शब्दवेडा किशोर

शब्दवेडा किशोर

  • Latest
  • Popular
  • Video

#अंतरीची खुण शब्दवेडा किशोर अंतरीची खुण अंतरीची जाण अंतरीचा घाव अंतरास ठावं ऐलतीर नौका पैलतीर गावं भवसागर पार एकचि सार अंतरी देवासी भजा सांज सकाळ मग आपसूक होईल चित्त सुगम-शांत अन् होईल सफल-सुफळ अंत ©शब्दवेडा किशोर

#मराठीविचार #अंतरीची #walkingalone  #अंतरीची खुण
शब्दवेडा किशोर 
अंतरीची खुण अंतरीची जाण
अंतरीचा घाव अंतरास ठावं
ऐलतीर नौका पैलतीर गावं
भवसागर पार एकचि सार
अंतरी देवासी भजा सांज सकाळ 
मग आपसूक होईल चित्त सुगम-शांत
अन् होईल सफल-सुफळ अंत

©शब्दवेडा किशोर

#walkingalone जीवन प्रवास

11 Love

White #वक्त... @शब्दभेदी किशोर वक्त से जालिम कोई बला नहीं हैं वक्त से बेहतर कोई सलाह नहीं हैं वक्त ही हैं मरहम और वक्त ही सिला हैं वक्त से रहबर कोई दुवाँ नहीं हैं वक्त हर जख्म को भर देता हैं वक्त से बेहतर कोई दवा ही नहीं हैं ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं...... किसीका अच्छा चलता हैं तो किसीको काटना पडता हैं किसीको बिन मांगे मिलता हैं तो किसीको मांगना पड़ता हैं किसीका बितता हैं तो किसीको बिताना पडता हैं ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं...... ©शब्दवेडा किशोर

#वक्त_और_जिन्दगी #मराठीविचार #वक्त  White #वक्त...
@शब्दभेदी किशोर 
वक्त से जालिम कोई बला नहीं हैं
वक्त से बेहतर कोई सलाह नहीं हैं
वक्त ही हैं मरहम और वक्त ही सिला हैं
वक्त से रहबर कोई दुवाँ नहीं हैं
वक्त हर जख्म को भर देता हैं
वक्त से बेहतर कोई दवा ही नहीं हैं
ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं......
किसीका अच्छा चलता हैं तो
किसीको काटना पडता हैं
किसीको बिन मांगे मिलता हैं तो
किसीको मांगना पड़ता हैं
किसीका बितता हैं तो
किसीको बिताना पडता हैं
ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं......

©शब्दवेडा किशोर

#वक्त_और_जिन्दगी माझ्या लेखणीतून

7 Love

White #विघ्नहर्ता श्रीगणेश शब्दवेडा किशोर गणरायाची ओढ किती गोड गोड त्याच्या प्रीतीला नसे कसलीच तोड जोडूनिया कर फुले मन तोच भासे दाता सखा बंधू गुरु तोची मातापिता त्याच्यापुढं विसरतो मी जगाचा सर्व दुःख काळ तोचि क्षणात नाहीसा करतो माझ्या आयुष्यातील दुःखरुपी जाळ गजानना गणराया असा चाले गजर नामाचा हारे चिंता व्यथा क्षणार्धात अन् पावन होई मग जन्म हा आमचा सोडव आमचा अहंकार वाचव तु आमचा संसार दे नवं बळ आम्हा जगण्या आहेस तूच आमचा आत्मा अन् आधार तू डोळे मिटून क्षेम दे आम्हास गणराया आनंद वाटे सदा आम्हा तुझा महिमा गाया ©शब्दवेडा किशोर

#माझ्या_लेखणीतून #विघ्नहर्ता #मराठीविचार  White #विघ्नहर्ता श्रीगणेश
शब्दवेडा किशोर 
गणरायाची ओढ किती गोड गोड
त्याच्या प्रीतीला नसे कसलीच तोड 
जोडूनिया कर फुले मन तोच भासे दाता
सखा बंधू गुरु तोची मातापिता
त्याच्यापुढं विसरतो मी जगाचा सर्व दुःख काळ
तोचि क्षणात नाहीसा करतो
माझ्या आयुष्यातील दुःखरुपी जाळ 
गजानना गणराया असा चाले गजर नामाचा
हारे चिंता व्यथा क्षणार्धात अन्
पावन होई मग जन्म हा आमचा 
सोडव आमचा अहंकार
वाचव तु आमचा संसार
दे नवं बळ आम्हा जगण्या
आहेस तूच आमचा आत्मा अन् आधार 
तू डोळे मिटून क्षेम दे आम्हास गणराया
आनंद वाटे सदा आम्हा तुझा महिमा गाया

