मन-तरंग" उसळतात कधी लाटा मनात आनंदाच्या तर कधी दु

""मन-तरंग" उसळतात कधी लाटा मनात आनंदाच्या तर कधी दुःखाच्या बेभान वादळे घेरतात मनाला कधी निराशेने तर कधी आशेने मनाच्या या अवस्थेला अनुभवताना उफाळून येतात कधी आनंद लहरी कधी उदासिनता गाजवते अधिराज्य. करपलेल्या त्या कोमल मनावर. कधी उधाणलेला सागर. तर कधी संथ नदी असते मन. कधी शुन्यात हरवलेली नजर तर कधी जागेपणीचे स्वप्न असते मन. कधी अधीर, बेभान असते तर कधी संयमी, सावधान असते किती या कल्पना, संकल्पना मनाच्या. किती हे भास, आभास मनाचे? कधी सैरभैर, सुसाट वारा हे मन तर कधी सरोवरातील निश्चल, शितल, सुंदर जल कधी रंगीबेरंगी फुलपाखरु तर कधी वाट चुकलेला वाटसरु हे मन. किती रंग-तरंग या मनाचे? कधी उथळ तर कधी सखोल कधी कल्पनांचे भांडार. तर कधी विषन्न, उदास खिंडार हे मन. मनाच्या या सा-या अवस्थांमधे जगता आलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला, जिंदादिलीने उपभोगता आलं पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. आशा- निराशा येतच राहणार मनावर त्यांचा परिणाम होतच राहणार यही तो रीत है. हार के बाद ही जीत है! ©®- जयश्री हातागळे"

 "मन-तरंग"
उसळतात कधी लाटा मनात
आनंदाच्या तर कधी दुःखाच्या
बेभान वादळे घेरतात मनाला
कधी निराशेने तर कधी आशेने
मनाच्या या अवस्थेला अनुभवताना
उफाळून येतात कधी आनंद लहरी
कधी उदासिनता गाजवते अधिराज्य.
करपलेल्या त्या कोमल मनावर.
कधी उधाणलेला सागर.
तर कधी संथ नदी असते मन.
कधी शुन्यात हरवलेली नजर
तर कधी जागेपणीचे स्वप्न असते मन.
कधी अधीर, बेभान असते
तर कधी संयमी, सावधान असते
किती या कल्पना, संकल्पना मनाच्या.
किती हे भास, आभास मनाचे?
कधी सैरभैर, सुसाट वारा हे मन
तर कधी सरोवरातील 
निश्चल, शितल, सुंदर जल
कधी रंगीबेरंगी फुलपाखरु
तर कधी वाट चुकलेला वाटसरु
हे मन.
किती रंग-तरंग या मनाचे?
कधी उथळ तर कधी सखोल
कधी कल्पनांचे भांडार.
तर कधी विषन्न, उदास खिंडार
हे मन.
मनाच्या या सा-या अवस्थांमधे
जगता आलं पाहिजे.
प्रत्येक क्षणाला, जिंदादिलीने
उपभोगता आलं पाहिजे.
यालाच तर जीवन म्हणतात.
आशा- निराशा येतच राहणार
मनावर त्यांचा परिणाम होतच राहणार
यही तो रीत है.
हार के बाद ही जीत है!
©®- जयश्री हातागळे

"मन-तरंग" उसळतात कधी लाटा मनात आनंदाच्या तर कधी दुःखाच्या बेभान वादळे घेरतात मनाला कधी निराशेने तर कधी आशेने मनाच्या या अवस्थेला अनुभवताना उफाळून येतात कधी आनंद लहरी कधी उदासिनता गाजवते अधिराज्य. करपलेल्या त्या कोमल मनावर. कधी उधाणलेला सागर. तर कधी संथ नदी असते मन. कधी शुन्यात हरवलेली नजर तर कधी जागेपणीचे स्वप्न असते मन. कधी अधीर, बेभान असते तर कधी संयमी, सावधान असते किती या कल्पना, संकल्पना मनाच्या. किती हे भास, आभास मनाचे? कधी सैरभैर, सुसाट वारा हे मन तर कधी सरोवरातील निश्चल, शितल, सुंदर जल कधी रंगीबेरंगी फुलपाखरु तर कधी वाट चुकलेला वाटसरु हे मन. किती रंग-तरंग या मनाचे? कधी उथळ तर कधी सखोल कधी कल्पनांचे भांडार. तर कधी विषन्न, उदास खिंडार हे मन. मनाच्या या सा-या अवस्थांमधे जगता आलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला, जिंदादिलीने उपभोगता आलं पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. आशा- निराशा येतच राहणार मनावर त्यांचा परिणाम होतच राहणार यही तो रीत है. हार के बाद ही जीत है! ©®- जयश्री हातागळे

#darkness

People who shared love close

More like this

Trending Topic