📖 गर्जा महाराष्ट्र माझा. .✍️
महाराष्ट्र माझा . .
जय जय महा - राष्ट्र माझा . . 2x
अभिमानाने जयघोष घुमू दे
सुर्यतेज - हा राष्ट्र माझा . .
घेऊनी प्रज्वलित मशाल हाती . .
सुलतानांच्या छाताळावर
कंप दावण्या तू
चाल पाऊले पुढे . .
रौद्र रूप !
हे भरतवंशी ; दाखव तू खरा . .
गनिमांच्या त्या काळोखाला पळविण्या
ढाल तलवार घेऊनी ,
तु सज्ज हो आता .. 2x
इंद्रप्रस्थ गाठण्या . .
भगवा झेंडा विजयरथ हा घेऊनी
हिंदुस्थानाचे रक्षण करण्या . . ,
शिव शंभूंचा आदेश हा तुला ;
विजय प्रण हे घेऊनी
इंद्रप्रस्थी भगवा झेंडा रोवण्या _
लाखासी एक लढण्यासाठी
निघाले लढवय्ये वीर मराठे . .
चाल अशी ही हिंद
वीर पुत्रांची पाहुनी . .
सलाम करती आसमानी नभा !
हिंदुस्थानाला ताज मिळविण्या सज्ज
हा राष्ट्र माझा_
गगना वरी हे नाद घुमू दे
गर्जा महाराष्ट्र माझा_
दाही दिशांना विजय जयघोष ऐकवीण्या
गर्जा महाराष्ट्र माझा_
जयतु हिंदु-स्थान माझा_
विजय हो महाराष्ट्र माझा _
गर्जा महाराष्ट्र माझा _
अजेय हा हिंदुस्थान माझा_
- कवी - ध . वि . गोपतवार
©Dharmendra Gopatwar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here