Rajkumar Mundhe

Rajkumar Mundhe

91-7066734321

  • Latest
  • Popular
  • Video
#जीवनअनुभव #trappedheart

#trappedheart

167 View

#मराठीकविता

राजकुमार मुंडे जालना महाराष्ट्र

166 View

कोण काय म्हणतो याचा विचार मी कधी करत नाही शंभर असतात आजूबाजूला हिशोबात त्यांना कधी मी धरत नाही.... खूप मोठा नाही पण इतकाही छोटा नाही... आनंद चेहऱ्यावरचा कधी सरत नाही त्यामुळेच म्हणा मी कधी हरत नाही.... गोठोडे आहे खुपसाऱ्या आठवणींचे व अनुभवाचे जे नाही त्यासाठी कधी मी झुरत नाही.. नका मोजून पाहू मला कोणत्याच मापात मी पुरत नाही... खूपदा फसतो.. स्वतशीच हसतो हौस माझीही कधी जिरत नाही असेल तेवढे मोजून देतो जवळ काही कधी उरत नाही अनंत दुःख अनंत अडचणी पण रडत कधी फिरत नाही चुटकीत विषय करतो पूर्ण जास्त खोलात मी कधी शिरत नाही... राजकुमार मुंडे,जालना 09/05/2022 ©Rajkumar Mundhe

#मराठीकविता #Moon  कोण काय म्हणतो 
याचा विचार 
मी कधी करत नाही
शंभर असतात आजूबाजूला
हिशोबात त्यांना कधी 
मी धरत नाही....

खूप मोठा नाही 
पण इतकाही छोटा नाही...
आनंद चेहऱ्यावरचा 
कधी सरत नाही
त्यामुळेच म्हणा 
मी कधी हरत नाही....

गोठोडे आहे खुपसाऱ्या 
आठवणींचे व अनुभवाचे
जे नाही त्यासाठी 
कधी मी झुरत नाही..
नका मोजून पाहू मला 
कोणत्याच मापात 
मी पुरत नाही...

खूपदा फसतो..
स्वतशीच हसतो
हौस माझीही 
कधी जिरत नाही
असेल तेवढे मोजून देतो 
जवळ काही कधी उरत नाही

अनंत दुःख अनंत अडचणी
पण रडत कधी फिरत नाही
चुटकीत विषय करतो पूर्ण 
जास्त खोलात मी कधी शिरत नाही...


राजकुमार मुंडे,जालना 
09/05/2022

©Rajkumar Mundhe

#Moon

7 Love

भोंगे बंद करून बंड उभे राहतील अर्धे इकडचे मरतील अर्धे तिकडचे मरतील.... सभा मोठी घेऊन नेते पसार होतील मुक्कया माराचा आढावा मस्त ए सीत बसून घेतील... पोलिस स्टेशनमध्ये पोरावर गुन्हे दाखल होतील अर्धे पोरे सुटतील अर्धे तुरुंगात जातील दंगे करायला पुरती इस्टेट नाही पुढे भिकमागे धंदे करावे लागतील मोकाट होतील लोक वेडे होऊन दात इचकतील आज्ञानाच्या आंधाराखाली आयुष्यभर् रडतील... राजकुमार मुंडे जालना ©Rajkumar Mundhe

#मराठीकविता #Moon  भोंगे बंद करून 
बंड उभे राहतील
अर्धे इकडचे मरतील 
अर्धे तिकडचे मरतील....

सभा मोठी घेऊन 
नेते पसार होतील
मुक्कया माराचा आढावा
मस्त ए सीत बसून घेतील...

पोलिस स्टेशनमध्ये 
पोरावर गुन्हे दाखल होतील
अर्धे पोरे सुटतील 
अर्धे तुरुंगात जातील

दंगे करायला पुरती 
इस्टेट नाही
पुढे भिकमागे धंदे 
करावे लागतील

मोकाट होतील लोक
वेडे होऊन दात इचकतील
आज्ञानाच्या आंधाराखाली
आयुष्यभर् रडतील...


राजकुमार मुंडे जालना

©Rajkumar Mundhe

#Moon

8 Love

#मराठीविचार #lovebeat

#lovebeat

46 View

#मराठीविचार #Geetkaar

रशिया युक्रेन उद्ध बाबत विचार #Geetkaar

68 View

Trending Topic