Harsh

Harsh Lives in Thane, Maharashtra, India

poem writter as well as shayar marathi/hindi insta id _harsh_poetry_ |mechanical engineer |

https://www.youtube.com/channel/UCJfOI7OKIqLdQYBtI6kRxYA

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

एकांत जशा दुरावती वाटा मना वाटे एक खंत, विसरुनी पुन्हा सारे मन होई शांत. आनंदाला नाही सीमा,दुःख येती अनंत, स्वतःलाच जोडू स्वताशी हवा मग एकांत. मनामनांत फिरत असते विचारांचे चक्र, कधी जाते भरकटून तर कधी एकाग्र. विचारांच्या दुनियेचा नाही हो अंत, मन शांत करण्यासाठी हवा मग एकांत. जीवनाच्या या समुद्रात पाण्याएवढ्या इच्छा, रोज या मनाच्या नवनवीन अपेक्षा. कधी खवले हा जीवनसमुद्र,तर कधी संथ. किनाऱ्यावर येण्यासाठी हवा मग एकांत. सतत चिंता-सतत काळजी रोज नवं वेगळं, एकाच चक्रात फिरत आहे बघा जग सगळं. सोडा चिंता धनाची,जीवन होईल उत्क्रांत. हर्षित या जीवनासाठी हवा मग एकांत. पाहावे आकाशी-बोलावे सागराशी बसुनिया निवांत, प्रश्न सुटती-उत्तर मिळती हवा मग एकांत, हवा मग एकांत...... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh

#मराठीकविता #Soldier #alone #jivan #EKANT  एकांत 

जशा दुरावती वाटा मना वाटे एक खंत,
    विसरुनी पुन्हा सारे मन होई शांत.
आनंदाला नाही सीमा,दुःख येती अनंत,
             स्वतःलाच जोडू स्वताशी हवा मग एकांत.

मनामनांत फिरत असते विचारांचे चक्र, 
            कधी जाते भरकटून तर कधी एकाग्र. 
विचारांच्या दुनियेचा नाही हो अंत,
                 मन शांत करण्यासाठी हवा मग एकांत. 

जीवनाच्या या समुद्रात पाण्याएवढ्या इच्छा, 
     रोज या मनाच्या नवनवीन अपेक्षा. 
कधी खवले हा जीवनसमुद्र,तर कधी संथ. 
         किनाऱ्यावर येण्यासाठी हवा मग एकांत. 

सतत चिंता-सतत काळजी रोज नवं वेगळं, 
           एकाच चक्रात फिरत आहे बघा जग सगळं. 
सोडा चिंता धनाची,जीवन होईल उत्क्रांत. 
       हर्षित या जीवनासाठी हवा मग एकांत.
   
पाहावे आकाशी-बोलावे सागराशी बसुनिया निवांत, 
     प्रश्न सुटती-उत्तर मिळती हवा मग एकांत,
                                                    हवा मग एकांत...... 

                                                  -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh

#alone #Soldier #EKANT #Life #jivan

13 Love

विरह विरहाचे ते क्षण,अडकलेले माझे मन. मागे राहिली फक्त,एक वेगळी आठवण. आठवणींचे ते क्षण जीवनाचा हा प्रवास, नकळतपणे झाला आज परत तोच भास. जुन्या जुन्या आठवणी-जुने ते संवाद, चित्र बदललं सारं राहिला फक्त वाद. सुरू झाली मग विरहाची ती भाषा, बदलली सारी स्वप्ने बदलल्या साऱ्या दिशा. नकळत जीवनात येतात विरहाचे क्षण, विरहावाचून अधुरे असते आपले जीवन. विरह घेतो आपल्या जीवनामध्ये जागा , वेगळा होतो पतंग-वेगळा होतो धागा. विरह तो प्रेमाचा,विरह तो नात्यांचा, विरह असतो आपल्यातील वेगवेगळा मतांचा. विरहाचा प्रवासमुळी असतोच असा वेगळा, विरहाचे गीत गाई जणू काही कोकिळा. विरहाचे ढग जाती जेव्हा फुटून, आनंदाच्या धारांनी कंठ येतॊ दाटून. 'विरहाचा अंत होई मन शांत' नको देऊ विरहा तु हा एकांत , तु हा एकांत....... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh

