Dileep Bhope

Dileep Bhope

माझ्या कविता, चारोळ्या कागंदाचा व्यर्थ कचरा झाला ! हे बरे झाले! हस-या दुख-या भावनांचा लगेच निचरा झाला !

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीशायरी #रानफुले #कविता  #रानफुले वेडी

©Dileep Bhope
#जीवनअनुभव #सोबत  #सोबत.....

©Dileep Bhope
#मराठीकविता #दिबाभोपे #election2024  White -
सारेच कसे मुहूर्त बरवे
साजरे येथ करतात बंगले,
नित्य काही पसरुन हात
दैन्य सदा पाळतात पांगळे..

नाहीत भिंती नाहीच आसरे
पुलाखाली संसार जयांचे,
शोधा मुहूर्त बरवा कुणी रे
सजवा आयुष्य त्यांचेही चांगले..

#दिबाभोपे

©Dileep Bhope

#election2024

207 View

#मराठीकविता #चारोळी  सारेच डबके समजू लागलेत सागर स्वतःला

"हद्दीत रहा रे" वेळीच सांगू  यातील प्रत्येकाला..

©Dileep Bhope
#मराठीकविता #SunSet  उन्हाळ्यातही पडतो पाऊस

पुन्हा होतील झरे प्रवाही..

जुलमी सम्राटांचाही अंत इथे

उन्माद सत्तेचा एवढा बरे नाही..

©Dileep Bhope

#SunSet

1,593 View

प्यादी- भगवे कुणी, कुणी घालून खादी! अजून गावोगाव, गल्ली भेटतात प्यादी. हातात झोळी; ना सोने, ना चांदी बोलतात प्यादे, "जय गोडसे, जय गांधी! ✍️ #दिबा_भोपे ©Dileep Bhope

#मराठीकविता #दिबा_भोपे #प्यादी  प्यादी-
 
भगवे कुणी, कुणी घालून खादी!
अजून गावोगाव, गल्ली भेटतात प्यादी.

हातात झोळी; ना सोने, ना चांदी
बोलतात प्यादे, "जय गोडसे, जय गांधी!

✍️ 
#दिबा_भोपे

©Dileep Bhope
Trending Topic