Purva Deshmukh

Purva Deshmukh

  • Latest
  • Popular
  • Video

White "निसर्ग नियम" वादळाच्या वाऱ्यात नाहीसा होणारा पसारा अन्  वादामुळे निर्माण होणाऱ्या शंका यांचा मेळ जणू सारखाच. ...... निसर्गावर विश्वास ठेऊन डोलारा उभा होतो, पण मानवी चुकांमुळे भूकंपाच्या धक्यात तो जमीनदोस्त होतो. ...... माणसावर जिवापार प्रेम अन् विश्वास ठेऊन  तो ऐकवेल तो शब्द खरा मानतो, पण तोच विश्वास आपल्या विरोधात वापरून विश्वासाची हत्या होते तेव्हा जीव कोलमडतो. ........ विश्वासाच्या व्ह्याखेचा अन् आपलेपणाचा मेळ ह्या जन्मात तरी लागेल का..... की विश्वासू माणसाकडून दुखवण्याचि भावना  कायम जाणवत राहील कोण जाणे.... - पूर्वा देशमुख. ©Purva Deshmukh

 White "निसर्ग नियम"


वादळाच्या वाऱ्यात नाहीसा होणारा पसारा
अन् 
वादामुळे निर्माण होणाऱ्या शंका
यांचा मेळ जणू सारखाच.
......
निसर्गावर विश्वास ठेऊन डोलारा उभा होतो,
पण
मानवी चुकांमुळे भूकंपाच्या धक्यात तो जमीनदोस्त होतो.
......
माणसावर जिवापार प्रेम अन् विश्वास ठेऊन 
तो ऐकवेल तो शब्द खरा मानतो,
पण
तोच विश्वास आपल्या विरोधात वापरून
विश्वासाची हत्या होते तेव्हा जीव कोलमडतो.
........
विश्वासाच्या व्ह्याखेचा अन् आपलेपणाचा मेळ
ह्या जन्मात तरी लागेल का.....
की
विश्वासू माणसाकडून दुखवण्याचि भावना 
कायम जाणवत राहील कोण जाणे....
 
- पूर्वा देशमुख.

©Purva Deshmukh

reality

7 Love

#JodhaAkbar  प्रेमाचा हक्कदार एकच असावा
मनातल्या यातना सर्व त्याला कळाव्या.
आईची ऊब अन् बापाचा कळवा
त्याला मनातून भासावा.
कळत्या वयापासून साठून ठेवलेल्या
प्रेमाचा खजिना त्याला एकट्याला मिळावा.
अनामिक भिती,संकट, अगणित पिडांना
सोसण्याची ताकद त्याच्या सहवासात असावी.
ह्या स्त्री रुपी कोढयाचा एकच जिवलग
जोडीदार उत्तर म्हणून मिळावा.
अगणित आशा - निराशा तिजोरीगत
ठेवणाऱ्या मनाला योग्य चाविरुपी मितवा मिळावा.
अगणित प्रेम - राग - प्रेम ह्या साखळीचा
हक्कदार खरा मिळावा.

©Purva Deshmukh

#JodhaAkbar

27 View

"ती हुरहूर" "मनाची हुरहूर काहूर करू लागली चिंता अन् गोंधळात हरवून ती गेली" "कोणास ठाऊक कसली वाट बघू लागली"... : "शांत मनी गुणगुण तिची वाढली शब्दांच्या आवाजात मात्र गोंधळून ती गेली" "कोणास ठाऊक कष्याच्या आवाजाची वाट बघू लागली"... : "बंधनात अडकुन सवयीची झाली तरीही जबाबदारी तीला हविशीच वाटू लागली" "कोणास ठाऊक कोणत्या सुवर्ण क्षणासाठी आतुरली"... : "कौतुक ह्याचे की मन तिचे समाधानी मनाच्या कोपऱ्यात चिंता तिला भविष्याची" "कोणास ठाऊक कोणत्या नियोजनात हरवली"... : "नवख्या गोष्टीसाठी कायम अतुरलेली नवघराच्या नवणात्यांसाठी धडपड तिची वाढू लागली" "कोणास ठाऊक कोणाच्या मनाला ती समजून आली"... - पूर्वा. ©Purva Deshmukh