#मराठीकविता #Chalachal #alone  विरह 

विरहाचे ते क्षण,अडकलेले माझे मन.
                  मागे राहिली फक्त,एक वेगळी आठवण. 
आठवणींचे ते क्षण जीवनाचा हा प्रवास, 
                  नकळतपणे झाला आज परत तोच भास.

जुन्या जुन्या आठवणी-जुने ते संवाद,
                   चित्र बदललं सारं राहिला फक्त वाद. 
सुरू झाली मग विरहाची ती भाषा,
                  बदलली सारी स्वप्ने बदलल्या साऱ्या दिशा. 

नकळत जीवनात येतात विरहाचे क्षण, 
                 विरहावाचून अधुरे असते आपले जीवन. 
विरह घेतो आपल्या जीवनामध्ये जागा , 
              वेगळा होतो पतंग-वेगळा होतो धागा. 

विरह तो प्रेमाचा,विरह तो नात्यांचा,
                      विरह असतो आपल्यातील वेगवेगळा मतांचा.
विरहाचा प्रवासमुळी असतोच असा वेगळा,
             विरहाचे गीत गाई जणू काही कोकिळा.

विरहाचे ढग जाती जेव्हा फुटून,
                            आनंदाच्या धारांनी कंठ येतॊ दाटून. 
'विरहाचा अंत होई मन शांत'
                            नको देऊ विरहा तु हा एकांत , 
                                                               तु हा एकांत....... 

                                                  -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh

#Chalachal #Life #alone #Love

15 Love

बाप्पा निरोप तुमचा घेता साऱ्या विश्वाचा तु आमचा रक्षणकर्ता. तुझ्या मुळेच जीवनात आनंदाची वार्ता. बाप्पा तुझ्या चरणी ठेऊनिया माथा, मन आले भरून निरोप तुझा घेता. तूच आमचा गणपती, तूच आमचा गजानन, तुझ्या भक्तीत देवा सदैव आमचे मन. तूच चालक-तूच मालक तु विश्वाचा धनी, निरोप घेता तुझा डोळ्यात आले पाणी. वर्षातून एकदा तुमचे आमच्या घरी आगमन, आमच्यासाठी बाप्पा हा आनंदाचा क्षण. दुःख होतात नष्ट तुमच्या आगमनाने बाप्पा, विसर्जनाच्या दिवशी आम्हा सोडून जाऊ नका. कोणी म्हणतो वक्रतुंड,कोणी म्हणतो एकदंत, आमच्या वरील विघ्नांचा करता तुम्ही अंत. तुमच्या मुळेच बाप्पा जीवनात आमच्या चैतन्य, तुमच्याविना बाप्पा जिवन आमचे शून्य. आशीर्वाद द्यावा आम्हा तुम्ही जाता-जाता, मन आले भरून निरोप तुमचा घेता, निरोप तुमचा घेता........ हर्षल दत्तात्रय चौधरी. ©Harsh

#मराठीकविता #GaneshChaturthi #GaneshVisarjan #ganapati #visarjan  बाप्पा निरोप तुमचा घेता 

साऱ्या विश्वाचा तु आमचा रक्षणकर्ता. 
    तुझ्या मुळेच जीवनात आनंदाची वार्ता. 
बाप्पा तुझ्या चरणी ठेऊनिया माथा, 
    मन आले भरून निरोप तुझा घेता. 

तूच आमचा गणपती, तूच आमचा गजानन,
       तुझ्या भक्तीत देवा सदैव आमचे मन. 
तूच चालक-तूच मालक तु विश्वाचा धनी,
 निरोप घेता तुझा डोळ्यात आले पाणी. 

