somadatta kulkarni

somadatta kulkarni

  • Latest
  • Popular
  • Video
#Motivational  White बाप एक कल्पवृक्ष

बाप खरेच असतो
एक कल्पवृक्ष
जो नेहमीच असतो
कुटुंबासाठी दक्ष

बाप झटतो दीन रात
नाही बाळगत तमा
प्रेम सदैव काळजात
करी सर्वां क्षमा

बापाची महती थोर
झटतो दिनरात 
सर्वांच्या खुशालीचा           
त्याला असतो घोर

एवढे सारे करूनही
बाप दुर्लक्षित
दुनियेच्या नजरेत
बाप उपेक्षित

©somadatta kulkarni

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

99 View

#flowers #Quotes  White फुल


अर्पितो फुल तुज

परमदयाळा

सांगतो गूज

मनातील

दे मज

यश

तु


नेत्र कमळी तुज 

नित्य साठवितो

हृदयात मी

जी पाहतो

तेजस्वी

मुर्ती

ती

©somadatta kulkarni

#flowers

90 View

 राम लहरी

धुंद झाले अवघे त्रैलोक्य
राम लहरी उमटल्या येथ
राम नामात दंग झाले सर्व
नाही दुःखाचा लवलेश तेथ  १

भवसागर खास पार होईल
अविनाश ब्रम्ह समजेल
घेता रामनाम निशिदिनी
संसाराचे मर्म उमजेल.  २

©somadatta kulkarni

राम लहरी धुंद झाले अवघे त्रैलोक्य राम लहरी उमटल्या येथ राम नामात दंग झाले सर्व नाही दुःखाचा लवलेश तेथ १ भवसागर खास पार होईल अविनाश ब्रम्ह समजेल घेता रामनाम निशिदिनी संसाराचे मर्म उमजेल. २ ©somadatta kulkarni

117 View

#snowpark  स्वातंत्र्यवीर  सावरकर


अवध्य असे मी | पुत्र भारताचा

वीर आहे साचा | या भूमीचा       १


सोडून संपदा |करी देश सेवा

इंद्र करी हेवा |सुपुत्राचा              २


अभिनव भारत |संघटना थोर

 कार्य आहे फार |सुपुत्रांचे            ३


ब्रिटिशांनी दिली |जन्मठेप शिक्षा

नच मागे भिक्षा | त्यांच्या पुढे           ४


भोगी कष्ट बहु | नाही ती विश्रांती

कष्टविली कांती |देशासाठी              ५


सेल्युलर जेल |तीर्थक्षेत्र झाले

उदोकार चाले |दास म्हणे               ६


सोमदत्त कुलकर्णी

©somadatta kulkarni

#snowpark

117 View

#snowpark  शीर्षक:  काय करावे?


विचारात हरवून गेलो 

काय करावे काही सुचेना

येता तुझी मुर्ती सामोरी

मज दुसरे काही दिसेना   १


तव स्वरूपात हरवलो

माझे काही ‌मुळी न राहिले

जळी काष्टी पाषाणी सर्वत्र

फक्त एक तुजला पाहिले   २


येतो पुन्हा तो नवा दिवस 

नवी आशा नी नवी उमेद

काय करावे नच सुचते

पण नाही होणार नाउमेद  ३


नाही येथे पर्याय कष्टास

श्रम करणे हे प्राप्त आहे

श्रम जीवी मम आयुष्यात

भगवान मी सदैव पाहे    ४

©somadatta kulkarni

#snowpark

162 View

#MountainPeak  शीर्षक: जत्रा

आहे सर्व पंचक्रोशीत
ख्यात मम गावची जत्रा 
आज चाललो मी जत्रेत
घेऊनी रुपये सतरा       १

खाईन आज पाणी पुरी
खेळणार मी सर्व खेळ
होतो खर्च काय सांगावे
नाही बसत ईथे मेळ   २

खुप खुप मजा करीन
जत्रा मित्रांसवे पाहीन
नाही उद्याची चिंता मज
आनंदी सदैव राहिन    ३

आहे खरी वर्षांची यात्रा
उद्याची शाश्वती नसते
करूया मौज मजा आज
मम हृदयी प्रीत वसते   ४

©somadatta kulkarni

#MountainPeak

153 View

Trending Topic