विरह विरहाचे ते क्षण,अडकलेले माझे मन. | मराठी कविता

"विरह विरहाचे ते क्षण,अडकलेले माझे मन. मागे राहिली फक्त,एक वेगळी आठवण. आठवणींचे ते क्षण जीवनाचा हा प्रवास, नकळतपणे झाला आज परत तोच भास. जुन्या जुन्या आठवणी-जुने ते संवाद, चित्र बदललं सारं राहिला फक्त वाद. सुरू झाली मग विरहाची ती भाषा, बदलली सारी स्वप्ने बदलल्या साऱ्या दिशा. नकळत जीवनात येतात विरहाचे क्षण, विरहावाचून अधुरे असते आपले जीवन. विरह घेतो आपल्या जीवनामध्ये जागा , वेगळा होतो पतंग-वेगळा होतो धागा. विरह तो प्रेमाचा,विरह तो नात्यांचा, विरह असतो आपल्यातील वेगवेगळा मतांचा. विरहाचा प्रवासमुळी असतोच असा वेगळा, विरहाचे गीत गाई जणू काही कोकिळा. विरहाचे ढग जाती जेव्हा फुटून, आनंदाच्या धारांनी कंठ येतॊ दाटून. 'विरहाचा अंत होई मन शांत' नको देऊ विरहा तु हा एकांत , तु हा एकांत....... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh"

 विरह 

विरहाचे ते क्षण,अडकलेले माझे मन.
                  मागे राहिली फक्त,एक वेगळी आठवण. 
आठवणींचे ते क्षण जीवनाचा हा प्रवास, 
                  नकळतपणे झाला आज परत तोच भास.

जुन्या जुन्या आठवणी-जुने ते संवाद,
                   चित्र बदललं सारं राहिला फक्त वाद. 
सुरू झाली मग विरहाची ती भाषा,
                  बदलली सारी स्वप्ने बदलल्या साऱ्या दिशा. 

नकळत जीवनात येतात विरहाचे क्षण, 
                 विरहावाचून अधुरे असते आपले जीवन. 
विरह घेतो आपल्या जीवनामध्ये जागा , 
              वेगळा होतो पतंग-वेगळा होतो धागा. 

विरह तो प्रेमाचा,विरह तो नात्यांचा,
                      विरह असतो आपल्यातील वेगवेगळा मतांचा.
विरहाचा प्रवासमुळी असतोच असा वेगळा,
             विरहाचे गीत गाई जणू काही कोकिळा.

विरहाचे ढग जाती जेव्हा फुटून,
                            आनंदाच्या धारांनी कंठ येतॊ दाटून. 
'विरहाचा अंत होई मन शांत'
                            नको देऊ विरहा तु हा एकांत , 
                                                               तु हा एकांत....... 

                                                  -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh

विरह विरहाचे ते क्षण,अडकलेले माझे मन. मागे राहिली फक्त,एक वेगळी आठवण. आठवणींचे ते क्षण जीवनाचा हा प्रवास, नकळतपणे झाला आज परत तोच भास. जुन्या जुन्या आठवणी-जुने ते संवाद, चित्र बदललं सारं राहिला फक्त वाद. सुरू झाली मग विरहाची ती भाषा, बदलली सारी स्वप्ने बदलल्या साऱ्या दिशा. नकळत जीवनात येतात विरहाचे क्षण, विरहावाचून अधुरे असते आपले जीवन. विरह घेतो आपल्या जीवनामध्ये जागा , वेगळा होतो पतंग-वेगळा होतो धागा. विरह तो प्रेमाचा,विरह तो नात्यांचा, विरह असतो आपल्यातील वेगवेगळा मतांचा. विरहाचा प्रवासमुळी असतोच असा वेगळा, विरहाचे गीत गाई जणू काही कोकिळा. विरहाचे ढग जाती जेव्हा फुटून, आनंदाच्या धारांनी कंठ येतॊ दाटून. 'विरहाचा अंत होई मन शांत' नको देऊ विरहा तु हा एकांत , तु हा एकांत....... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh

#Chalachal
#Life
#alone
#Love

People who shared love close

More like this

Trending Topic