वर्षातून एकदा तुमचे आमच्या घरी आगमन, 
  आमच्यासाठी बाप्पा हा आनंदाचा क्षण. 
दुःख होतात नष्ट तुमच्या आगमनाने बाप्पा, 
  विसर्जनाच्या दिवशी आम्हा सोडून जाऊ नका. 

कोणी म्हणतो वक्रतुंड,कोणी म्हणतो एकदंत, 
  आमच्या वरील विघ्नांचा करता तुम्ही अंत. 
तुमच्या मुळेच बाप्पा जीवनात आमच्या चैतन्य, 
     तुमच्याविना बाप्पा जिवन आमचे शून्य. 

आशीर्वाद द्यावा आम्हा तुम्ही जाता-जाता, 
  मन आले भरून निरोप तुमचा घेता, 
                               निरोप तुमचा घेता........  

                              हर्षल दत्तात्रय चौधरी.

©Harsh

गावची संथ हवा गावाची ती संथ हवा, जणू मला माझा गाव हवा. हरवून गेले जरी बालपण, तिथेच आपले आठवणींचे क्षण. गाव झाला पडघवली, घरे झाली दुमजली. तरीपण गाव हवाच हवा, कारण गावची ती संथ हवा. गावची गजबज नष्ट झाली, माणसे निघून शहरात गेली. आजारपणात सर्वाना गावच हवा, कारण गावची ती संथ हवा. गावात दुष्काळ-गाव डोंगराळ, आनंदाने झोपून पाहावे आभाळ. स्वप्नात सुध्दा गावाच यावा, कारण गावची ती संथ हवा. पहाटे सूर्याचे दर्शन घ्यावे, रात्रीच्या चांदण्यात शीतल व्हावे. 'स्वर्गाचा आनंद' जणू माझ्या गावा, कारण गावची ती संथ हवा, कारण गावची ती संथ हवा. ©Harsh

#मराठीविचार #Journey #village #Mind #Sukh  गावची संथ हवा

गावाची ती संथ हवा,
जणू मला माझा गाव हवा.
हरवून गेले जरी बालपण,
  तिथेच आपले आठवणींचे क्षण.

गाव झाला पडघवली, 
 घरे झाली दुमजली.
तरीपण गाव हवाच हवा,
  कारण गावची ती संथ हवा.

गावची गजबज नष्ट झाली, 
  माणसे निघून शहरात गेली.
आजारपणात सर्वाना गावच हवा, 
 कारण गावची ती संथ हवा.

गावात दुष्काळ-गाव डोंगराळ, 
आनंदाने झोपून पाहावे आभाळ. 
स्वप्नात सुध्दा गावाच यावा, 
  कारण गावची ती संथ हवा. 

पहाटे सूर्याचे दर्शन घ्यावे,
   रात्रीच्या चांदण्यात शीतल व्हावे.
'स्वर्गाचा आनंद' जणू माझ्या गावा, 
  कारण गावची ती संथ हवा, 
       कारण गावची ती संथ हवा.

©Harsh

तुमच्या शिक्षणाने जर , तुमचे विचार बदलत नसतील, तर तुम्ही जीवनात सोने कमवू शकता, सोन्यासारखी माणसे नव्हे ! ©Harsh

#मराठीविचार #motavitonal #Education #Gulaab #Mind  तुमच्या शिक्षणाने जर ,                                                तुमचे विचार बदलत नसतील, 
तर तुम्ही जीवनात सोने कमवू शकता,             सोन्यासारखी माणसे नव्हे !

©Harsh
#मराठीविचार #quetos  तुमच्या शिक्षणाने जर ,                                                तुमचे विचार बदलत नसतील, 
तर तुम्ही जीवनात सोने कमवू शकता,             सोन्यासारखी माणसे नव्हे !

©Harsh

#quetos

148 View

Trending Topic