tags

New रडू नको बाळा Status, Photo, Video

Find the latest Status about रडू नको बाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about रडू नको बाळा.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता

तू जाऊ नको रुसुनी..

90 View

नकोत मज नाती... नकोत आता शब्द... मज काही नको नको... मी बरी आहे एकटीच... परी आहे सोबतीस माझ्या... नात्यात्तले शब्द तुझे अन्...

585 View

#कविता #boatclub  जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे
नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे

कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होताना
लागावा की ठसका उगा ओरखडा मनावर करताना

मुजून जातात खुणा व्रणाच्या घाव परी ठरलेला
का म्हणून सोडावा हात हातात एकदा धरलेला

सोडावा की स्वाभिमान नात्याला ह्रदयी कोरताना
पाझरतील नयन आपसूकच प्रीत उरी स्मरताना

जगलेल्या क्षणांनी व्हावे समजूतदार नको हट्ट उगा
वाईट काळातही जगलेला क्षणच वाटतो की हो सगा

काळ येवो कितीही सरसावून क्षणच होतात ढाल
मनोदशा बदलायला क्षणांचीच तर ओढावी लागते शाल

जगलेल्या क्षणांचा व्हावा जागर नाद मनी घुमवावा
पडत्या क्षणांत असता आपण जगलेला क्षण आठवावा.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान

171 View

#शायरी #Hope  बाकी असणारचं आहे..

वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात...
हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात...
काही काही देणेघेणे नसताना...
येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो...
शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू...
आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा..
एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन...
सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी...
तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार?
निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल...
 " बसं...की अजून काही' '
अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते..
शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो..
स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो...
हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे...
मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची...
जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल...
मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला...
अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने..
काय अधिकार असतो आपला आपल्यावर...
नक्कीच नाही...
जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे...
कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे...
व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा.....
जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय....
कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल...
आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा  मी उतरंडीच्या पहिल्या   गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले...
मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी...
आता ना कुठला विचार ना कुठली भावना...
आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास.....
बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी.....
गढलेली...दडलेली आणि वेढलेली.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा

198 View

#शायरी #Hope  उन्हाच्या झळा..

उन्हाच्या झळा या लागता
नकोच करु त्रागा त्रागा
इतके सुंदर आयुष्य असता
का समजतोस रे अभागा

श्वास जोवरी चालू तुझा
तू तुझा रे रखवाला
अविचार करुनिया नको रे
घालू आयुष्यावर घाला

चालून बघ दोन पावले
गती येईल चालण्याला
अनाहत नाद तुझ्याच अंतरी
तुला येईल रे भेटण्याला

ध्यानमग्न होता होता
शंखनाद ही येईल ऐकू
ओमकार जो करील जाप
कोणापुढे ना देणार झुकू

शाश्वत आहे अमर आत्मा
आरोग्य हा तयाचा मार्ग खरा
कशास धुंडाळितो इतस्ततः
अंतरात तुझाच शोध घे ना जरा.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#Hope उन्हाच्या झळा या लागता नकोच करु त्रागा त्रागा इतके सुंदर आयुष्य असता का समजतोस रे अभागा श्वास जोवरी चालू तुझा तू तुझा रे रखवाला अविचा

279 View

#शायरी  श्वासांचा श्वासांना पडता विळखा..

कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही
मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही

हवा असतो मला नित्य सोहळा तनामनाचा
 थरार अनुभवायचा असतो प्रत्येक क्षणाचा

लपेटून घ्यायचे असते तुला उबदार श्वासात
नको असतो थोडाही दुरावा प्रणयी सुवासात

विळख्यात तुझ्या अखंड डुंबून माळावा सुगंध
भिडता नजरेला नजर यौवनाचा भलताच गंध

कडाडावी शलाका रे तुझ्या हळुवार स्पर्शाने
मी माळावा अवघा वसंत किती किती हर्षाने

श्वासांचा श्वासांना पडता विळखा मंत्रमुग्ध व्हावे
मला जे जे सांगायचेय ते न सांगता तुला कळावे

सरसावून यावास तू मला घेण्या मिठीत सखया
सामावता तुझ्या बाहूत क्षणही नको जावा वाया......

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनाम

243 View

Trending Topic