणी खास असते. तीन दिवस गौरी माझी सुखात विसावते, निरोप देताना तिज डोळ्यात पाणी मात्र डबडबते. यावर्षी गौरी माझी घरभर मला शोधत असणार, भोळे माझ्या कुटुंबीयांच कौतुक मात्र करणार. जास्त काही नाही मागत फक्त आशीर्वाद देऊन जा, परत तुझी सेवा करण्याचे भाग्य मजला देऊन जा. ❤️✍️पूनम देवीदासराव कुलकर्णी

 आली गौराई अंगणी

भादव्याची जेव्हा सप्तमी यायची ,
घरी जाण्याची लगबग सुरू व्हायची.
मज ओढ माझ्या गौराईची,
तिज ओढ माझ्या पावलांची.
तिची सेवा करताना रात्र आमची जागायची,
घरच्यासोबत गौरीही मजला थोडी मदत करायची.
दारी आमच्या कुंकवाची पाऊले उमटतात ,
सडा रांगोळीने मग दाही दिशा सजतात.
बाप्पा माझा दोन गौरीमध्ये शोभतो ,
पिलवंडाच्या ऐटीने मखर मंदिरावांनी भासतो.
दुसऱ्या दिवशी पक्वान्नाची पंगत भारी असते,
केळीच्या पानावर पदार्थांची मांडणी खास असते.
तीन दिवस गौरी माझी सुखात विसावते,
निरोप देताना तिज डोळ्यात पाणी मात्र डबडबते.
यावर्षी गौरी माझी घरभर मला शोधत असणार,
भोळे माझ्या कुटुंबीयांच कौतुक मात्र करणार.
जास्त काही नाही मागत फक्त आशीर्वाद देऊन जा,
परत तुझी सेवा करण्याचे भाग्य मजला देऊन जा.
❤️✍️पूनम देवीदासराव कुलकर्णी

आली गौराई अंगणी भादव्याची जेव्हा सप्तमी यायची , घरी जाण्याची लगबग सुरू व्हायची. मज ओढ माझ्या गौराईची, तिज ओढ माझ्या पावलांची. तिची सेवा करताना रात्र आमची जागायची, घरच्यासोबत गौरीही मजला थोडी मदत करायची. दारी आमच्या कुंकवाची पाऊले उमटतात , सडा रांगोळीने मग दाही दिशा सजतात. बाप्पा माझा दोन गौरीमध्ये शोभतो , पिलवंडाच्या ऐटीने मखर मंदिरावांनी भासतो. दुसऱ्या दिवशी पक्वान्नाची पंगत भारी असते, केळीच्या पानावर पदार्थांची मांडणी खास असते. तीन दिवस गौरी माझी सुखात विसावते, निरोप देताना तिज डोळ्यात पाणी मात्र डबडबते. यावर्षी गौरी माझी घरभर मला शोधत असणार, भोळे माझ्या कुटुंबीयांच कौतुक मात्र करणार. जास्त काही नाही मागत फक्त आशीर्वाद देऊन जा, परत तुझी सेवा करण्याचे भाग्य मजला देऊन जा. ❤️✍️पूनम देवीदासराव कुलकर्णी

11 Love

Trending Topic