शब्दवेडा किशोर

शब्दवेडा किशोर

Am actor,singer,writer,editing asistant and director

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

#व्रण कितीही सोंगे धरली जरी वण त्या वेदना विसरत नाही तो काळ..ती वेळ..ती माणसं.. कधीही व्रण ते चेहरे विसरत नाही.. साधु संताचा आव आणला जरी भक्तिमार्गही व्रणाच्या खुणा जपतो परमार्थातात तल्लीन झाला तरी ह्दयात तो व्रण मात्र अडकूनच राहतो मनाच्या जखमा अन् त्यावरच्या खपल्यांचे व्रण काळजात कायम अडकून राहतील जरी ती माणसही उरली नाही तरी त्यांनी दिलेले हर क्षणांचे व्रण ते ओझं ओढायला लावतील @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर

#जीवनअनुभव #व्रण  #व्रण  
कितीही सोंगे धरली जरी 
वण त्या वेदना विसरत नाही 
तो काळ..ती वेळ..ती माणसं..
कधीही व्रण ते चेहरे विसरत नाही..
साधु संताचा आव आणला जरी
भक्तिमार्गही व्रणाच्या खुणा जपतो
परमार्थातात तल्लीन झाला तरी
ह्दयात तो व्रण मात्र अडकूनच राहतो
मनाच्या जखमा अन् त्यावरच्या खपल्यांचे व्रण 
काळजात कायम अडकून राहतील
जरी ती माणसही उरली नाही
तरी त्यांनी दिलेले हर क्षणांचे व्रण 
ते ओझं ओढायला लावतील
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर

#आकाशी चंद्र चांदण्या.... स्वप्नं रोज जळतात फक्त काजळासाठी धुसर होतो प्रकाश दिवस उजाडल्यावरही अंधुक नजरेतून सावरताना शोधतो मी इथे प्रकाशाचे टीमटीमनारे दिवे जरी सुर्य माझ्याच अंतर्मनात दडलेला आहे खुप चालतो मी धडपडतो निर्जीव शरीरालाही सदा सावरतो जरी वरदान अमरत्वाचे आत्म्याला मरणाला मात्र मी घाबरतो आहे काळोख प्रकाशाचा खेळ हा निरंतर चाले इथं रोज अन् पापणीची होते माझ्या फक्त उघडझाप उगाच डोळे मी ताठारतो आहे असणे नसणे उगाच फसणे भास आभास केवळ श्वास तथ्य मिथ्य एकच सत्य जीवनाचा अर्थ मीच विसरलो आहे @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर

#आकाशी_चंद्र_चांदण्या #मराठीविचार #आकाशी  #आकाशी चंद्र चांदण्या....
स्वप्नं रोज जळतात फक्त काजळासाठी 
धुसर होतो प्रकाश दिवस उजाडल्यावरही
अंधुक नजरेतून सावरताना शोधतो मी इथे 
प्रकाशाचे टीमटीमनारे दिवे 
जरी सुर्य माझ्याच अंतर्मनात दडलेला आहे
खुप चालतो मी धडपडतो निर्जीव शरीरालाही सदा सावरतो 
जरी वरदान अमरत्वाचे आत्म्याला
मरणाला मात्र मी घाबरतो आहे
काळोख प्रकाशाचा खेळ हा निरंतर चाले इथं रोज अन्
पापणीची होते माझ्या फक्त उघडझाप
उगाच डोळे मी ताठारतो आहे
असणे नसणे उगाच फसणे भास आभास केवळ श्वास
तथ्य मिथ्य एकच सत्य जीवनाचा अर्थ
मीच विसरलो आहे
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर

#पत्रास कारण की.... देवा लिहीतो तुजला मी पत्र.... पत्रास कारण की, तुझ्या अस्तित्वाच्या खुणा म्हणे दिसतात चराचरी तरी का आढळती मग या जगी दिन दुबळे गरिब लाचार अन् भिखारी कुठे घडतात तारुण्यात चुका अन चोऱ्या तर कुठे घडती पापं सारी कुणाचे भोग भोगत बाल्य फिरते दारोदारी कुणी जन्मते सुंदर स्वरूप कुणी जन्मानेच असे व्यंग कुरूप कुणाच्या अंगी असे नानाविध कलांचा संगम कुणी मानतो व्यसनांनाच अपुला धर्म कुणा मिळते वारसाहक्कात सोनं चांदी अन् सात पिढ्याची संपत्ती कुणाचा पूर्ण जन्म जाई चुकवण्यात देवा मागल्या जन्माची उधारी कळे ना मज तुझी लीला ही न्यारी अशी कशी असते रे देवा तुझी ही अजब दुनियादारी.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर

