समाधान मिळवताना कधी
तुझ्यावर प्रेम झाले कळलेच नाही
तुझ्यात अशी काही मी गुंतून
गेले ते मला वळलेच नाही
तुझं माझ्या आयुष्यात येणं
योगायोग आहे हा एक
तुझ्यासोबत पाहिली मी
प्रेमाची स्वप्ने अनेक
भीती वाटते तुला गमावायची
तू माझ्यापासून दुर जाण्याची
आस आहेस तू माझ्या जगण्याची
करू नको बात मला सोडून जाण्याची
दे माझ्या हातात हाथ
नको सोडू कधी साथ
खूप प्रेम आहे तुझ्यावर
विश्वास ठेव तू माझ्यावर
©@smile buddy
#विश्वास