Shankar kamble

Shankar kamble

  • Latest
  • Popular
  • Video

*!!बुद्ध!!** 🌹 *त्रिसरण अन पंचशीलेचा* *मार्ग दावूनी भला* * *करुणा सत्य अहिंसेची* *दीव्य दावली कला* *साऱ्या विश्वात बुद्ध भला* *आज नमितो बुद्धाला!धृ* ! *शुद्धोधनाचा हा सूत* *जन्माला तो राजकुळात* *सारी सुखं जोडुनी हात* *परी रमला ना तो त्यात* *दुःखाचे हे मूळ शोधण्या* *निघे तो अरण्याला* *साऱ्या विश्वात ....!१!* *पिंपळाच्या झाडाखाली* *बुध्द शांत मुद्रा घाली* *ज्ञानाची पसरली लाली* *दिव्यत्वाची प्रचिती आली* *सिद्धार्थाचा बुद्ध जाहला* *प्रभा आली उदयाला* *साऱ्या विश्वात...!२!* *संसाराच्या भवसागरि* *धम्म बुद्धाचा एकच तारी* *गौतमाला स्मरल्यावरी* *तुम्ही तराल हो नरनारी* *जीवनातले दुःख हरण्या* *जा शरण तथागताला* *साऱ्या विश्वात...!३!* ©Shankar kamble

#मराठीसंस्कृति #बुद्धपूर्णिमा #बुद्ध_के_विचार #गौतम_बुद्ध #बुद्ध  #शांती  *!!बुद्ध!!** 🌹
 *त्रिसरण अन पंचशीलेचा* 
 *मार्ग दावूनी भला* 
* *करुणा सत्य अहिंसेची* 
 *दीव्य दावली कला* 
 *साऱ्या विश्वात बुद्ध भला* 
 *आज नमितो बुद्धाला!धृ* !

 *शुद्धोधनाचा हा सूत* 
 *जन्माला तो राजकुळात* 
 *सारी सुखं जोडुनी हात* 
 *परी रमला ना तो त्यात* 
 *दुःखाचे हे मूळ शोधण्या* 
 *निघे तो अरण्याला* 
 *साऱ्या विश्वात ....!१!* 

 *पिंपळाच्या झाडाखाली* 
 *बुध्द शांत मुद्रा घाली* 
 *ज्ञानाची पसरली लाली* 
 *दिव्यत्वाची प्रचिती आली* 
 *सिद्धार्थाचा बुद्ध जाहला* 
 *प्रभा आली उदयाला* 
 *साऱ्या विश्वात...!२!* 

 *संसाराच्या भवसागरि* 
 *धम्म बुद्धाचा एकच तारी* 
 *गौतमाला स्मरल्यावरी* 
 *तुम्ही तराल हो नरनारी* 
 *जीवनातले दुःख हरण्या* 
 *जा शरण तथागताला* 
 *साऱ्या विश्वात...!३!*

©Shankar kamble

ओळखीच्या खुणां साऱ्या आज परक्या वाटल्या ओल सरतां मायेची भेगां मनांत दाटल्या।१। घालमेल उंबऱ्याची जीव झाला कासावीस सोसवेना होरपळ डोळां चातकाची आस।२। शीळ पाखरांची कानी श्रावणातला हिंदोळा घुटमळ पानोपानी गंध दरवळ वेल्हाळा।३। सये तुटलं माहेर लेकपणाला पारखी माझं फाटलं आभाळ ऊन-सावली सारखी।४। कसा आवरू हुंदका किती निरपावं पाणी कोंब खुडता उमाळा भळभळ दाटे मनी।५। नको कोरडा दिखावा वरवरचं बोलणं अंग पोळलं उन्हांत आता कुठलं शिंपण?।६। ©Shankar kamble

#माहेर_सासर #जीवनअनुभव #माहेर #सासरी #मुलगी #झोका  ओळखीच्या खुणां साऱ्या
आज परक्या वाटल्या
ओल सरतां मायेची
भेगां मनांत दाटल्या।१।

घालमेल उंबऱ्याची
जीव झाला कासावीस
सोसवेना होरपळ
डोळां चातकाची आस।२।

शीळ पाखरांची कानी
श्रावणातला हिंदोळा
घुटमळ पानोपानी
गंध दरवळ वेल्हाळा।३।

सये तुटलं माहेर
लेकपणाला पारखी
माझं फाटलं आभाळ
ऊन-सावली सारखी।४।

कसा आवरू हुंदका
किती निरपावं पाणी
कोंब खुडता उमाळा
भळभळ दाटे मनी।५।

नको कोरडा दिखावा
वरवरचं बोलणं
अंग पोळलं उन्हांत
आता कुठलं शिंपण?।६।

©Shankar kamble

वणवण जरी नशीबी असली का करावा उगाच त्रागा? कास धरावी माणुसकीची विणूनि प्रीत धागा धागा ©Shankar kamble

