Eknath Dhanke

Eknath Dhanke

  • Latest
  • Popular
  • Video

White दृश्यांना द्रष्ट्या भावाने पाहणे शिका अन्यथा अटळ आहे आता दृष्टी जाणे एकनाथ ©Eknath Dhanke

#मराठीशायरी #sad_shayari  White दृश्यांना  द्रष्ट्या भावाने पाहणे शिका
अन्यथा अटळ आहे आता दृष्टी जाणे

एकनाथ

©Eknath Dhanke

#sad_shayari

11 Love

White हे कर्ज त्याचे एवढे फेडाल कोठे मिळतो असा फुकटात अस्सल माल कोठे इकडे उभी आधीच टोळी लांडग्यांची तिकडून आला वाघ तर धावाल कोठे आत्ताच कापा पंख जर कापायचे तर पक्षी उडाल्यावर सुरा फिरवाल कोठे मोठीच पंचाईत झाली ऐन वेळी तलवार दिसली पण दिसेना ढाल कोठे नाही कळाला अजुनही धोका तुम्हाला रस्ते अजुन झालेत तुमचे लाल कोठे आनंद झाला आज आल्यावर तुम्ही पण इतकेच सांगा सर्व होता काल कोठे घेऊन मी आलोच नाथा एक श्रीफळ तोवर पहा तू भेटते का शाल कोठे एकनाथ ©Eknath Dhanke

#मराठीशायरी #save_tiger  White हे कर्ज त्याचे एवढे फेडाल कोठे
मिळतो असा फुकटात अस्सल माल कोठे

इकडे उभी आधीच टोळी लांडग्यांची 
तिकडून आला वाघ तर धावाल कोठे

आत्ताच कापा पंख जर कापायचे तर
पक्षी उडाल्यावर सुरा फिरवाल कोठे

मोठीच पंचाईत झाली ऐन वेळी
तलवार दिसली पण दिसेना ढाल कोठे

नाही कळाला अजुनही धोका तुम्हाला
रस्ते अजुन झालेत तुमचे लाल कोठे

आनंद झाला आज आल्यावर तुम्ही पण
इतकेच सांगा सर्व होता काल कोठे

घेऊन मी आलोच नाथा एक श्रीफळ 
तोवर पहा तू भेटते का शाल कोठे

एकनाथ

©Eknath Dhanke

#save_tiger

9 Love

White अद्भुत कला तुला ही कोठून प्राप्त झाली? त्यागून गुंतलो मी भोगून तू निराळी मी ही तसाच होतो ती ही तशीच होती भेटुन म्हणून काही घडले नवीन नाही जागेपणात कोणी हरवून शुद्ध बसतो नेणीवही कुणाची असते नशेत जागी प्रत्यक्ष भेट घडली असती कधी तुझी तर मुक्ती सहज मिळाली असती इथे मलाही येशील तू कधीही नाही तुझा भरोसा केलीय स्वागताची केव्हाच मी तयारी आताच सोडताना कर तू विचार नाथा येवो न वेळ नंतर येथेच परतण्याची .. .. (गाग्गाल गाल गाग्गा गाग्गाल गाल गाग्गा येथेच जन्म झाला येथेच राख झाली) एकनाथ ©Eknath Dhanke

#मराठीशायरी #sad_shayari  White अद्भुत कला तुला ही कोठून प्राप्त झाली?
त्यागून गुंतलो मी भोगून तू निराळी

मी ही तसाच होतो ती ही तशीच होती
भेटुन म्हणून काही घडले नवीन नाही

जागेपणात कोणी हरवून शुद्ध बसतो
नेणीवही कुणाची असते नशेत जागी

प्रत्यक्ष भेट घडली असती कधी तुझी तर
मुक्ती सहज मिळाली असती इथे मलाही

येशील तू कधीही नाही तुझा भरोसा
केलीय स्वागताची केव्हाच मी तयारी

आताच सोडताना कर तू विचार नाथा
येवो न वेळ नंतर येथेच परतण्याची
..
..
(गाग्गाल गाल गाग्गा गाग्गाल गाल गाग्गा 
येथेच जन्म झाला येथेच राख झाली)

