पद्मवैखरी

पद्मवैखरी Lives in Yavatmal, Maharashtra, India

पद्मा परी गंध पसरवूनी वैखरी तव व्यक्त होई....

firstblog0318.blogspot.com

  • Latest
  • Popular
  • Video

आनंदाची लालसा काय असावी त्या मनी लालसा ? कसला मिळाला असेल आनंद ? त्या कोवळ्या क्षणात कितीदा फसला असेल ना हो राग द्वंद ? धाव तिची असेल सुखापर्यंत किंवा असेल तो छंद क्षणिक पण वेगातही तिच्या ओठीचे हास्य ते किती निखळ मौलिक तिच्या आनंदात आज बघा चार चेहरे सुखावले कसे ? या प्रचंड भयाण विराणतेत मनावरचे मळभ दूरावले जसे सुख म्हणून शोधणारे आपण सुख याहून पलीकडे काय ते? ओठीच मिळणारे शब्द आपले.. की त्यात दुरावणारे बंध ते.. तिच्या आनंदाची लालसा जरा परत मनात उतरवता येईल का...? त्या बालपणात रमताना पाहून पुन्हा त्यास गाठता येईल का..? -पद्मवैखरी, यवतमाळ ©पद्मवैखरी

#JumuatulWidaa  आनंदाची लालसा

काय असावी त्या मनी लालसा ?
कसला मिळाला असेल आनंद ?
त्या कोवळ्या क्षणात कितीदा
फसला असेल ना हो राग द्वंद ?

धाव तिची असेल सुखापर्यंत
किंवा असेल तो छंद क्षणिक
पण वेगातही तिच्या ओठीचे
हास्य ते किती निखळ मौलिक

तिच्या आनंदात आज बघा
चार चेहरे सुखावले कसे ?
या प्रचंड भयाण विराणतेत
मनावरचे मळभ दूरावले जसे

सुख म्हणून शोधणारे आपण
सुख याहून पलीकडे काय ते?
ओठीच मिळणारे शब्द आपले..
की त्यात दुरावणारे बंध ते..

तिच्या आनंदाची लालसा जरा
परत मनात उतरवता येईल का...?
त्या बालपणात रमताना पाहून
पुन्हा त्यास गाठता येईल का..?

             -पद्मवैखरी, यवतमाळ

©पद्मवैखरी

रामनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ©पद्मवैखरी

 रामनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा

©पद्मवैखरी

रामनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ©पद्मवैखरी

8 Love

#Navratra2021

तुला हारतांना... तुझ्या प्रेमाच्या बंधनात गुदमरतेय मीच आता श्वासही एकटे झाले तुला रोज समजावीता मनावरचे घाव शब्दाचे ओठीच विरले ते आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता प्रेम तुझे, वेळ ही तुझी, मर्जी तुझी अन् मीही या लपंडावात होणार हार फक्त माझीच ही पण तरीही तुझ्या या खेळास संपवेल मी आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता रोजची नवे ते बहाने हे रोजचेच सोसणे झाले तुझ्या या वागण्याचे खोटे दाखले फक्त मग राहिले तुझ्या प्रत्येक वळणावर नाही वळणार मी आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता किती आणखी मि या कोंडीत राहू सांग मला आस या प्रेमाची मग येईल कधी रे तुला? काटेरी या क्षणाची मीच सोबती मलाच आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता ती शिक्षा रुसव्याची अन् परीक्षाही झाली दुराव्याची तुझ्या विना अपेक्षाच नाही करवत राहण्याची दोन्ही सोडविताना मीच हरले त्यातही अशी आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता ©पद्मवैखरी

 तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी

तुला हारतांना...

9 Love

परतीची पानगळ.. पानगळ तीही जरा स्तब्ध होती पावले तुझीच परतली होती पायाशी पातेही तिक्ष्ण शुल झाली पाण्यात निखारे त्या पेटली होती हात निसरडा असा दूर झाला कोरड्या अश्रूला वाट रीती होती मी पाठमोरीच निशब्दहि झालो तू सोडून तेव्हा दूर गेली होती साथ सोबतीची देण्या मज होती पण तु सोडून परतली होती -पद्मवैखरी, यवतमाळ ©पद्मवैखरी

 परतीची पानगळ..

पानगळ तीही
जरा स्तब्ध होती
पावले तुझीच
परतली होती

पायाशी पातेही
तिक्ष्ण शुल झाली
पाण्यात निखारे
त्या पेटली होती

हात  निसरडा
असा दूर झाला
कोरड्या अश्रूला
वाट रीती होती

मी पाठमोरीच
निशब्दहि झालो
तू सोडून तेव्हा
दूर गेली होती

साथ सोबतीची
देण्या मज होती
पण तु सोडून
परतली होती

-पद्मवैखरी, यवतमाळ

©पद्मवैखरी

परतीची पानगळ.. पानगळ तीही जरा स्तब्ध होती पावले तुझीच परतली होती पायाशी पातेही तिक्ष्ण शुल झाली पाण्यात निखारे त्या पेटली होती हात निसरडा असा दूर झाला कोरड्या अश्रूला वाट रीती होती मी पाठमोरीच निशब्दहि झालो तू सोडून तेव्हा दूर गेली होती साथ सोबतीची देण्या मज होती पण तु सोडून परतली होती -पद्मवैखरी, यवतमाळ ©पद्मवैखरी

6 Love

#PoeticAntakshri

एक गझल आस धरुनी... गझलेचा हा पहिलाच प्रयत्न #PoeticAntakshri

47 View

Trending Topic