komal borkar

komal borkar

  • Latest
  • Popular
  • Video

komal's Live Show

komal's Live Show

Thursday, 11 April | 05:19 pm

0 Bookings

Expired

महान क्रांतिकारक, समाजसुधारक, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महान विद्वान पंडित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏 एक क्रांतीची मशाल, स्त्री कर्तुत्वाची प्रेरणा,  बहुजनांचे कैवारी, दिन दुबळ्यांचा महान सुर्य, समाजसुधारक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले . ज्या महान सुर्याने स्वत:च संपूर्ण जीवन इथल्या बहुजन समाजासाठी खर्ची केल, बहुजनासाठीच नाही तर इथल्या ब्राह्मण वर्गातील स्त्रियांना लढण्याचे सामर्थ्य दिलं.स्त्रि ही जरी ब्राह्मण वर्गातील असली तरी तीलाही बंधने होती,  पुरुषप्रधान संस्कृती असल्याने तीलाही हिन दर्जाची वागणूक मिळत होती म्हणून समाजातील सगळ्या स्त्रियांना सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. 1940ला जेव्हा महात्मा ज्योतीबा फुलेंच लग्न माता सावित्रीआई सोबत झाले तेव्हा  ज्योतीबा 12वर्षाचे आणि सावित्रीआई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या, सावित्री आई शिकल्या नव्हत्या,परंतु सावित्रीला शिकण्याच धाडस होतं, त्या लहानपणापासूच कर्तुत्वान होत्या,परंतु त्या काळामध्ये  स्त्रिया शिक्षण घेण म्हणजे महापाप समजल्या जात होतं. स्त्रियांना अबला समजल्या जात होत, स्त्री शिकली म्हणजे त्या अक्षरांच्या अळ्या पडतील आणि त्या मग नवऱ्याच्या ताटात पडतील  अशा पद्धतीच्या जुलमी नियमांना त्यांना सामोरे जावे लागत होते , त्यांना घराबाहेर पडु देत नव्हते , अशा परिस्थितीत  महात्मा ज्योतीबांना समजलं होत की शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही  पर्याय नाही,स्त्रि शिकली तर स्वतंत्र होणार, तीचे स्वतंत्र मत असणार,घरातील मुलां-मुलींना शिकवणार, स्त्रि प्रगत होणार.  म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरूवात स्वत:च्याच घरापासुन  केली आणि सावित्रीला शिकवलं. समाजासाठी त्यांनी स्वत:च्या घराचा त्याग केला, वडीलांनी विरोध केला, तरीही न डगमगता फुले दाम्पत्य लढण्यासाठी तत्पर झाले.  हे फुले दाम्पत्य म्हणजे  चंदनासारख सुंगध देणार होतं,  ज्या मनुवादी संस्कृतीमुळे स्त्रिवर अत्याचार केला ,स्त्रिला सती जाव लागे, नवरा मेल्यावर तीच मुंडण केल्या जात होत,तीला दुसर लग्न करण्याचा अधिकार नव्हता , अशा  गुलामीत जीवन जगणाऱ्या  स्त्रियांना सक्षम करणारे विचार अठराव्या शतकात एखाद्या पुरुषांमध्ये असणे म्हणजे एक महान थोर विचारवंतच होय.  स्त्री ही शिकली पाहिजे ,प्रगत झाली पाहिजे म्हणून 1 जानेवारी 1848ला  पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात  मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली , आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीआई ह्या होत्या .