Sai Raj Mainkar

Sai Raj Mainkar

  • Latest
  • Popular
  • Video
#कविता  घेते भरुन श्वासात
स्पंदने तुझी मोरपिशी 
सोबत तुझी असता 
बहकते मी जराशी

करु नको मनाई
मोहरल्या क्षणात
गच्च पावसाला या
थोपवू नको मनात

आरस्पानी सुखास
घे कवेत घट्ट रोखुनी
पुन्हा माहित नाही 
क्षण येतील का परतुनी

पुरे आता बहाणा 
 पडदा नको लाजेचा
घे उमजून तू राजा
इशारा या पावसाचा

©Sai Raj Mainkar

मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

108 View

#कविता #BaadalBarse

#BaadalBarse पाऊस कविता

117 View

#कविता  किती वाचतो तुला तरी
नेमके मर्म कळत नाही
इतके अनाकलनीय तरी 
कधी कोणी असतं नाही 

तुझ्या मनाचा कौल जाणणे
तसे इतकेही सोप्पे नाही
हव्यास जाणण्याचा पण
मला टाळता येत नाही

ठरवतो पुन्हा पुन्हा तिथेच
घुटमळणे आता बरे नाही 
तरी रोजची तिचं पायवाट
बदलणे मला जमत नाही

वाईट असते आशा मनाची
निराशेत गुंतणे रुचत नाही
लिहायला घेतो जेव्हा कविता 
उल्लेख तिचा टळत नाही

वाटते तिला मुद्दाम घडते सारे
वारंवार योगायोग घडत नाही 
कसे सांगू तिला ? ठरवून योग
मला कधी गाठता आला नाही..

©Sai Raj Mainkar

किती वाचतो तुला तरी नेमके मर्म कळत नाही इतके अनाकलनीय तरी कधी कोणी असतं नाही तुझ्या मनाचा कौल जाणणे तसे इतकेही सोप्पे नाही हव्यास जाणण्याचा पण मला टाळता येत नाही ठरवतो पुन्हा पुन्हा तिथेच घुटमळणे आता बरे नाही तरी रोजची तिचं पायवाट बदलणे मला जमत नाही वाईट असते आशा मनाची निराशेत गुंतणे रुचत नाही लिहायला घेतो जेव्हा कविता उल्लेख तिचा टळत नाही वाटते तिला मुद्दाम घडते सारे वारंवार योगायोग घडत नाही कसे सांगू तिला ? ठरवून योग मला कधी गाठता आला नाही.. ©Sai Raj Mainkar

72 View

#कविता #MereKhayal

#MereKhayal

27 View

#कविता #merikahaani

#merikahaani

27 View

#कविता #yemausam

#yemausam

27 View

Trending Topic