nitin bille

nitin bille

  • Latest
  • Popular
  • Video

पाऊस पडून गेला की माझं असं होतं.... पावसासोबत तुझ्या आठवणीही मनात दाटून येतात दाटून आलेल्या आठवणीने मग मन माझं कासावीस होतं. बरसून गेल्यावर आभाळ तर मोकळ होतं.... पण.... दाटलेल्या आठवणींनी मात्र डोळ्यांच बरसनं सुरू होतं.....😢 नितीन......✍🏻

#पाऊस  पाऊस पडून गेला की माझं असं होतं....

पावसासोबत तुझ्या आठवणीही 
मनात दाटून येतात

दाटून आलेल्या आठवणीने मग 
मन माझं कासावीस होतं.

बरसून गेल्यावर आभाळ तर मोकळ होतं....
पण.... 
दाटलेल्या आठवणींनी मात्र 
डोळ्यांच बरसनं सुरू होतं.....😢
    
                  नितीन......✍🏻

#पाऊस आणि तुझी आठवण

10 Love

#मराठीकविता #एकदा #uskajaana

#एकदा येऊन बघून जा.... #uskajaana

128 View

एकदा येवून बघुन जा... माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच आता उजाड ओसाड माळरान झालय. उरली आहेत फक्त आठवणींची काटेरी झुडपं आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा. पण अजूनही गंध मनात बाकी आहे, तुझ्या आठवणींचा..... अन् ओलावा बाकी आहे तु शिंपडलेल्या प्रेमाचा..... याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात एक केवीलवाण आशेच रोपटं अजुनही जिवंत आहे, तु येशील कधीतरी आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी ही आस बाळगून. खरच ..... एकदा येवून बघून जा... अन् या दुभंगलेल्या मनात पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा.... नंदनवन फुलवून जा.... नितीन.......✍🏻

#मराठीकविता #एकदा  एकदा येवून बघुन जा...
माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच
आता उजाड ओसाड माळरान झालय.
उरली आहेत फक्त आठवणींची 
काटेरी झुडपं
आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा.
पण अजूनही गंध मनात बाकी आहे, 
तुझ्या आठवणींचा.....
अन् ओलावा बाकी आहे 
तु शिंपडलेल्या  प्रेमाचा.....
याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात 
एक केवीलवाण आशेच रोपटं 
अजुनही जिवंत आहे,
तु येशील कधीतरी 
आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी
ही आस बाळगून.
खरच .....
एकदा येवून बघून जा...
अन् या दुभंगलेल्या मनात 
पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा....
नंदनवन फुलवून जा....
                     नितीन.......✍🏻

#एकदा येऊन बघून जा....

10 Love

काल कपाट लावता लावता काही कागद हातास लागले आणि त्या कागदावरचे शब्द पुन्हा मनास लागले...                      पत्रातून जीव ओतणारे का इतके निष्ठुर वागलें तेच-तेच प्रश्न पुन्हा मनास पडू लागले प्रेम, जिव्हाळा, मैत्री वर नाते होते तरले मग खूप कमी दिवसात तिचे मन कसे भरले, तिच्याशिवाय आता अर्धे आयुष्य सरले तरीही वाटते आयुष्यात काहीतरी बाकी उरले... किती आणा किती भाका सगळे आठवते मागले पण त्या कागदावरचे शब्द आज पुन्हा मनास लागले.... काल कपाट लावता लावता काही कागद हातास लागले आणि त्या कागदावरचे शब्द पुन्हा मनास लागले...                                ...... शब्दछल

#मराठीकविता #BooksBestFriends  काल कपाट लावता लावता 
काही कागद हातास लागले 
आणि त्या कागदावरचे शब्द 
                पुन्हा मनास लागले...                      पत्रातून जीव ओतणारे 
का इतके निष्ठुर वागलें 
तेच-तेच प्रश्न पुन्हा मनास पडू लागले
प्रेम, जिव्हाळा, मैत्री वर नाते होते तरले
मग खूप कमी दिवसात तिचे मन कसे भरले,
तिच्याशिवाय आता अर्धे आयुष्य सरले
तरीही वाटते आयुष्यात
काहीतरी बाकी उरले...
किती आणा किती भाका 
सगळे आठवते मागले
पण त्या कागदावरचे शब्द 
आज पुन्हा मनास लागले....
काल कपाट लावता लावता 
काही कागद हातास लागले 
आणि त्या कागदावरचे शब्द 
पुन्हा मनास लागले...
                               ...... शब्दछल

आपण भेटलो त्या दिवशी (तसं योगायोगानेच) तेव्हाच मी जाणलं होतं. उरलं नाही काहीच आता, तुझ्या नजरेनेच सारं काही सांगितलं होतं. माझ्यावरचं तुझं प्रेम (जीवापाड जपलेलं) आता आटलं होतं. तू निघून गेलीस पुढे कसे आहात विचारून, तुला पाठमोरी पाहताना माझ्या डोळ्यात मात्र पाणी दाटलं होतं.😢 नितीन.....✍️

#मराठीकविता #Sandland  आपण भेटलो त्या दिवशी 
(तसं योगायोगानेच)
तेव्हाच मी जाणलं होतं.
उरलं नाही काहीच आता,
तुझ्या नजरेनेच सारं काही सांगितलं होतं.
माझ्यावरचं तुझं प्रेम (जीवापाड जपलेलं)
आता आटलं होतं. 
तू निघून गेलीस पुढे 
कसे आहात विचारून,
तुला पाठमोरी पाहताना 
माझ्या डोळ्यात मात्र पाणी दाटलं होतं.😢
                    नितीन.....✍️

दुरावा.... #Sandland

3 Love

'निरोप आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...'

 'निरोप  आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...'

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

2 Love

Trending Topic