Sujata Bhalerao

Sujata Bhalerao

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#मराठीविचार #जीवनगाणे #गातच #Dhund  फिकट होत जातात रंग नभीचे
धुसर होते वलय निरभ्रतेचे
निळसर छटा  जणू अंधारते 
सैरभर  काहूर उठते
मेघही शुष्कतेने थांबले 
निरंतर प्रवासास निघाले
मी लुब्ध होऊन सारे पाहते 
माझ्यातील मीपण गळून पडते
सर्व रंग एक असल्याचे बघते
स्तंभित होऊन सारे पाहते
मी ना माझी  उरते तेव्हा
एकरुप होऊन जाते जेव्हा 
ना इथे कुठला धर्म ना जाती 
अन् ना पक्षाचा झेंडा हाती 
मिसळूनी रंगात साऱ्या तुला
 निरपेक्ष आठवणींचा तो झुला 
लोभ , माया , मोह , मत्सर
समूळ नायनाट होतो नंतर 
प्रभाती पाखरांसवे नभी जेव्हा
हलकेच मी विहरुन येतो तेव्हा
एकटाच प्रवासी वाटेवरचा
ठाव घेतो निर्मळ मनाचा

©Sujata Bhalerao

02/10/23 नमन त्या अहिंसेच्या पुजाऱ्याला वंदिते दो करांनी राष्ट्रपित्याला केलात तुम्ही मिठासाठी सत्याग्रह अन् शांतीमार्गाचा ठेवून निग्रह स्वातंत्र्य लढ्यातील एक सेनानी खादी सुत कातिले चरख्यानी काल एक तासाची स्वच्छता केली पण तुमच्या सारखी नाही जमली आम्ही गुलाम कागदी आदेशाचे सर्वच नियम केवळ पाळायचे आयुष्य बेगडी , भेगाळलेले अहिंसा , सत्यापासून दुरावलेले आपल्या कार्याला सदैव सलाम सदा चिरंतन कर्मयोगी निष्काम 🙏🙏💐 ©Sujata Bhalerao

#मराठीपौराणिक #gandhijayanti #गातच  02/10/23

नमन त्या अहिंसेच्या पुजाऱ्याला
वंदिते दो करांनी राष्ट्रपित्याला
केलात तुम्ही मिठासाठी सत्याग्रह
अन् शांतीमार्गाचा ठेवून निग्रह
स्वातंत्र्य लढ्यातील एक सेनानी
खादी सुत कातिले चरख्यानी
काल एक तासाची स्वच्छता केली
पण तुमच्या सारखी नाही जमली
आम्ही गुलाम कागदी आदेशाचे 
सर्वच नियम केवळ पाळायचे
आयुष्य बेगडी , भेगाळलेले
 अहिंसा , सत्यापासून दुरावलेले
आपल्या कार्याला सदैव सलाम
सदा  चिरंतन कर्मयोगी निष्काम 
🙏🙏💐

©Sujata Bhalerao

#gandhijayanti जीवनगाणे #गातच राहावे

17 Love

#मराठीविचार #uskaintezaar #गातच  अवखळ अन् अल्लड वारा
त्यात विझू दे अहंकार सारा
दिर्घकाळ नको अबोला आता
मिटतील संभ्रम बोलणे होता
रुसवा नि फुगव्याचा विसर
मीपणाची वितळेल झालर 
आयुष्यात शेवटी गोड आठवणी
आसपासही नकोत कटू साठवणी
मी - तू करता करता होईल
आणि अखेरची सांजही येईल
मग कोणाकडे तक्रार करणार
अखेर श्वासतही अंतर पडणार
जगून घेऊ मिळालेले जीवन
आनंदाची पेरणी , गोडवा ठेवून

©Sujata Bhalerao

#uskaintezaar जीवनगाणे #गातच राहावे

27 View

#मराठीविचार #जीवनगाणे #kitaab        *साक्षरता दिन*                  08/09/23

साक्षर म्हणून घेणारे आम्ही ! 
उगाच हुरळून जाणारे आम्ही
उमगलं का गणित जीवनाचं ?
कधी बेरजेचं कधी वजाबाकीचं
अहो , हातचा फक्त बेरजेत होतो
वजाबाकीत हळूच निसटून जातो
माहिती असूनही सारं काही
बोलतो उगाच काहीबाही 
शब्द वाचताना अडखळणारे 
बनतात पुस्तक लिहीणारे
मधला प्रवास जोखमीचा
शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा
गोडी जोडाक्षर व जोडशब्दांची
होते सुरेख मांडणी ओळींची
येऊन बसतात शब्द पंक्तीला 
पुस्तक रुपाने भेटतात आपल्याला 
  
सर्वांना साक्षरता दिनाच्या शुभेच्छा 👏💐

©Sujata Bhalerao

#kitaab #जीवनगाणे# गातच राहावे

46 View

#जीवनअनुभव #जीवनगाणे #Sukha  निष्पर्ण मी जाहलो आजजरी
विहरले कैक इथल्या फांदीवरी
घरटी बांधून संसार थाटला
प्रेमाचा झरा नाही आटला
विहंगणाऱ्या साऱ्यांचा साक्षी
फांदीवर पक्ष्यांची सुबक नक्षी
थबकून नेहमी मला पाहायचे सारे
सोसाट्याचे वाहत असे जरी वारे
अनेकांच्या आठवणींचा मी सोबती
दूरदूरवर पसरे माझी ख्याती 
आताशा फिरकतही नाही कोणी
पुरेसे नाही खत आणि पाणी
भार सोसवत नाही फांद्यांचा
वाट बघतो पानगळ होण्याचा
नाही बहरलो कित्येक दिवसांत
भिजायला नाही मिळत पावसात
अश्रुंनाही वाट केली मोकळी
पुढे भरुन निघेल का पोकळी
आता दिवस उरलेत फक्त चार
सुकलेल्याला पालवी कशी फुटणार ?

©Sujata Bhalerao

#Sukha #जीवनगाणे# गातच राहावे

27 View

#शिक्षण #chandrayaan3  अखेर चंद्रावर यान उतरले🌙🛰️
अन्  इस्रोने यश मिळवले
झळकला तिरंगा चंद्रावर
आता न उरले कसले अंतर
वाटे आम्हां बहु अभिमान 
भारत आहे राष्ट्र महान 🇮🇳

©Sujata Bhalerao

#chandrayaan3

27 View

Trending Topic