Mohan Somalkar

Mohan Somalkar

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार #कविता
#मराठीशायरी #lonely_quotes  White रणरागिनी जिवलगच्या 

रणरागिनी वाघिणी
रणरागिनी वाघिणी
प्रतिभाशाली तयांची 
आहे हो किती लेखणी 

जिवलगाची शान
करावा तयांचा मान
प्रतिभावंतांची खाण
पराक्रमी लेखणी छान 

नागपुरची उर्मिला परुळकर 
इतिहास लेखणीतुन घडविला
लेखणीतुन प्रतिलिपीवर लिहिते
लेखणीचा प्रतिलिपीला साठा दिला

मुंबईची मुंबई क्विन 
कृष्णसखी अनघा!
लेखणीतुन व्यक्त होते ती
 लेखणीचा तिचा इतिहास बघा!

पुणे मराठी भाषेची जननी 
स्वाती पाटील लेखिका तिथे गुणी
कथांतून ग्रामीण वसा जपते
वाचक तिच्या कथा वाचून जाई आनंदुनी! 

गडचिरोली आमच्या विदर्भाची शान
तिथून येते सौ. वंदना सोरतेची कथा छान 
स्त्री चरित्रावर ती लिहिते
लेखणीतुन रणरागिनी समान व्यक्त होते.

नाशिकला श्रीरामाचे चरण टेकले
सप्तशृंगी माता तिथे अवतरली 
नाशिक मधुन एक जिवलग
आमची सोनाली वडनेरे ताई आली

लातूरचा झेंडा अटकेपार 
लेखणीतुन पवित्रा नागरगोजे आणते बहार!
जिवलग आहे लेखणीतुन लिहिते
प्रतिलिपीवर कथेतुन दिसते बहार!

या सहाही जिवलग रणरागिनी
लेखणी आहे यांची बहुगुणी 
वाचन करा कथा ह्यांच्या
वेळ गेला नाही अजुनी! 

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar

#lonely_quotes प्रेम

135 View

#मराठीप्रेम  शैलेशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

जीवन जगता जगता
धावपळीतून वेळ काढावे
जीवनाच्या शर्यतीत 
रोजच का धावत रहावे.!

म्हणूनच प्रत्येक क्षण 
तु धुंद होऊन जगत असतो!
जीवनात किती छंद 
तु जोपासत बसतो..!

दुर अंतरी मित्रांपासून राहुन 
मैत्रीचा धागा तु घट्ट ठेवला!
प्रत्येक मित्राला हृदयी ठेऊन 
ऋणानुबंध मैत्रीचा सदैव जपला!

सारे मित्र करतो तुला सलाम 
जरी आहे तु आमच्यापासून लांब!
आरोग्य सदा सुदृढ राहो
आम्हासाठी तु पृथ्वीवर शंभर वर्ष थांब!

प्रिय मित्र शैलेश तुला इंदिरा गांधी
हायस्कूल 1990 बॅच करुन शुभेच्छा

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar

#-कविता

108 View

#मराठीविचार  शैलेशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

जीवन जगता जगता
धावपळीतून वेळ काढावे
जीवनाच्या शर्यतीत 
रोजच का धावत रहावे.!

म्हणूनच प्रत्येक क्षण 
तु धुंद होऊन जगत असतो!
जीवनात किती छंद 
तु जोपासत बसतो..!

दुर अंतरी मित्रांपासून राहुन 
मैत्रीचा धागा तु घट्ट ठेवला!
प्रत्येक मित्राला हृदयी ठेऊन 
ऋणानुबंध मैत्रीचा सदैव जपला!

सारे मित्र करतो तुला सलाम 
जरी आहे तु आमच्यापासून लांब!
आरोग्य सदा सुदृढ राहो
आम्हासाठी तु पृथ्वीवर शंभर वर्ष थांब!