शाळा ही 6 मुलींनी सुरु झाली,हळुहळु मुलींची संख्या वाढु लागली फुले दाम्पत्यांना खुप आनंद झाला,आणि त्यांची प्रेरणा वाढत गेली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक शाळा सुरू केल्या. परंतु यामुळे मनुवादी लोकांच्या पोटात दुखायला लागलं ,धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून ओरडु लागले याकडे दुर्लक्ष करत आपले कार्य सुरळीतपणे चालू ठेवले. इ.स 1849 ला  उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांसाठी शाळा सुरू केली.आणि तेव्हापासून  खरी शिक्षणाची सुरुवात झाली, हि शिक्षणाची सुरुवात करत असतांना ज्योतीबांच्या अनेक मित्रपरिवारांचा सहभाग होता. केशवपन प्रथा बंद करण्यासाठी नाह्वाचा संप घडवून आणला, 1853मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली,भृणहत्त्या टाळावी म्हणुन 1864 ला अनाथ बालकांसाठी अनाथाश्रम चालू केलं ज्योतीबांच हे कार्य अविरतपणे चालू होते.  1865 ला एका काशीबाई नावाच्या बालविधवेच्या मुलाला दत्तक घेतात आणि त्याच नाव यशवंत अस ठेवण्यात येते ,त्याला डॉ बनवतात,यशवंतही समाजासाठी योगदान देत असतो पाणी हि निसर्गाची देणगी आहे, सर्वांना पाणी पिता याव साठी 1868 ला स्वत:च्याच घरी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद चालू केला.  इ.स 1876-77 मध्ये खुप दुष्काळ पडला होता, एक वेळच्या जेवणासाठी लोकं वनवन फिरु लागली होती, भुकेने लोकांची जीव जात होते तेव्हा फुले दाम्पत्याने 52अन्नछत्रे चालु केली. महात्मा ज्योतीबा फुलेंना स्वत:च मुल नव्हतं म्हणून त्यांच्या  वडिलांनी म्हणजे गोविंदरावांनी दुसर लग्न करण्याचा सल्ला दिला आणि यासाठी सावित्रीआईचा सुध्दा होकार होता तेव्हा ज्योतीबा रागानेच सावित्रीला म्हणाले, "तुही असं म्हणते साऊ " तेव्हा  सावित्री हो म्हणतात,आपला 'वारसा ' समोर नेण्यासाठी, तेव्हा ज्योतीबा म्हणतात- की जो माझे कार्य समोर नेणार तो फुल्यांचे नाव चालवील, त्या साठी दुसरं लग्न करण्याची गरज नाही,यावरून महात्मा ज्योतिबांचे किती महान विचार होते हे समजून येते.  स्वता 40वर्ष चंदनासारखे झिजले ,सर्वांना स्वतंत्र जगण्याची संधी दिली अशा महान व्यक्तीला  1888 ला महात्मा ही पदवी मिळाली.  त्यांच्या या कार्याची दखल घेत कोल्हापूरचे राजरत्न सयाजीराव गायकवाड त्यांच्या कार्याची महान चर्चा बघुन फुले दाम्पत्याला   भेटायला आले, त्यांचे कार्य बघुन त्यांना गहिवरून आलं,  अशा महान सुर्याच महापरिनिर्वाण 28 नोव्हेंबर 1890 झालं, या महान क्रांतिकारकांचे विचार मात्र संपणार नाही, यासाठी आजच्या तरुण पिढीला सक्षम होण्याची गरज आहे. असे महान क्रांतिकारक या जगात पुन्हा होणे शक्य नाही,परंतु त्यांचे कार्य समोर घेऊन जाण्याच निर्धार करूया आणि त्यांच्या महान विचारांना वदंन करूया.  जय ज्योती जय क्रांती ©komal borkar

