डोळे हसतात डोळे, रडतात डोळे शब्दांविन किती बोलतात

"डोळे हसतात डोळे, रडतात डोळे शब्दांविन किती बोलतात डोळे आठवणीत कुणाच्या तरी आणि कातरवेळी पाणावतात डोळे चेहरा भले बोलू दे काहीही मनातलं खरं सांगतात डोळे हात पोहचत नाहीत मदतीस तेव्हा तेव्हा खंतावतात डोळे कुठे आपुलकी, कुठे स्वार्थ सारे इशारे समजतात डोळे करुणा, प्रेम , भूतदया जिथे नेमके मला तेच भावतात डोळे ©® पांडुरंग म जाधव (०८/११/२०१९) 9892812218/9619812518"

 डोळे 
हसतात डोळे, रडतात डोळे
शब्दांविन किती बोलतात डोळे

आठवणीत कुणाच्या तरी आणि 
कातरवेळी पाणावतात डोळे

चेहरा भले बोलू दे काहीही
मनातलं खरं सांगतात डोळे

हात पोहचत नाहीत मदतीस 
तेव्हा तेव्हा  खंतावतात डोळे

कुठे आपुलकी, कुठे स्वार्थ 
सारे इशारे समजतात डोळे

करुणा, प्रेम , भूतदया जिथे 
नेमके मला तेच भावतात डोळे 

©® पांडुरंग म जाधव (०८/११/२०१९)
9892812218/9619812518

डोळे हसतात डोळे, रडतात डोळे शब्दांविन किती बोलतात डोळे आठवणीत कुणाच्या तरी आणि कातरवेळी पाणावतात डोळे चेहरा भले बोलू दे काहीही मनातलं खरं सांगतात डोळे हात पोहचत नाहीत मदतीस तेव्हा तेव्हा खंतावतात डोळे कुठे आपुलकी, कुठे स्वार्थ सारे इशारे समजतात डोळे करुणा, प्रेम , भूतदया जिथे नेमके मला तेच भावतात डोळे ©® पांडुरंग म जाधव (०८/११/२०१९) 9892812218/9619812518

People who shared love close

More like this

Trending Topic