#पत्रास_कारण_की_बोलायची_हिंमत_नाही #जीवनअनुभव #पत्रास  #पत्रास कारण की....
देवा लिहीतो तुजला मी पत्र....
पत्रास कारण की,
तुझ्या अस्तित्वाच्या खुणा म्हणे दिसतात चराचरी
तरी का आढळती मग या जगी दिन दुबळे
गरिब लाचार अन् भिखारी
कुठे घडतात तारुण्यात चुका अन चोऱ्या
तर कुठे घडती पापं सारी
कुणाचे भोग भोगत बाल्य फिरते दारोदारी
कुणी जन्मते सुंदर स्वरूप कुणी जन्मानेच असे व्यंग कुरूप
कुणाच्या अंगी असे नानाविध कलांचा संगम 
कुणी मानतो व्यसनांनाच अपुला धर्म
कुणा मिळते वारसाहक्कात
सोनं चांदी अन् सात पिढ्याची संपत्ती
कुणाचा पूर्ण जन्म जाई चुकवण्यात देवा
मागल्या जन्माची उधारी
कळे ना मज तुझी लीला ही न्यारी
अशी कशी असते रे देवा तुझी
ही अजब दुनियादारी....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर

#प्रित तुझी माझी.. प्रित तुझी माझी सख्या फुलापरी फुलावी प्रितित तुझ्या मी दुनिया सारी भुलावी अनमोल प्रित तुझी मनास माझ्या भाळली कळले ना मज कशी कधी ही अतुट बंधसरीता जुळली मनी भास सदा तुझा डोळ्यात माझिया तुझेच रुप साठले कोणता अल्लड अवखळ हा किनारा वादळ हे कोणते माझ्या मनी उठले घे सावरून मजला सख्या तु माझा तोल जाण्याआधी नको वादळात ह्या सोडु मज एकटीला कधी विश्वासाने मी तुझ्यात माझ्या जीवाचं सप्तरंगी इंद्रधनू ओतलं सात जन्मासाठी मी माझं पाऊल तुझिया साथीनं बोहल्यावर टाकलं.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर

#जीवनअनुभव #प्रेम_हे #प्रित  #प्रित तुझी माझी..
प्रित तुझी माझी सख्या फुलापरी फुलावी
प्रितित तुझ्या मी दुनिया सारी भुलावी 
अनमोल प्रित तुझी मनास माझ्या भाळली
कळले ना मज कशी कधी ही अतुट बंधसरीता जुळली 
मनी भास सदा तुझा डोळ्यात माझिया तुझेच रुप साठले
कोणता अल्लड अवखळ हा किनारा
वादळ हे कोणते माझ्या मनी उठले 
घे सावरून मजला सख्या तु माझा तोल जाण्याआधी
नको वादळात ह्या सोडु मज एकटीला कधी 
विश्वासाने मी तुझ्यात माझ्या
जीवाचं सप्तरंगी इंद्रधनू ओतलं
सात जन्मासाठी मी माझं पाऊल
तुझिया साथीनं बोहल्यावर टाकलं....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर

#फिरुनी नवा जन्मेन मी.... - शब्दवेडा किशोर *कवितेचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.* कोवळी ती माझ्या आयुष्य अस्ताची झुळुक मज अनाहूतपणे बिलगुन गेली होती मावळतीचा तो सुगंध वा-याचा होता मजभोवती तयाचे ती झुळूक बोट धरून निघून गेली होती नशीबाने होते छाटलेले तेव्हा ते पंख माझे सोनेरी गळून गेले होते अन् रूतलेल्या काट्यांनी मग आपसुक मला अखंडीत जपले होते काटेरी रस्त्यावरची माझी ही आयुष्यप्रवासाची यात्रा झाली होती तिथेही माझ्या मातीनं जन्मभर माझी सोबत केली होती अनाहूतपणे मग अचानक एक सचिन कोरडे नावाचं सुवर्णफुल उमललं अन् शब्दलेखणी नावाच्या सुंदर सुवर्णकळीमध्ये मज पामरास आसरा मिळाला शब्दलेखणी नावाची सुवर्णकळी आजही माझ्या सुवर्णासम त्या आयुष्यपाकळ्यांना जपते आहे अन् रोज नव्याने जगाला ते ओरडून सांगते आहे पुन्हा तू नव्यानं उमलणार अन् धरेचं ते सौंदर्य अखंडपणे जपणार हेच मला सांगत आहे तिच्या साक्षगंधाने सांगतो मी तुम्हाला की घेऊनी श्वास पुन्हा नव्याने आयुष्याचे सप्तसुर छेडीन मी अस्त जरी माझा झाला तरीही पुन्हा अंकुर होऊनी फिरुनी नवा जन्मेन मी.. फिरुनी नवा जन्मेन मी.. ©शब्दवेडा किशोर