#wishes  महान क्रांतिकारक, समाजसुधारक, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे 
महान विद्वान पंडित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏

एक क्रांतीची मशाल, स्त्री कर्तुत्वाची प्रेरणा, 
बहुजनांचे कैवारी, दिन दुबळ्यांचा महान सुर्य, समाजसुधारक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले .
ज्या महान सुर्याने स्वत:च संपूर्ण जीवन इथल्या बहुजन समाजासाठी खर्ची केल, बहुजनासाठीच नाही तर इथल्या ब्राह्मण वर्गातील स्त्रियांना लढण्याचे सामर्थ्य दिलं.स्त्रि ही जरी ब्राह्मण वर्गातील असली तरी तीलाही बंधने होती,  पुरुषप्रधान संस्कृती  असल्याने तीलाही हिन दर्जाची वागणूक मिळत होती
म्हणून समाजातील सगळ्या स्त्रियांना सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. 
1940ला जेव्हा महात्मा ज्योतीबा फुलेंच लग्न माता सावित्रीआई सोबत झाले तेव्हा  ज्योतीबा 12वर्षाचे आणि सावित्रीआई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या, सावित्री आई शिकल्या नव्हत्या,परंतु सावित्रीला शिकण्याच धाडस होतं,
त्या लहानपणापासूच कर्तुत्वान होत्या,परंतु त्या काळामध्ये  स्त्रिया शिक्षण घेण म्हणजे महापाप समजल्या जात होतं. स्त्रियांना अबला समजल्या जात होत, स्त्री शिकली म्हणजे त्या अक्षरांच्या अळ्या पडतील आणि त्या मग नवऱ्याच्या ताटात पडतील  अशा पद्धतीच्या जुलमी नियमांना त्यांना सामोरे जावे लागत होते , त्यांना घराबाहेर पडु देत नव्हते ,
अशा परिस्थितीत  महात्मा ज्योतीबांना समजलं होत की शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही  पर्याय नाही,स्त्रि शिकली तर स्वतंत्र होणार, तीचे स्वतंत्र मत असणार,घरातील मुलां-मुलींना शिकवणार, स्त्रि प्रगत होणार. 
म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरूवात स्वत:च्याच  घरापासुन  केली आणि सावित्रीला शिकवलं. 
समाजासाठी त्यांनी स्वत:च्या घराचा त्याग केला, वडीलांनी विरोध केला, तरीही न डगमगता फुले दाम्पत्य लढण्यासाठी तत्पर झाले. 
हे फुले दाम्पत्य म्हणजे  चंदनासारख सुंगध देणार होतं, 
ज्या मनुवादी संस्कृतीमुळे स्त्रिवर अत्याचार केला ,स्त्रिला सती जाव लागे, नवरा मेल्यावर तीच मुंडण केल्या जात होत,तीला दुसर लग्न करण्याचा अधिकार नव्हता , अशा  गुलामीत जीवन जगणाऱ्या  स्त्रियांना सक्षम करणारे विचार अठराव्या शतकात एखाद्या पुरुषांमध्ये असणे म्हणजे एक महान थोर विचारवंतच होय. 
स्त्री ही शिकली पाहिजे ,प्रगत झाली पाहिजे म्हणून
1 जानेवारी 1848ला  पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात  मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली , आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीआई ह्या होत्या .शाळा ही 6 मुलींनी सुरु झाली,हळुहळु मुलींची संख्या वाढु लागली फुले दाम्पत्यांना खुप आनंद झाला,आणि त्यांची प्रेरणा वाढत गेली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक शाळा सुरू केल्या. परंतु यामुळे मनुवादी लोकांच्या पोटात दुखायला लागलं ,धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून ओरडु लागले याकडे दुर्लक्ष करत आपले कार्य सुरळीतपणे चालू ठेवले. 
इ.स 1849 ला  उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांसाठी शाळा सुरू केली.आणि तेव्हापासून  खरी शिक्षणाची सुरुवात झाली, हि शिक्षणाची सुरुवात करत असतांना ज्योतीबांच्या अनेक मित्रपरिवारांचा सहभाग होता.
केशवपन प्रथा बंद करण्यासाठी नाह्वाचा संप घडवून आणला, 1853मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली,भृणहत्त्या टाळावी म्हणुन 1864 ला अनाथ बालकांसाठी अनाथाश्रम चालू केलं
ज्योतीबांच हे कार्य अविरतपणे चालू होते. 
1865 ला एका काशीबाई नावाच्या बालविधवेच्या मुलाला दत्तक घेतात आणि त्याच नाव यशवंत अस ठेवण्यात येते ,त्याला डॉ बनवतात,यशवंतही समाजासाठी योगदान देत असतो
पाणी हि निसर्गाची देणगी आहे, सर्वांना पाणी पिता याव साठी 1868 ला स्वत:च्याच घरी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद चालू केला. 
इ.स 1876-77 मध्ये खुप दुष्काळ पडला होता, एक वेळच्या जेवणासाठी लोकं वनवन फिरु लागली होती, भुकेने लोकांची जीव जात होते तेव्हा फुले दाम्पत्याने 52अन्नछत्रे चालु केली. 
महात्मा ज्योतीबा फुलेंना स्वत:च मुल नव्हतं म्हणून त्यांच्या  वडिलांनी म्हणजे गोविंदरावांनी दुसर लग्न करण्याचा सल्ला दिला आणि यासाठी सावित्रीआईचा सुध्दा होकार होता तेव्हा ज्योतीबा रागानेच सावित्रीला म्हणाले, "तुही असं म्हणते साऊ " तेव्हा  सावित्री हो म्हणतात,आपला 'वारसा ' समोर नेण्यासाठी, तेव्हा ज्योतीबा म्हणतात-
 की जो माझे कार्य समोर नेणार तो फुल्यांचे नाव चालवील, त्या साठी दुसरं लग्न करण्याची गरज नाही,यावरून महात्मा ज्योतिबांचे किती महान विचार होते हे समजून येते. 
स्वता 40वर्ष चंदनासारखे झिजले ,सर्वांना स्वतंत्र जगण्याची संधी दिली अशा महान व्यक्तीला  1888 ला महात्मा ही पदवी मिळाली. 
त्यांच्या या कार्याची दखल घेत कोल्हापूरचे राजरत्न सयाजीराव गायकवाड त्यांच्या कार्याची महान चर्चा बघुन फुले दाम्पत्याला   भेटायला आले, त्यांचे कार्य बघुन त्यांना गहिवरून आलं, 
अशा महान सुर्याच महापरिनिर्वाण 28 नोव्हेंबर 1890 झालं, या महान क्रांतिकारकांचे विचार मात्र संपणार नाही, यासाठी आजच्या तरुण पिढीला सक्षम होण्याची गरज आहे. 
असे महान क्रांतिकारक या जगात पुन्हा  होणे शक्य नाही,परंतु त्यांचे कार्य समोर घेऊन जाण्याच निर्धार करूया आणि त्यांच्या महान विचारांना वदंन करूया. 