#प्रीतिप्रभा #मराठीविचार #माणुसकी #माणूसकी #प्रेम #प्रीत  वणवण जरी नशीबी असली
का करावा उगाच त्रागा?
कास धरावी माणुसकीची
विणूनि प्रीत धागा धागा

©Shankar kamble

शोधतो मी वाट एक ती माणसांना जोडणारी वेगळा ना गली मोहल्ला जात धर्मास खोडणारी भेदभावना पुसुनी रेषा नांदू सारे सौख्यभरे मनीं जागवू माणुसकीला राग, द्वेष ना कुठे उरे नको हलाहल वैरत्वाचे प्रेम, शांतीचा मार्ग खरा देश भावना ठेवू जागृत वीरांना त्या नित्य स्मरा कोंदटलेले धुरकटलेले मळभ पोसले सभोवरी गुंतलेली गाठ उकलूनी हृदये जोडू आता तरी मातृवेल ती एक आपुली सुंदर सुमने किती गोजिरी रंग, गंध जरी असे वेगळा एकची होती माळ सरी हवी कशाला चौकट आता बंधुत्वाला नको उंबरा उघडून द्वारें बंद मनाची उजळून जावो मनः गाभारा ©Shankar kamble

#देशप्रेमकीभावना #मराठीसंस्कृति #देशभक्ति #एकात्मता #भाईचारा #IndiaLoveNojoto  शोधतो मी वाट एक ती
माणसांना जोडणारी
वेगळा ना गली मोहल्ला
जात धर्मास खोडणारी

भेदभावना पुसुनी रेषा
नांदू सारे सौख्यभरे
मनीं जागवू माणुसकीला
राग, द्वेष ना कुठे उरे

नको हलाहल वैरत्वाचे
प्रेम, शांतीचा मार्ग खरा
देश भावना ठेवू जागृत
वीरांना त्या नित्य स्मरा

कोंदटलेले धुरकटलेले
मळभ पोसले सभोवरी
गुंतलेली गाठ उकलूनी
हृदये जोडू आता तरी

मातृवेल ती एक आपुली
सुंदर सुमने किती गोजिरी
रंग, गंध जरी असे वेगळा
एकची होती माळ सरी

हवी कशाला चौकट आता
बंधुत्वाला नको उंबरा
उघडून द्वारें बंद मनाची
उजळून जावो मनः गाभारा

©Shankar kamble

बिलगल्या उन्हाला आज किती दिसांनी सावल्या गुंतले क्षण ते हळवे गोठल्या निमिष जागल्या स्पंदनांच्या गोड लकेरी भान देहाचे ना उरलें दाटले मेघ वळीवाचे विरहाचे उन्हाळे सरले मोहरे लता लाजूनी अंतरात ओढ तरुची कोशात लपेटून घेता तृप्त झाली तृषा युगाची मधुगंध दरवळे ओला साजरा प्रणय सोहळा हळदीचा रंग नभाला मेहंदीस नवा उजाळा तारकांची शुभ्र लेणी विलसती अजूनही नभा साक्ष देती संगमाची सागरी चांद तो उभा एकरूप झाले दोन्ही भेद सारे गळून गेले हळुवार स्पर्शीता तारा झंकारून गीत आले ©Shankar kamble

#मराठीप्रेम #प्रेमकवि #प्रेम #प्रणय #विरह #लव्ह  बिलगल्या उन्हाला आज
किती दिसांनी सावल्या
गुंतले क्षण ते हळवे
गोठल्या निमिष जागल्या

स्पंदनांच्या गोड लकेरी
भान देहाचे ना उरलें
दाटले मेघ वळीवाचे
विरहाचे उन्हाळे सरले

मोहरे लता लाजूनी
अंतरात ओढ तरुची
कोशात लपेटून घेता
तृप्त झाली तृषा युगाची

मधुगंध दरवळे ओला
साजरा प्रणय सोहळा
हळदीचा रंग नभाला
मेहंदीस नवा उजाळा

तारकांची शुभ्र लेणी
विलसती अजूनही नभा
साक्ष देती संगमाची
सागरी चांद तो उभा

एकरूप झाले दोन्ही
भेद सारे गळून गेले
हळुवार स्पर्शीता तारा
झंकारून गीत आले

©Shankar kamble
#वळीवाचापाऊस #जीवनअनुभव #प्रेमकवि #सांजवेळ #प्रेम #WritersMotive
Trending Topic