©शब्दवेडा किशोर

White वाटलं लिहावं काहीतरी किती दिवस झाले मन भरून आलं असे कितीतरी पावसाळे येऊनिया गेले भरून आलं मन तरी ते पावसाबरोबर वाहिलं नाही असे म्हटलं तरी चालेल कारण पाऊस सोडून त्याला कुणीच पाहिलं नाही तो पडतो जेव्हा धोधो तेव्हा काळजाचा ठाव घेतोच आठवणीतलं अन् मनातलं तो आपल्याबरोबर नेतोच रिमझिम टपटप धोधो आणि सरसर कितीतरी रूपं त्याची सारी तशी सुंदर मला मात्र भावतं त्याचं धोधो पडणं हातचं काहीच न राखता थेट सर्वांच्या काळजाला जाऊन भिडणं त्याच्या येण्याबरोबर जाग्या होतात जुन्या साऱ्या स्मृती आठवतात काही जोडलेली तर काही पुसट होत गेलेली नाती कधी आठवतो वाफाळलेला चहा तर कधी आठवतं सोबत असलेलं ते कवितेचं पुस्तक तर कधी आठवतं ते नुसतं बसून त्याला न्याहाळलेलं एकटक कधी आठवते गरम भजी वडा अन् मित्रांसोबत केलेली ती धमाल तर कधी आठवतं गाणं ऐकताना त्यावर सहज धरलेला ताल कधी आठवते उडालेली तारांबळ कधी जवळ नव्हती म्हणून छत्री तर आठवणीतली संध्याकाळ कुणासोबातची जवळ एकच होती जेव्हा छत्री कित्येक क्षण दिलेत त्याने भरभरून जगण्याचे रोजच्या व्यापातून स्वतःला थोडं वेगळं काढून बघण्याचे काही म्हणा तो आहेच वेगळा नाहीतर असतातच की हिवाळे अन् उन्हाळे पण अनुभव किती हे सांगायलाही म्हणतातंच ना मी पाहीलेत इतके पावसाळे ©शब्दवेडा किशोर

#याला_जीवन_ऐसे_नाव #मराठीविचार  White वाटलं लिहावं काहीतरी किती दिवस झाले
मन भरून आलं असे कितीतरी पावसाळे येऊनिया गेले
भरून आलं मन तरी ते पावसाबरोबर वाहिलं नाही
असे म्हटलं तरी चालेल कारण
पाऊस सोडून त्याला कुणीच पाहिलं नाही
तो पडतो जेव्हा धोधो तेव्हा काळजाचा ठाव घेतोच
आठवणीतलं अन् मनातलं तो आपल्याबरोबर नेतोच
रिमझिम टपटप धोधो आणि सरसर
कितीतरी रूपं त्याची सारी तशी सुंदर
मला मात्र भावतं त्याचं धोधो पडणं
हातचं काहीच न राखता थेट
सर्वांच्या काळजाला जाऊन भिडणं 
त्याच्या येण्याबरोबर जाग्या होतात जुन्या साऱ्या स्मृती
आठवतात काही जोडलेली तर काही पुसट होत गेलेली नाती
कधी आठवतो वाफाळलेला चहा तर
कधी आठवतं सोबत असलेलं ते कवितेचं पुस्तक
तर कधी आठवतं ते नुसतं बसून त्याला न्याहाळलेलं एकटक
कधी आठवते गरम भजी वडा अन् मित्रांसोबत केलेली ती धमाल
तर कधी आठवतं गाणं ऐकताना त्यावर सहज धरलेला ताल
कधी आठवते उडालेली तारांबळ कधी जवळ नव्हती म्हणून छत्री
तर आठवणीतली संध्याकाळ कुणासोबातची जवळ एकच होती जेव्हा छत्री
कित्येक क्षण दिलेत त्याने भरभरून जगण्याचे
रोजच्या व्यापातून स्वतःला थोडं वेगळं काढून बघण्याचे
काही म्हणा तो आहेच वेगळा नाहीतर असतातच की हिवाळे अन् उन्हाळे
पण अनुभव किती हे सांगायलाही म्हणतातंच ना मी पाहीलेत इतके पावसाळे

©शब्दवेडा किशोर

White जो खळखळून हसतो ना त्याला एकदा मनापासून व आपुलकीने विचारून पहा " कसा आहेस..?? " अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल.... माणसं आतून वाचायला शिका.. बाहेरून तर प्रत्येकजणच हसरा दिसतो. ©शब्दवेडा किशोर

#मराठीविचार #आयुष्य  White जो खळखळून हसतो ना
त्याला एकदा मनापासून व
आपुलकीने विचारून पहा
" कसा आहेस..?? "
अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल....
माणसं आतून वाचायला शिका..
बाहेरून तर प्रत्येकजणच हसरा दिसतो.

©शब्दवेडा किशोर

#आयुष्य माझ्या लेखणीतून

9 Love

Trending Topic