जय ज्योती जय क्रांती

©komal borkar

महात्मा ज्योतीबा फुले जयंती

12 Love

मायं म्हणे लेकराला । आस नगं त्या साळी- चोळीची फाटकचं लावीन तुझ्या बापानं घेतलेलं। फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। जाऊ नग तु राबाले वावरात आमचं आम्ही करून घेऊ कसं बसं । फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। भाडुं नग पैशासाठी तु आम्ही खावु चटणी भाकर पण तुला देईन तुप- रोटीच जेवन फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। ©komal borkar

#motherlove  मायं म्हणे लेकराला ।


आस नगं त्या साळी- चोळीची 
फाटकचं लावीन
तुझ्या बापानं घेतलेलं।
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

 जाऊ नग तु राबाले वावरात 
आमचं आम्ही करून 
घेऊ कसं बसं ।
फक्त एवढं कर तु 
आमच्या कष्टाचं सोनं कर तु। 

भाडुं नग पैशासाठी तु
आम्ही खावु चटणी भाकर 
पण तुला देईन तुप- रोटीच जेवन 
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

©komal borkar

मायं म्हणे लेकराला #motherlove

6 Love

नेहमी वाट पाहते त्या जगण्याची शुक्र तारेही लाजावे अश्या प्रेमाची । ©komal borkar

#BooksBestFriends  नेहमी वाट पाहते
त्या जगण्याची 

शुक्र तारेही 
लाजावे अश्या प्रेमाची ।

©komal borkar

प्रेम #BooksBestFriends

3 Love

समोर आहे ते नेहमी सत्यचं असतं अस नसतं । पडद्याआड असलेल्या गोष्टीमध्येही सत्य दडलेलं असतं। लहान दिसणाऱ्या मुंगीमध्ये बलाढ्य हत्तीला हरवण्याचे सामर्थ्य असते । असचं काहीस आपल्या आयुष्याचं असतं। म्हणुन दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं सत्य ओळखायला शिका। Bkomal ©komal borkar

 समोर आहे ते नेहमी सत्यचं असतं 
अस नसतं ।
पडद्याआड असलेल्या गोष्टीमध्येही 
सत्य दडलेलं असतं।

लहान दिसणाऱ्या मुंगीमध्ये
बलाढ्य हत्तीला हरवण्याचे 
सामर्थ्य असते ।

असचं काहीस आपल्या आयुष्याचं असतं।
म्हणुन दिसणाऱ्या  प्रत्येक गोष्टीचं
सत्य ओळखायला शिका। 
 Bkomal

©komal borkar

सत्य###

6 Love

कितीतरी संकटांना सामोरे जाऊन कधीही न डगमगता त्या परिस्थितीवर मात करणारी माझी माय। घरात नाही पैसा पोर घरात उपाशी पण कधी मांडली नाही आपली व्यथा जगासमोर। कधी हाताला चटके तर कधी मनाला हुंदके पण कधी केला नाही तीने वेदनेचा कहर अशी माझी माय। ©komal borkar

 कितीतरी संकटांना सामोरे जाऊन 
कधीही न डगमगता 
त्या परिस्थितीवर मात 
करणारी माझी माय।

 घरात नाही पैसा 
पोर घरात उपाशी
 पण कधी मांडली नाही
 आपली व्यथा जगासमोर।

कधी हाताला चटके तर
 कधी मनाला हुंदके
 पण कधी केला नाही 
तीने वेदनेचा कहर 
अशी माझी माय।

©komal borkar

कितीतरी संकटांना सामोरे जाऊन कधीही न डगमगता त्या परिस्थितीवर मात करणारी माझी माय। घरात नाही पैसा पोर घरात उपाशी पण कधी मांडली नाही आपली व्यथा जगासमोर। कधी हाताला चटके तर कधी मनाला हुंदके पण कधी केला नाही तीने वेदनेचा कहर अशी माझी माय। ©komal borkar

2 Love

Trending Topic