Prasaad Shendage

Prasaad Shendage Lives in Mumbai, Maharashtra, India

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...

  • Latest
  • Popular
  • Video

होता होता, राहूनी जाते, मनासारखे काही.... होईल कधीतरी मनासारखे, पण जगासारखे नाही.... ©Prasaad Shendage

#मराठीकविता  होता होता,
राहूनी जाते,
मनासारखे काही....
होईल कधीतरी मनासारखे,
पण जगासारखे नाही....

©Prasaad Shendage

होता होता, राहूनी जाते, मनासारखे काही.... होईल कधीतरी मनासारखे, पण जगासारखे नाही.... ©Prasaad Shendage

10 Love

शब्दांत गुंतुनी जाता, मज भान कशाचे नसते... गर्दीत स्तब्ध हा देह, शब्दांचे वादळ नुसते.... भाबड्या मनाच्या ओळी, भाबड्या भावना टीपते.... मग अशीच होते कविता, जेव्हा भान कशाचे नसते...जेव्हा..ss. ©Prasaad Shendage

#जेव्हाभानकशाचेनसते #सुचलेल्याओळी #प्रसादशेंडगे #मराठीकविता  शब्दांत गुंतुनी जाता,
मज भान कशाचे नसते...
गर्दीत स्तब्ध हा देह,
शब्दांचे वादळ नुसते....
भाबड्या मनाच्या ओळी,
भाबड्या भावना टीपते....
मग अशीच होते कविता,
जेव्हा भान कशाचे नसते...जेव्हा..ss.

©Prasaad Shendage

कोवळ्या पंखास माझ्या, उडण्याचे बळं दिले... बेभान माझ्या आयुष्याला, जगण्याचे भानं दिले..... त्याग तुमचा खूप मोठा, आयुष्य सारे आम्हांसाठी खर्च केले... कसे सांगू ,काय सांगू, येते भरून डोळ्यांत पाणी, शब्दांत नाही मावणार, मनातले सारं काही... मनातले सारं काही.... ©Prasaad Shendage

#मराठीकविता  कोवळ्या पंखास माझ्या,
उडण्याचे बळं दिले...
बेभान माझ्या आयुष्याला,
जगण्याचे भानं दिले.....
त्याग तुमचा खूप मोठा,
आयुष्य सारे
 आम्हांसाठी खर्च केले...
कसे सांगू ,काय सांगू,
येते भरून डोळ्यांत पाणी,
शब्दांत नाही मावणार,
मनातले सारं काही...
मनातले सारं काही....

©Prasaad Shendage

कोवळ्या पंखास माझ्या, उडण्याचे बळं दिले... बेभान माझ्या आयुष्याला, जगण्याचे भानं दिले..... त्याग तुमचा खूप मोठा, आयुष्य सारे आम्हांसाठी खर्च केले... कसे सांगू ,काय सांगू, येते भरून डोळ्यांत पाणी, शब्दांत नाही मावणार, मनातले सारं काही... मनातले सारं काही.... ©Prasaad Shendage

8 Love

आकार,उकार, मात्रा,वेलांटी, ह्या फक्त शब्दांना असतात... पण.., भावना मात्र साध्या आणि सरळ असतात..... ©Prasaad Shendage

#प्रसादशेंडगे #मराठीकविता #सुचलेल्या #शब्दभावना  आकार,उकार, मात्रा,वेलांटी,
ह्या फक्त शब्दांना असतात...
पण..,
भावना मात्र साध्या आणि
सरळ असतात.....

©Prasaad Shendage

क्षण.. सुखाचे सोबती, क्षण.. दुःखाचे सारथी... क्षण.. मृगजळाचा टिळा, क्षण.. लावतो हा लळा... क्षण.. भावनांचा पसारा, क्षण.. वेदनांचा निवारा... क्षण.. भाबडा हा दिलासा, क्षण.. सारखा हा हवासा... सुचलेल्या ओळी..✍️ ©Prasaad Shendage

#सुचलेल्याओळी #प्रसादशेंडगे #मराठीकविता #क्षण  क्षण.. सुखाचे सोबती,
क्षण.. दुःखाचे सारथी...
क्षण.. मृगजळाचा टिळा,
क्षण.. लावतो हा लळा...
क्षण.. भावनांचा पसारा,
क्षण.. वेदनांचा निवारा...
क्षण.. भाबडा हा दिलासा,
क्षण.. सारखा हा  हवासा...
सुचलेल्या ओळी..✍️

©Prasaad Shendage

ह्या मनाचे भाव भोळे, अंतरीचे घाव ओले... ओथंबून बघ आले वरती, मनातले ते शब्द सारे...!! प्रसाद शेंडगे..✍️ ©Prasaad Shendage

#सुचलेल्याओळी #प्रसादशेंडगे #मराठीशायरी #भाव  ह्या मनाचे भाव भोळे,
अंतरीचे घाव ओले...
ओथंबून बघ आले वरती,
मनातले ते शब्द सारे...!!
प्रसाद शेंडगे..✍️

©Prasaad Shendage
Trending Topic