Jayshree Hatagale

Jayshree Hatagale Lives in Pune, Maharashtra, India

कवयित्री/लेखिका

  • Latest
  • Popular
  • Video

"ही वाट जाते कुठे???" ही वाट जाते कुठे????? जेव्हा विस्कळित होते आयुष्य प्रत्येक वळणावर.... तेव्हा धुंडाळाव्या लागतात पुन्हा नव्या वाटा..... आणि ह्या नवीन वाटा आयुष्याला कुठे घेऊन जातात.......??? हाही तितकाच गहन प्रश्न... तरीही जी वाट समोर दिसेल त्या वाटेने मार्गस्थ व्हावच लागतं या संघर्षमय जीवनात कधीच भविष्याचा अंदाज बांधता येत नाही अंधारमय या आयुष्याच्या वाटेवर जस जसा एखादा उजेडाचा कवडसा दिसेल त्या कवडशाच्या आधाराने.... चाचपडत का होईना.... उजेडाच्या दिशेने मार्गक्रमण करणं जणू काही क्रमप्राप्तच असतं... कारण कुठेतरी एक उमेद कायम असते मनात...... कारण वादळातून वाट शोधणं हे मनानं पक्कं ठरवलेलं असतं.... मरण तर एक दिवस आहेच परंतु संकटाच्या छाताडावर पाय ठेवून जगण्याची मजा काही निराळीच असते त्यामुळे या वाटा कुठेही जात असल्या तरी त्यांना योग्य दिशेने वळवण्याचं कसब हे आयुष्य बरोबर शिकवतं माणसाला फक्त हिम्मत कधी हारायची नाही प्रत्येक वाटेला एका निश्चित ध्येयापर्यंत पोहोचवण्याची कला ही प्रत्येक माणसात असते.... त्यामुळे गोंधळून न जाता त्या वाटेवरून बिनधास्त प्रस्थान करायचे....... "मंजिल" तो यकीनन मिलेगी....🤗 ©®-जयश्री हातागळे

#जयश्री #solace #ही #poem  "ही वाट जाते कुठे???"

ही वाट जाते कुठे?????
जेव्हा विस्कळित होते आयुष्य 
प्रत्येक वळणावर....
तेव्हा धुंडाळाव्या लागतात
पुन्हा नव्या वाटा.....
आणि ह्या नवीन वाटा
आयुष्याला कुठे घेऊन जातात.......???
हाही तितकाच गहन प्रश्न...
तरीही जी वाट समोर दिसेल
त्या वाटेने मार्गस्थ व्हावच लागतं
या संघर्षमय जीवनात कधीच 
भविष्याचा अंदाज बांधता येत नाही
अंधारमय या आयुष्याच्या वाटेवर
जस जसा एखादा उजेडाचा कवडसा दिसेल
त्या कवडशाच्या आधाराने....
चाचपडत का होईना....
उजेडाच्या दिशेने मार्गक्रमण करणं
जणू काही क्रमप्राप्तच असतं...
कारण कुठेतरी एक उमेद
कायम असते मनात......
कारण वादळातून वाट शोधणं
हे मनानं पक्कं ठरवलेलं असतं....
मरण तर एक दिवस आहेच
परंतु संकटाच्या छाताडावर पाय ठेवून
जगण्याची मजा काही निराळीच असते
त्यामुळे या वाटा कुठेही जात असल्या तरी
त्यांना योग्य दिशेने वळवण्याचं कसब
हे आयुष्य बरोबर शिकवतं माणसाला
फक्त हिम्मत कधी हारायची नाही
प्रत्येक वाटेला एका निश्चित ध्येयापर्यंत
पोहोचवण्याची कला ही
प्रत्येक माणसात असते....
त्यामुळे गोंधळून न जाता
त्या वाटेवरून बिनधास्त
प्रस्थान करायचे.......
"मंजिल" तो यकीनन मिलेगी....🤗

©®-जयश्री हातागळे

#solace #ही वाट जाते कुठे??? #जयश्री

8 Love

#आयुष्य✍️ #जयश्री #कविता #krishna_flute #poem  "आयुष्य"
#जयश्री
#krishna_flute #जात #गझल  "जात"
गझल

"मन-तरंग" उसळतात कधी लाटा मनात आनंदाच्या तर कधी दुःखाच्या बेभान वादळे घेरतात मनाला कधी निराशेने तर कधी आशेने मनाच्या या अवस्थेला अनुभवताना उफाळून येतात कधी आनंद लहरी कधी उदासिनता गाजवते अधिराज्य. करपलेल्या त्या कोमल मनावर. कधी उधाणलेला सागर. तर कधी संथ नदी असते मन. कधी शुन्यात हरवलेली नजर तर कधी जागेपणीचे स्वप्न असते मन. कधी अधीर, बेभान असते तर कधी संयमी, सावधान असते किती या कल्पना, संकल्पना मनाच्या. किती हे भास, आभास मनाचे? कधी सैरभैर, सुसाट वारा हे मन तर कधी सरोवरातील निश्चल, शितल, सुंदर जल कधी रंगीबेरंगी फुलपाखरु तर कधी वाट चुकलेला वाटसरु हे मन. किती रंग-तरंग या मनाचे? कधी उथळ तर कधी सखोल कधी कल्पनांचे भांडार. तर कधी विषन्न, उदास खिंडार हे मन. मनाच्या या सा-या अवस्थांमधे जगता आलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला, जिंदादिलीने उपभोगता आलं पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. आशा- निराशा येतच राहणार मनावर त्यांचा परिणाम होतच राहणार यही तो रीत है. हार के बाद ही जीत है! ©®- जयश्री हातागळे

#darkness #poem  "मन-तरंग"
उसळतात कधी लाटा मनात
आनंदाच्या तर कधी दुःखाच्या
बेभान वादळे घेरतात मनाला
कधी निराशेने तर कधी आशेने
मनाच्या या अवस्थेला अनुभवताना
उफाळून येतात कधी आनंद लहरी
कधी उदासिनता गाजवते अधिराज्य.
करपलेल्या त्या कोमल मनावर.
कधी उधाणलेला सागर.
तर कधी संथ नदी असते मन.
कधी शुन्यात हरवलेली नजर
तर कधी जागेपणीचे स्वप्न असते मन.
कधी अधीर, बेभान असते
तर कधी संयमी, सावधान असते
किती या कल्पना, संकल्पना मनाच्या.
किती हे भास, आभास मनाचे?
कधी सैरभैर, सुसाट वारा हे मन
तर कधी सरोवरातील 
निश्चल, शितल, सुंदर जल
कधी रंगीबेरंगी फुलपाखरु
तर कधी वाट चुकलेला वाटसरु
हे मन.
किती रंग-तरंग या मनाचे?
कधी उथळ तर कधी सखोल
कधी कल्पनांचे भांडार.
तर कधी विषन्न, उदास खिंडार
हे मन.
मनाच्या या सा-या अवस्थांमधे
जगता आलं पाहिजे.
प्रत्येक क्षणाला, जिंदादिलीने
उपभोगता आलं पाहिजे.
यालाच तर जीवन म्हणतात.
आशा- निराशा येतच राहणार
मनावर त्यांचा परिणाम होतच राहणार
यही तो रीत है.
हार के बाद ही जीत है!
©®- जयश्री हातागळे

#darkness

9 Love

#lovebeat #poem

#lovebeat

91 View

#जयश्री #lovebeat #poem  खरंच मेल्यावर माणसं ...
कावळा बनतात का....?

#जयश्री

#lovebeat

14,805 View

Trending Topic