#sadquotes  "ती हुरहूर"


"मनाची हुरहूर काहूर करू लागली
चिंता अन् गोंधळात हरवून ती गेली"
"कोणास ठाऊक कसली वाट बघू लागली"...
:
"शांत मनी गुणगुण तिची वाढली
शब्दांच्या आवाजात मात्र गोंधळून ती गेली"
"कोणास ठाऊक कष्याच्या आवाजाची वाट बघू लागली"...
:
"बंधनात अडकुन सवयीची झाली
तरीही जबाबदारी तीला हविशीच वाटू लागली"
"कोणास ठाऊक कोणत्या सुवर्ण क्षणासाठी आतुरली"...
:
"कौतुक ह्याचे की मन तिचे समाधानी
मनाच्या कोपऱ्यात चिंता तिला भविष्याची"
"कोणास ठाऊक कोणत्या नियोजनात हरवली"...
:
"नवख्या गोष्टीसाठी कायम अतुरलेली
नवघराच्या नवणात्यांसाठी धडपड तिची वाढू लागली"
"कोणास ठाऊक कोणाच्या मनाला ती समजून आली"...



                                          - पूर्वा.

©Purva Deshmukh

#sadquotes हुरहूर

7 Love

"मुखवटा - माणसाचा...." चाहूल लागे सुखद क्षणांची ; मनी भासते प्रत्येक आशा सुखाची, गोंधळे जिव आशा-निराशे पायी ; प्रत्येक निराशा जणू नव आशा घेऊन येई. कधी मनी वाटे ही वाट समाधानाची ; कधी तीच वाट जणू बनते काट्यांची. जीवनाची कथा समज- गैरसमजांची ; त्यात पात्र मात्र मिरते खोट्या मुखवट्यांनी . विश्वास हा शब्द अनमोल भावनांचा ; जो टिकवी तो राजा ह्या जगाचा. विश्वासघात ही दुसरी बाजू एका नान्याची; जो दाखवी तो भीकारी राजवाड्याचा. मानसा गनीक स्वभाव निराळे ; खऱ्या - खोट्याचे ते खेळ सारे . चांगुलपनांची मोजकी ती मने , पैश्या- प्रतिष्टे पायी पायंदळी ते तुडले. काळ सरता माणूस बदलास गेला ; मानसा पेक्षा पैशात जिव गुंतला . क्षणीक सुखापोटी मोहमायेस शरण गेला , दृष्टी असूनही मनूष्य आंधळेपणाचा सोंगी झाला. - पूर्वा देशमुख (17/12/22) ©Purva Deshmukh

#Time  "मुखवटा - माणसाचा...."

चाहूल लागे सुखद क्षणांची ;
मनी भासते प्रत्येक आशा सुखाची,
गोंधळे जिव आशा-निराशे पायी ;
प्रत्येक निराशा जणू नव आशा घेऊन येई.


कधी मनी वाटे ही वाट समाधानाची ;
कधी तीच वाट जणू बनते काट्यांची.
जीवनाची कथा समज- गैरसमजांची ;
त्यात पात्र मात्र मिरते खोट्या मुखवट्यांनी .

विश्वास हा शब्द अनमोल भावनांचा ;
जो टिकवी तो राजा ह्या जगाचा.
विश्वासघात ही दुसरी बाजू एका नान्याची;
जो दाखवी तो भीकारी राजवाड्याचा.

मानसा गनीक स्वभाव निराळे ;
खऱ्या - खोट्याचे ते खेळ सारे .
चांगुलपनांची मोजकी ती मने ,
पैश्या- प्रतिष्टे पायी पायंदळी ते तुडले.

काळ सरता माणूस बदलास गेला ;
मानसा पेक्षा पैशात जिव गुंतला .
क्षणीक सुखापोटी मोहमायेस शरण गेला ,
दृष्टी असूनही मनूष्य आंधळेपणाचा सोंगी झाला.


                               - पूर्वा देशमुख
                                   (17/12/22)

©Purva Deshmukh

#Time

4 Love

Trending Topic