Bhushan Thakare

Bhushan Thakare

  • Latest
  • Popular
  • Video
#Chess  हल्ली झेंडे आणि सतरंज्याही
अगदी खोडकर वागतात..
त्यांना उचलण्यासाठी निष्ठावंत
कार्यकर्त्यांचेच हात लागतात..
✍️

©Bhushan Thakare

#Chess

126 View

#MakarSankranti2021 #Quotes  म-मनात जपूनी वसा स्नेहबंधनाचा
क-कप्पा सजवूया गोड आठवणींचा
र-रस रंग छंद उधळण करण्याचा
सं-संगित भरुनी हृदयी जीवनगाणे गाण्याचा
क्रां-क्रांती करून उत्क्रांत होण्याचा 
ति-तिळगुळाप्रमाणे गोडवा जपण्याचा

मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा 
🪁🪁🪁🪁🪁
✍🏻भुषण ठाकरे (खाकुर्डी)

©Bhushan Thakare
#NojotoRamleela #Quotes  राम शाकाहारी की मांसाहारी
ह्या निरर्थक वादाने रामराज्य येणार नाही
रामराज्यासाठी राम आचरणात आणणे
आम्हाला कधीच जमणार नाही

✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare
#WallPot #Quotes  सरत्या वर्षाला काय द्यावा निरोप

केलेल्या चुकांना कटाक्षाने टाळून 
आनंदी क्षणांना हृदयात माळून 
दुःखद क्षणांना सहज गिळून 
सरत्या वर्षाला निरोप देऊ सर्व मिळून

नवीन वर्षाचा काय करावा संकल्प

अहंकार, धर्मजाती भेदाला जाळून 
माणुस म्हणुन जगण्याच्या सर्व मर्यादा पाळून 
आयुष्याच्या पुस्तकाला नव्याने चाळून 
नवीन वर्षाचे स्वागत करुया सर्व मिळून

नुतनवर्षाभिनंदन 💥

©Bhushan Thakare

#WallPot

99 View

काट्याला फक्त बोचणेचं माहिती त्यात त्याचा दोष नाही.. हे मी जाणले म्हणून माझा तुझ्यावर रोष नाही.. ©Bhushan Thakare

#Flower  काट्याला फक्त बोचणेचं माहिती
त्यात त्याचा दोष नाही..
हे मी जाणले म्हणून माझा
तुझ्यावर रोष नाही..

©Bhushan Thakare

#Flower

12 Love

विरोधात असता येई छातीत कळ सत्तेशी जाता शरण मिळे महाशक्तीचे बळ ईडीकडूनही होई याचिका प्रत गहाळ आता पोपटासारखे बोलतात निरोगी भुजबळ ✍️भुषण ठाकरे ©Bhushan Thakare

#Hill  विरोधात असता येई 
छातीत कळ
सत्तेशी जाता शरण मिळे 
महाशक्तीचे बळ
ईडीकडूनही होई 
याचिका प्रत गहाळ
आता पोपटासारखे बोलतात
 निरोगी भुजबळ 

✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare

#Hill

15 Love

Trending Topic