tags

New जपली जातात Status, Photo, Video

Find the latest Status about जपली जातात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जपली जातात.

  • Latest
  • Popular
  • Video
#कविता  अगदी निखालस..

असंही नाही आणि तसंही नाही...
पण खरं सांगू का?
एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे..
म्हणजे असं बघ..
तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार...
सौभाग्याच्या सीमेशिवाय...
पण तरीही ..हो तरीही...एखादा असा श्वास हवा वाटतो मला जो माझ्या अतृप्त असलेल्या मनाला तृप्त करेल आणि एक ..फक्त एक श्वास माझ्यात असा भरेल जो सगळ्या उणिवांना सातासमुद्रापार दूर फेकून देईल...
मी घोळक्यात असो की असो मी एकांतात...माझ्या चेहऱ्यावर येणारी ती उदासवाणी रेघ दिसूचं नये माझ्या चेहऱ्यावर असे मला सातत्याने वाटते...आणि म्हणूनच हा आर्त भाव व्यक्त करण्याचा अट्टाहास बघं...
तू ही म्हणशील काय हे खुळ घेऊन बसलीयेस डोक्यात...काहीचं वाटत नाही कसं तुला हे सगळं व्यक्त व्हायला...
पण खरं सांगू...
नाही वाटत मला रे...
तुला माहिती आहे...
अजून माझ्या अधरांवरची ती गुलाबी लाली तशी तशीच आहे...
मला वाकोल्या दाखवत..
मला चिडवत...
हो...
नाही उतरला कधी अधर माझ्या अधरांवर कारण मला माझ्या अधरांना अशा अधरांत सोपवावेसे नाही वाटत ज्या अधरांना अधरात सामावताना मला ग्लानी वाटेल...
मला ते अधर निर्व्यसनी हवेत ...
मला ते अधर कमळाच्या फुलांगत हवेत...
जे मातीतही उगवून देवीदेवतांच्या चरणी अर्पिले जातात...
गोड गुपित आहे हे माझे...
असो...
मी अशीच आहे रे...
नाही म्हणजे नाहीचं...
राहिल्या काही भावना उपाशी तर काय बिघडते पण तत्वांशी नाही बरं वैर करायच....
ए ऐक ना....
तू तो माझा श्वास होशील का...
अधरांशी हितगुज करणारा आभास होशील का...
नाही...म्हणजे तुला तिथूनच आल्या पाऊली जावे लागणार हे निश्चित...
आणि हो जाण्याच्या तयारीने यावेस ...
आलास तर....
पण अधरांचे संगीत मात्र ऐकायचे आहे हं मला...
अगदी निखालस......

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र क

135 View

#कविता #boatclub  जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे
नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे

कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होताना
लागावा की ठसका उगा ओरखडा मनावर करताना

मुजून जातात खुणा व्रणाच्या घाव परी ठरलेला
का म्हणून सोडावा हात हातात एकदा धरलेला

सोडावा की स्वाभिमान नात्याला ह्रदयी कोरताना
पाझरतील नयन आपसूकच प्रीत उरी स्मरताना

जगलेल्या क्षणांनी व्हावे समजूतदार नको हट्ट उगा
वाईट काळातही जगलेला क्षणच वाटतो की हो सगा

काळ येवो कितीही सरसावून क्षणच होतात ढाल
मनोदशा बदलायला क्षणांचीच तर ओढावी लागते शाल

जगलेल्या क्षणांचा व्हावा जागर नाद मनी घुमवावा
पडत्या क्षणांत असता आपण जगलेला क्षण आठवावा.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान

171 View

Trending Topic