प्रिय मित्र शैलेश तुला इंदिरा गांधी
हायस्कूल 1990 बॅच करुन शुभेच्छा

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar

#-कविता

99 View

#मराठीकविता  स्वातीताई 

नाते ऋणानुबंधाचे
मला हे लेखणीमुळे 
धागे सदा जिव्हाळ्याचे
नित्य जीवनात कळे!

जुळवून घेता मन
एक एक साहित्यिक 
इथे भेटला रुळला
आले लेखणीचे पिक!

अशी एक ताई मला
साहित्यातुन भेटली!
कथाकाव्यातुन ती
सदा इथे प्रकटली!

भरपूर केले लिखाण 
वाचकसंख्या तिची वाढली!
नव नव्या कथा लिहून 
जीवनगाथा तिने लिहली!

अशा ताईचा आज वाढदिवस 
आहे वर्षांचा खास दिवस 
जीवनात तिला सदा 
भेटावे नेहमीच सुयश..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar

स्वातीताई नाते ऋणानुबंधाचे मला हे लेखणीमुळे धागे सदा जिव्हाळ्याचे नित्य जीवनात कळे! जुळवून घेता मन एक एक साहित्यिक इथे भेटला रुळला आले लेखणीचे पिक! अशी एक ताई मला साहित्यातुन भेटली! कथाकाव्यातुन ती सदा इथे प्रकटली! भरपूर केले लिखाण वाचकसंख्या तिची वाढली! नव नव्या कथा लिहून जीवनगाथा तिने लिहली! अशा ताईचा आज वाढदिवस आहे वर्षांचा खास दिवस जीवनात तिला सदा भेटावे नेहमीच सुयश..! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar

126 View

#मराठीकविता  जीभेचे चोचले नाही पुरायचे

जीभेचे चोचले आता कसे जमायचे
अचकल बचकल खातांनी पोटाकडेही बघायचे
पाणीपुरी,भेलपुरी,बर्गर, पिझ्झा, मंच्युरियन
आता खाणे नाही हो जमायचे.!

जिभेचे असतेच नेहमी तोंडाकडे गाऱ्हाणे 
चटपटीत नाही खायला भेटत म्हणुन ओरडायचे
जिभेच्या तालावर नाही कधीच नाचायचे
कधी बिचार्या पोटाचे तर ऐकायचे.!

लागला आता उन्हाळा उन्हाने जीवाने घाबरायचे
नकोच आता तळलेले ते पदार्थ दुर त्याला सारायचे
राब राब राबुन शरिराचे तापमान समतोल राखायचे
ताक,आंब्याचे पन्हं,  ऊसाच्या रसाने दाह शांत ठेवायचे

जिभेचे चोचले जर पुरविले तर
पोटाने कधीना कधी हडताल करायचे..!
म्हणून आता जिभेचे या कानाने ऐकुन 
त्या कानाने हवेत सोडुन द्यायचे...!

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar

जीभेचे चोचले नाही पुरायचे जीभेचे चोचले आता कसे जमायचे अचकल बचकल खातांनी पोटाकडेही बघायचे पाणीपुरी,भेलपुरी,बर्गर, पिझ्झा, मंच्युरियन आता खाणे नाही हो जमायचे.! जिभेचे असतेच नेहमी तोंडाकडे गाऱ्हाणे चटपटीत नाही खायला भेटत म्हणुन ओरडायचे जिभेच्या तालावर नाही कधीच नाचायचे कधी बिचार्या पोटाचे तर ऐकायचे.! लागला आता उन्हाळा उन्हाने जीवाने घाबरायचे नकोच आता तळलेले ते पदार्थ दुर त्याला सारायचे राब राब राबुन शरिराचे तापमान समतोल राखायचे ताक,आंब्याचे पन्हं, ऊसाच्या रसाने दाह शांत ठेवायचे जिभेचे चोचले जर पुरविले तर पोटाने कधीना कधी हडताल करायचे..! म्हणून आता जिभेचे या कानाने ऐकुन त्या कानाने हवेत सोडुन द्यायचे...! मोहन सोमलकर नागपूर ©Mohan Somalkar

144 View

Trending Topic