tags

New काळीज Status, Photo, Video

Find the latest Status about काळीज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about काळीज.

  • Latest
  • Popular
  • Video
#शायरी #outofsight  प्रेम मी रे जाणले..

मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले
पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले

वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले
काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले

काय चुकले माझे की मी माझेपण अर्पिले
पाषाण ह्रदयी असणाऱ्याला शेंदुराने सजविले

घाव बसता घावावर हाक तरी निघावी कशी
निपचित पडून वेडे सत्त्व घेत असे वामकुक्षी

ह्रदया तुझ्या कारणे मी काय काय सोसले
शब्द आग ओकताना रे कुठले देऊ दाखले

एक बरे जाहले मला वेडीला प्रेम रे घावले
काळजाला काजळवणारे प्रेम मी रे जाणले.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर

252 View

#hibiscussabdariffa #शायरी  काळीज तुटता तुटता..

काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस
का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस

वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत
अंधार करुन भवताली अखंड असतो चाचपडत

नशीब म्हणून जयाचे लागेबांधे जो जपतो
कमनशिबी बनण्याचे खापर तोच पचवतो

प्रेम करुनिया वैकुंठी रिक्त ज्याची ओंजळ
भाव तयाचे असतात किती किती प्रांजळ

हे राम तुम्ही म्हणता मर्यादाचे कर पालन
अपनत्व इच्छा मनी अवगुणांचे व्हावे क्षालन

कसे आणि कोठून उधार घ्यावयाचे धैर्य
जयाच्या मनी सदैव असतच नाही स्थैर्य

काळीज असणाऱ्यांचा काळोख दाटून उरतो
प्रेम हवे म्हणूनिया प्रेमाचा रोमरोम थरथरतो

त्या वेदनेला कुठून यावी ग्लानी शांततेची
काळजाला कला अवगत काळीज जोडण्याची.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन

243 View

Trending Topic