एकनाथ

©Eknath Dhanke

#sad_shayari

13 Love

White माझा माझा म्हणणाऱ्यांना कळलो असतो कशाला तुझ्यासाठी वणवण फिरलो असतो हटता हटता राहिला जरा पडदा बाकी नाहीतर आपण सगळ्यांना दिसलो असतो शुभेच्छाच देऊ शकतो मी याच्या नंतर याच्या आधी तुला वाचवू शकलो असतो कठीण असते स्वतः पासुनी तुटणे नाथा नाहीतर केव्हाचा तुझ्यात मिटलो असतो . . . . (मी उतरवले असतेही बाजारात मला पण कोणा कोणाला मी परवडलो असतो?) एकनाथ ©Eknath Dhanke

#मराठीशायरी #wallpaper  White माझा माझा म्हणणाऱ्यांना कळलो असतो
कशाला तुझ्यासाठी वणवण फिरलो असतो

हटता हटता राहिला जरा पडदा बाकी
नाहीतर आपण सगळ्यांना दिसलो असतो

शुभेच्छाच देऊ शकतो मी याच्या नंतर 
याच्या आधी तुला वाचवू शकलो असतो 

कठीण असते स्वतः पासुनी तुटणे नाथा
नाहीतर केव्हाचा तुझ्यात मिटलो असतो 
.
.
.
.
(मी उतरवले असतेही बाजारात मला
पण कोणा कोणाला मी परवडलो असतो?)

एकनाथ

©Eknath Dhanke

#wallpaper

10 Love

White एक थरथरते शिडी अन् वेगळा पडतो असर कोण ढासळतो, कुणाची मात्र गच्चीवर नजर आजही सगळे सुरू आहे जसे होते तसे राहिल्या ना फक्त पहिल्या सारख्या इच्छा जबर व्हायचे तादात्म्य इतके की मिटावी नग्नता शेवटी होवोत अपुले देह उघडे फार तर कोणत्या निद्रेत दुनिये पहुडली आहेस तू काय ह्याचे मी करू, कोणास देऊ हा बहर शेवटी आलीच बागेवर नको ती आपदा फुल बहरले नेमके अन् आंधळा झाला भ्रमर याहुनी काहीच नाथा वेगळे नाही पुढे तेच ते आता नव्याने उलगडत जातील थर . . (काय वर्णावी घराने ह्या कलेची थोरवी लावला आहे चुना पण वाटतो संगमरवर ) एकनाथ ©Eknath Dhanke

#मराठीशायरी #alone_quotes  White एक थरथरते शिडी अन् वेगळा पडतो असर
कोण ढासळतो, कुणाची मात्र गच्चीवर नजर

आजही सगळे सुरू आहे जसे होते तसे
राहिल्या ना फक्त पहिल्या सारख्या इच्छा जबर

व्हायचे तादात्म्य इतके की मिटावी नग्नता 
शेवटी होवोत अपुले देह उघडे फार तर

कोणत्या निद्रेत दुनिये पहुडली आहेस तू 
काय ह्याचे मी करू, कोणास देऊ हा बहर

शेवटी आलीच बागेवर नको ती आपदा
फुल बहरले नेमके अन् आंधळा झाला भ्रमर

याहुनी काहीच नाथा वेगळे नाही पुढे
तेच ते आता नव्याने उलगडत जातील थर
.
.
(काय वर्णावी घराने  ह्या कलेची थोरवी
लावला आहे चुना पण वाटतो संगमरवर )

एकनाथ

©Eknath Dhanke

#alone_quotes

14 Love

White आत्ताच नका टाकू माझ्या गळ्यात माला अजून माझा शेवटचा टवका न उडाला कोणी म्हणतो आले तर येऊ द्या खाली कोणी म्हणतो टेकू लावा आकाशाला एकनाथ ©Eknath Dhanke

#मराठीशायरी #Emotional_Shayari  White आत्ताच नका टाकू माझ्या गळ्यात माला 
अजून माझा शेवटचा टवका न उडाला 

कोणी म्हणतो आले तर येऊ द्या खाली
कोणी म्हणतो टेकू लावा आकाशाला 

एकनाथ

©Eknath Dhanke
Trending Topic