#जीवनअनुभव #शब्दलेखणी #फिरुनी  #फिरुनी नवा जन्मेन मी....
   - शब्दवेडा किशोर
*कवितेचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.*
कोवळी ती माझ्या आयुष्य अस्ताची झुळुक
मज अनाहूतपणे बिलगुन गेली होती
मावळतीचा तो सुगंध वा-याचा होता मजभोवती
तयाचे ती झुळूक बोट धरून निघून गेली होती
नशीबाने होते छाटलेले तेव्हा ते पंख माझे सोनेरी गळून गेले होते
अन् रूतलेल्या काट्यांनी मग आपसुक मला अखंडीत जपले होते
काटेरी रस्त्यावरची माझी ही आयुष्यप्रवासाची यात्रा झाली होती
तिथेही माझ्या मातीनं जन्मभर माझी सोबत केली होती
अनाहूतपणे मग अचानक एक सचिन कोरडे नावाचं
सुवर्णफुल उमललं अन् शब्दलेखणी नावाच्या सुंदर
सुवर्णकळीमध्ये मज पामरास आसरा मिळाला
शब्दलेखणी नावाची सुवर्णकळी आजही माझ्या
सुवर्णासम त्या आयुष्यपाकळ्यांना जपते आहे
अन् रोज नव्याने जगाला ते ओरडून सांगते आहे
पुन्हा तू नव्यानं उमलणार अन् धरेचं ते सौंदर्य
अखंडपणे जपणार हेच मला सांगत आहे
तिच्या साक्षगंधाने सांगतो मी तुम्हाला की
घेऊनी श्वास पुन्हा नव्याने आयुष्याचे सप्तसुर छेडीन मी
अस्त जरी माझा झाला तरीही पुन्हा अंकुर होऊनी
फिरुनी नवा जन्मेन मी..
फिरुनी नवा जन्मेन मी..

©शब्दवेडा किशोर

#देह नश्वर आत्मा तोचि असे अंशईश्वर.... कुणी आधी कुणी नंतर देवाकडून जन्म घेऊनी पुन्हा निजधामाला जातसे परी एक तो आत्मा अमर जन्म न घेतो नाश न होतो एकच आत्मा असे चराचर मनात माझ्या असेल अत्तर गंध पखरतो तोच निरंतर म्हणून हसतो मला पाहुनी अनोळखी असे कुणी पत्थर स्पर्शाचे हो कसे आकलन कुठून येती शब्दांचे ते अमाप घन जीवास चेतना कशी मिळे ती जरा करावे याचे सम सकलांनी चिंतन ओठावरचे हसू ते लाघवी क्षीण वेदना ती करी मानवी कशी समजते अलगद उरी सलणारी वेदना दुजा कुणाची बात सहज जाणवी अपुल्या मना आत्म्याचे ते आत्म्याशी अतुट असे विलक्षण बंधन कुणा न कळले कोण चिरंतन परमात्मा जो देही वसतो सहज सोडतो तो हे देही बंधन मुक्ती मिळते मग ती देहाला भोग वेदना त्या साऱ्या असे आत्म्याला हा देह सोडुनी जाई आत्मा दुसऱ्या देही पुन्हा जगणे असे नित्य निरंतर ते आत्म्याला परमात्म्याशी तदाकार जर झाला आत्मा नसे मग तयास अंतर तरी कदाचित मिळेल मुक्ती आत्मा परमात्मा मिटेल मग अंतर @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर

#काया_विठ्ठल_आत्मा_पांडूरंग #जीवनअनुभव #देह  #देह नश्वर आत्मा तोचि असे अंशईश्वर....
कुणी आधी कुणी नंतर देवाकडून जन्म घेऊनी पुन्हा
निजधामाला जातसे परी एक तो आत्मा अमर
जन्म न घेतो नाश न होतो एकच आत्मा असे चराचर
मनात माझ्या असेल अत्तर गंध पखरतो तोच निरंतर
म्हणून हसतो मला पाहुनी अनोळखी असे कुणी पत्थर
स्पर्शाचे हो कसे आकलन कुठून येती शब्दांचे ते अमाप घन
जीवास चेतना कशी मिळे ती जरा करावे याचे
सम सकलांनी चिंतन
ओठावरचे हसू ते लाघवी क्षीण वेदना ती करी मानवी
कशी समजते अलगद उरी सलणारी वेदना
दुजा कुणाची बात सहज जाणवी अपुल्या मना
आत्म्याचे ते आत्म्याशी अतुट असे विलक्षण बंधन
कुणा न कळले कोण चिरंतन परमात्मा जो देही वसतो
सहज सोडतो तो हे देही बंधन मुक्ती मिळते मग ती देहाला
भोग वेदना त्या साऱ्या असे आत्म्याला
हा देह सोडुनी जाई आत्मा दुसऱ्या देही पुन्हा जगणे असे
नित्य निरंतर ते आत्म्याला
परमात्म्याशी तदाकार जर झाला आत्मा नसे मग तयास अंतर
तरी कदाचित मिळेल मुक्ती आत्मा परमात्मा मिटेल मग अंतर
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर
Trending Topic